Temptation बद्दल बायबलमधील वचने: Covetousness
Covetousness बद्दल वचने
प्रामाणिक मनुष्याला भरपूर आशीर्वाद मिळेल, पण झटपट श्रीमंत होण्याची इच्छा धरणारा दंडापासून अलिप्त राहणार नाही.
जे श्रीमंत होण्याची इच्छा धरतात, ते परीक्षेत आणि पाशात व अति मूर्खपणाच्या आणि अपायकारक अभिलाषांच्या आहारी जातात, जी त्यांना अधोगतीला नेऊन त्यांचा संपूर्ण नाश करतात.
कारण पैशाचा लोभ सर्वप्रकारच्या दुष्टाईचे एक मूळ होय. पैशाच्या आसक्तीने कित्येक विश्वासापासून बहकले आहेत आणि त्यांनी स्वतःस अनेक दुःखांनी भेदून घेतले आहे.