मुख्य मजकुरावर जा

Temptation बद्दल बायबलमधील वचने

346 वचने · 52 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. माझ्या शारीरिक आजाराने जणू तुमची परीक्षा झाली, तरी तुम्ही माझा धिक्कार व अवमान केला नाही. उलट तुम्ही माझे स्वागत केले, जणू काही मी परमेश्वराचा दूत, किंवा स्वतः ख्रिस्त येशूच होतो.

  2. दैहिक इच्छा आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देहाविरुद्ध आहे. ते आपसात विरोधी आहेत, यासाठी की ज्यागोष्टी तुम्ही केल्या पाहिजे त्या तुम्ही करू नये.

  3. प्रिय बंधू व भगिनींनो, जर कोणी पापात सापडला, तर तुम्ही जे आत्मिक आहात त्या तुम्ही त्याला सौम्य रीतीने सुधारावे. तुम्ही स्वतःस सांभाळा, कदाचित तुम्हीही मोहात पडाल.

  4. आणि सैतानाला पाय ठेवण्यास जागा देऊ नका.

  5. परमेश्वराची सर्व शस्त्रास्त्रे धारण करा, म्हणजे तुम्हाला सैतानाच्या योजनेविरुद्ध उभे राहता येईल.

  6. यास्तव वाईट दिवसांमध्ये तुम्हाला खंबीरपणे उभे राहता यावे आणि सर्वकाही केल्यानंतर टिकाव धरता यावा म्हणून परमेश्वराची शस्त्रसामुग्री धारण करा.

  7. म्हणून सत्यरूपी कमरबंदाने आपली कंबर बांधा, नीतिमत्वाचे ऊरस्त्राण घेऊन स्थिर उभे राहा.

  8. परमेश्वराच्या शांतीची शुभवार्ता गाजविण्याची तत्परता ही पादत्राणे घालून तयार राहा.

  9. या सर्व व्यतिरिक्त विश्वासरूपी ढाल घ्या, जिच्याद्वारे तुम्ही त्या दुष्टाचे अग्निबाण विझवू शकाल.

  10. तारणाचे शिरस्त्राण, आणि आत्म्याची तरवार म्हणजे परमेश्वराचे वचन हे देखील घ्या.

  11. कारण, जेव्हा हे माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे झाले, तेव्हा तुमच्या विश्वासाविषयी विचारपूस करण्यास मी त्याला तुमच्याकडे पाठविले. कदाचित कोणत्याही मार्गाने का होईना परीक्षकाने तुम्हाला परीक्षेत पाडले असेल आणि आमचे सर्व श्रम व्यर्थ गेले असतील अशी भीती मला वाटली.

  12. कारण असे करून काही विधवा यापूर्वीच मागे फिरून सैतानाच्या मागे गेल्या आहेत.

  13. जे श्रीमंत होण्याची इच्छा धरतात, ते परीक्षेत आणि पाशात व अति मूर्खपणाच्या आणि अपायकारक अभिलाषांच्या आहारी जातात, जी त्यांना अधोगतीला नेऊन त्यांचा संपूर्ण नाश करतात.

  14. कारण पैशाचा लोभ सर्वप्रकारच्या दुष्टाईचे एक मूळ होय. पैशाच्या आसक्तीने कित्येक विश्वासापासून बहकले आहेत आणि त्यांनी स्वतःस अनेक दुःखांनी भेदून घेतले आहे.

  15. परंतु दुष्ट आणि भोंदू लोक हे दुसर्‍यांना फसवून आणि स्वतः फसून अधिक वाईटाकडे जातील.

  16. कारण त्यांनी स्वतःची परीक्षा होत असताना दुःख भोगले, त्याअर्थी आपलीही परीक्षा होत असताना आपल्याला साहाय्य करावयास ते समर्थ आहेत.

  17. ते असे महायाजक नाहीत जे आपल्या दुर्बलतेविषयी सहानुभूती दर्शविण्यास असमर्थ आहे, परंतु असे आहेत जे सर्वप्रकारे आमच्यासारखेच पारखलेले होते तरी निष्पाप राहिले.

  18. ज्यांनी आपणाविरुद्ध पाप करणार्‍यांनी केलेला इतका विरोध सहन केला, त्याच्याविषयी विचार करा म्हणजे तुम्ही थकून न जाता तुमच्या मनांचा धीर सुटणार नाही.

  19. पापाविरुद्ध तुमच्या संघर्षात, तुम्ही रक्त सांडेपर्यंत पापाशी झगडला नाही.

  20. माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, जेव्हा तुम्ही अनेक प्रकारच्या परीक्षांना तोंड देता तेव्हा त्यात अत्यानंद माना.

  21. कारण तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची जी परीक्षा होते त्यामुळे धीर उत्पन्न होतो.

  22. धीराला कार्य पूर्ण करू द्या यासाठी की तुम्ही परिपक्व आणि पूर्ण व्हावे व तुम्हाला कशाचीही कमतरता भासू नये.

  23. जो कोणी व्यक्ती परीक्षेत धीर धरतो तो धन्य आहे, कारण परीक्षेत उतरल्यावर, प्रभूने आपल्यावर प्रीती करणार्‍यांना जो जीवनी मुकुट देण्याचे वचन दिले आहे, तो त्याला मिळेल.

  24. मोह आल्यानंतर, “परमेश्वर मला मोहात टाकत आहे” असे कोणीही म्हणू नये. कारण परमेश्वराला वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि ते स्वतः कोणाला मोहात पाडत नाहीत;

  25. परंतु प्रत्येक मनुष्य स्वतःच्याच दुष्ट वासनेने ओढला व भुलविला जाऊन मोहात पडतो.