मुख्य मजकुरावर जा

Temptation बद्दल बायबलमधील वचने: Resistance to temptation

121 वचने · 52 पैलू

"Temptation" साठी शोधा

Resistance to temptation बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. काही वेळेनंतर योसेफ पोटीफराच्या पत्नीच्या डोळ्यात भरला व ती त्याला म्हणाली, “माझ्याशी समागम कर!”

  2. योसेफाने तिला नाकारले. तो तिला म्हणाला. “हे पाहा, मी कारभारी असताना माझे धनी या घरातील कोणत्याही गोष्टीची काळजी करीत नाही, त्यांच्या मालकीचे सर्वकाही त्यांनी माझ्या हाती सोपविले आहे.

  3. या घरामधे मला सर्वांपेक्षा अधिक अधिकार आहेत. तुम्ही त्यांची पत्नी आहात, तुम्हाला वगळून इतर प्रत्येक गोष्ट त्यांनी माझ्या हाती दिली आहे. तेव्हा असे दुष्कर्म मला कसे करता येईल? ते परमेश्वराविरुद्ध एक घोर पातक ठरेल.”

  4. ती दिवसेंदिवस योसेफाला आग्रह करीत असली तरी त्याने तिच्यासोबत निजण्यास किंवा तिच्या सहवासात असण्याचे नाकारले.

  5. पण आम्ही आमच्या परमेश्वराची प्रार्थना केली आणि आपले संरक्षण करण्यासाठी शहरावर रात्रंदिवस पहारा ठेवला.

  6. “मी माझ्या डोळ्यांशी करार केला आहे की कोणा तरुण स्त्रीकडे कुवासनेने पाहणार नाही.

  7. “जर मी खोटेपणात चाललो आहे किंवा कपटाकडे माझा पाय घाईने उचलले;

  8. तर परमेश्वर सत्याच्या तराजूत मला तोलून पाहो आणि मी निरपराधी आहे हे त्यांना समजेल—

  9. जर माझे पाऊल मार्गातून भटकले असतील, जर माझ्या हृदयाने माझ्या डोळ्यांचे अनुसरण केले असेल, अथवा माझे हात भ्रष्ट झाले असतील,

  10. तर ज्याची पेरणी मी केली, त्याची कापणी दुसरा कोणी करो, आणि माझे पीक उपटून टाकले जावो.

  11. “जर माझे हृदय परस्‍त्रीद्वारे भुरळीत झाले असेल, अथवा मी शेजार्‍याच्या दाराशी दडून बसलो आहे,

  12. तर माझी पत्नी परपुरुषाच्‍या घरातील धान्य दळो, आणि इतर माणसे तिच्या अंथरुणात निजो.

  13. कारण ते तर खूपच दुष्ट, आणि दंडास पात्र असे पाप आहे.

  14. हा भस्म करणारा अग्नी आहे; जो माझा हंगाम उपटून टाकेल.

  15. “जेव्हा माझे सेवक माझ्याविरुद्ध गार्‍हाणे घेऊन आले, मग ते स्त्री असो वा पुरुष, तेव्हा मी त्यांना न्याय देण्याचे नाकारले असेल,

  16. तर मी परमेश्वराला सामोरे कसे जाणार? मला जाब विचारावयास बोलाविले असता, मी काय उत्तर देणार?

  17. कारण ज्यांनी मला गर्भात उत्पन्न केले त्यांनीच त्यांनाही उत्पन्न केले नाही काय? एकाच परमेश्वराने आम्हा दोघांना आमच्या मातांच्या उदरात निर्माण केले नाही काय?

  18. “जर मी गरिबांच्या हृदयाच्या इच्छा नाकारल्‍या असतील अथवा विधवांच्या डोळ्यात निराशा येण्याचे कारण झालो असेल,

  19. जर मी माझे अन्न स्‍वतःपाशीच ठेवले, आणि ते मी अनाथांना वाटून दिले नाही—

  20. मी जर कोणाला वस्‍त्राविना, आणि गरजवंत लोक ज्यांना पुरेसे कपडे नाहीत अशांचा नाश होताना पाहिले,

  21. त्यांना ऊब यावी म्हणून माझ्या मेंढरांच्या लोकरीचे पांघरूण दिले तरीही त्यांच्या हृदयाने मला आशीर्वाद दिला नाही,

  22. न्यायालयात मी प्रभावी आहे हे जाणून, मी जर एखाद्या अनाथावर हात उगारला असेन,

  23. तर खांद्यापासून माझा हात गळून पडो, सांध्‍यापासून ते तुटून जावोत.

  24. कारण परमेश्वरापासून आलेल्या विपत्तीने मला भयभीत केले आहे, आणि त्यांच्या वैभवाच्या भयनिमित्ताने या सर्वगोष्टी मी केल्या नाहीत.

  25. “जर मी सोन्यावर भरवसा ठेवला असेन किंवा शुद्ध सोन्याला म्हटले असते की, ‘तू माझा रक्षक आहेस,’