Skip to content

Servants बद्दल बायबलमधील वचने

291 वचने · 147 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आपण काय काय केले याचा सर्व वृतांत सेवकाने इसहाकाला सांगितला.

  2. मग इसहाकाने रिबेकाहला आपली आई साराहच्या तंबूमध्ये आणले. त्याने रिबेकाहशी विवाह केला आणि ती त्याची पत्नी झाली. त्याचे तिच्यावर प्रेम बसले; आणि आपल्या आईच्या मृत्यूनंतर तिच्यामुळे त्याला सांत्वन मिळाले.

  3. मग गरारचे गुराखी इसहाकाच्या गुराख्यांशी भांडले आणि म्हणाले, “हे पाणी आमचे आहे!” म्हणून त्याने विहिरीला एसेक असे नाव दिले; कारण त्यांचे त्याच्याशी भांडण झाले.

  4. पण लाबान त्याला म्हणाला, “माझ्यावर तुझी कृपादृष्टी असेल तर कृपया थांब. तुझ्यामुळे याहवेहने मला आशीर्वाद दिला आहे हे मला भविष्यकथनाने कळले आहे.

  5. याकोब त्याला म्हणाला, “मी तुमची चाकरी कशी केली आणि तुमची गुरे माझ्या देखरेखीखाली कशी राहिली हे तुम्हाला माहीत आहे.

  6. मी येण्यापूर्वी तुमच्याकडे जे होते ते खूप वाढले आहे आणि मी जिथे होतो तिथे याहवेहने तुम्हाला आशीर्वाद दिला आहे. पण माझ्या स्वतःच्या कुटुंबीयांकडे मी केव्हा लक्ष देणार?”

  7. तरीपण तुमच्या वडिलांनी माझ्या वेतनाबाबत केलेला करार दहा वेळा बदलून मला फसविले आहे, तरी परमेश्वराने त्यांना माझे काही वाईट करू दिले नाही.

  8. तेव्हा याकोबाला लाबानाचा खूप संताप आला. त्याने रागाने विचारणा केली, “माझा काय अपराध आहे? मी कोणता गुन्हा केला आहे, की तुम्ही माझा पाठलाग करीत आहात?

  9. माझ्या सर्व सामानाची झडती घेतलीत. आता मी तुमचे जे काही चोरले असेल, ते तुमच्या आणि माझ्या लोकांच्या पुढे ठेवा. त्यांनाच ते पाहू द्या आणि ते कोणाचे आहे हे ठरवू द्या.

  10. “वीस वर्षे मी तुमच्याबरोबर राहिलो. त्या काळात तुमच्या मेंढ्या व शेळ्या यांचा कधीही गर्भपात झाला नाही किंवा मी तुमच्या कळपातील एकाही एडक्याला खाल्ले नाही.

  11. मी तुमच्याकडे वनपशूंनी फाडलेले प्राणी आणले नाहीत; मी स्वतः नुकसान सहन केले आणि दिवसा किंवा रात्री जे काही चोरीला गेले त्याबद्दल तुम्ही माझ्याकडून भरून घेतले.

  12. माझी परिस्थिती अशी होती: दिवसभर उन्हाचा आणि रात्री थंडीच्या कहराचा त्रास होत असे आणि झोप माझ्या डोळ्यावरून उडून जात असे.

  13. जर माझे पिता इसहाकाचे परमेश्वर, अब्राहामाचे परमेश्वर आणि इसहाकास ज्यांचे भय वाटते, ते माझ्यासह नसते, तर तुम्ही मला रिकामी हाताने पाठवून दिले असते. पण परमेश्वराने माझे परिश्रम व माझ्या हातांनी केलेले कष्ट पाहिले आणि म्हणूनच त्यांनी तुम्हाला काल रात्री दर्शन देऊन धमकाविले.”

  14. आता मी गुरे, गाढवे, मेंढरे, पुष्कळ स्त्रीपुरुष चाकर यांचा धनी झालो आहे. मी हा निरोप तुमच्याकडे पाठवित आहे कि तुमची कृपादृष्टी माझ्यावर होऊ द्यावी.”

  15. एसावाने दृष्टी वर करून त्या स्त्रिया व मुलांकडे पाहिले तेव्हा त्याने विचारले, “तुजबरोबर हे लोक कोण आहेत?” याकोब म्हणाला, “परमेश्वराने कृपा करून तुमच्या दासाला दिलेली ही माझी मुले आहेत.”

  16. यानंतर लवकरच रिबेकाहची वृद्ध दाई दबोरा, ही मरण पावली आणि बेथेलच्या खोर्‍यात एका एला वृक्षाखाली तिला मूठमाती देण्यात आली. तेव्हापासून त्या वृक्षाला अल्लोन-बकूथ असे नाव पडले.

  17. दरम्यान, मिद्यानी लोकांनी योसेफाला इजिप्तमधील पोटीफर, फारोहच्या सरदारांपैकी एका सुरक्षादलाच्या प्रमुखास विकले.

  18. पोटीफराने पाहिले की याहवेह योसेफाबरोबर आहेत आणि जे काही तो करतो त्यामध्ये याहवेह त्याला यश देतात,

  19. त्यामुळे साहजिकच योसेफ त्याचा आवडता झाला व त्याचा व्यक्तिगत सेवक बनला. लवकरच पोटीफराच्या घराची व्यवस्था व त्याचे सर्व व्यवहार त्याच्या ताब्यात देण्यात आले.

  20. जेव्हापासून त्याने योसेफाला त्याच्या घरावर, व त्याचे जे काहीही होते त्या सर्वांवर अधिकारी म्हणून नेमले, तेव्हापासून योसेफामुळे याहवेहने त्या इजिप्तच्या धन्याला आशीर्वादित केले; पोटीफराचे जे काही होते, त्याचे कुटुंब व शेती यावर याहवेहचा आशीर्वाद होता.

  21. याहवेह योसेफाबरोबर होते आणि तुरुंगाच्या अधिकार्‍याची कृपादृष्टी त्याच्यावर बसेल असे त्यांनी केले.

  22. म्हणून तू माझ्या महालाचा अधिकारी होशील आणि माझे सर्व लोक तुझ्या अधीन होतील. केवळ सिंहासनासाठीच मी तुझ्यापेक्षा मोठा असेन.”

  23. त्यांना योसेफाच्या घरी नेल्यावर त्यांची भीतीने गाळण उडाली. त्यांनी विचार केला आणि म्हणाले, “पहिल्यांदा आपल्या पोत्यात जी चांदी टाकण्यात आली होती त्यासाठी आपल्याला इथे आणण्यात आले आहे. आपल्यावर हल्ला करून आपल्यावर विजय मिळवून आपल्याला गुलाम करावे व आपल्या गाढवांना हस्तगत करावे असा त्याचा बेत असावा.”

  24. “ते सर्व ठीक आहे,” तो म्हणाला, “घाबरू नका. तुमचा परमेश्वर, तुमच्या पित्याचा परमेश्वर यांनीच तुमच्या पोत्यात ते धन दिले आहे; तुमची चांदी मला मिळाली आहे.” मग त्याने शिमओनाला बाहेर काढून त्यांच्याकडे आणले.

  25. नंतर घरकारभार्‍याने त्यांना योसेफाच्या घरात नेले, त्यांचे पाय धुण्यासाठी पाणी दिले आणि त्यांच्या गाढवांना चाराही दिला.