Skip to content

Servants बद्दल बायबलमधील वचने

291 वचने · 147 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जे काही तुम्ही करता, ते पूर्ण मनाने करा, मनुष्यांसाठी नव्हे, तर प्रभूसाठी म्हणून करा.

  2. हे तुम्हाला माहीत आहे की, प्रभूपासून तुम्हाला वारसा हे प्रतिफळ म्हणून मिळेल. तुम्ही प्रभू ख्रिस्ताची सेवा करीत आहात.

  3. जारकर्मी, समलैंगिक, दासांचा व्यापार करणारे, लबाड, खोटी शपथ वाहणारे यांच्यासाठी—आणि इतर जे काही शुद्ध शिक्षणाविरुद्ध आहे.

  4. जे दास म्हणून जुवाखाली आहेत त्यांनी आपआपल्या धन्यास सर्व सन्मानास योग्य मानावे, यासाठी की परमेश्वराच्या नावाची आणि शिकवणीची निंदा होऊ नये.

  5. त्यांचा धनी विश्वासणारा असल्यास त्यांना ते बंधूसारखे आहेत, त्यांनी त्यांचा अवमान करू नये, उलट जास्त आदराने सेवा करावी, कारण जे तुमच्या सेवेचा लाभ घेणारे आहेत ते विश्वासणारे व प्रिय आहेत. या गोष्टी त्यांना शिकवून पालन करण्यास सांग.

  6. दासांना असा बोध कर की त्यांनी त्यांच्या धन्याच्या अधीन असावे, त्यांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करावा, त्यांना उलट उत्तर देऊ नये;

  7. आणि त्यांनी चोरी करू नये, तर त्यांच्यावर भरवसा ठेवण्यास ते लायक आहेत असे दाखवावे. यासाठी की या सर्व गोष्टींत त्यांनी आपल्या तारणार्‍या परमेश्वराबद्दलच्या शिक्षणास शोभा आणावी.

  8. तो यापूर्वी तुला उपयोगी नव्हता, परंतु आता तो आपल्या दोघांनाही, तुला व मला उपयोगी आहे.

  9. परंतु येथून पुढे दास नव्हे, तर दासापेक्षा योग्य असा प्रिय बंधू व्हावे. तो मला अतिशय प्रिय आहे, परंतु व्यक्तिगत रीतीने आणि प्रभूमध्ये बंधू या दोन्हीही नात्याने तो तुला अधिक प्रिय आहे.

  10. यास्तव, जेव्हा ख्रिस्त जगात आले तेव्हा ते म्हणाले, “यज्ञ किंवा अर्पणे यांची इच्छा तुम्हाला नाही, परंतु तुम्ही माझ्यासाठी एक शरीर तयार केले;

  11. पाहा! ज्या कामकर्‍यांनी तुमची शेते कापली, त्यांचे वेतन तुम्ही दिले नाही ते तुमच्याविरुद्ध आक्रोश करीत आहेत. कापणी करणार्‍यांचा आक्रोश सेनाधीश प्रभूच्या कानावर गेला आहे.

  12. दासांनो, आदराने परमेश्वराचे भय बाळगून तुम्ही स्वतःला तुमच्या धन्याच्या अधीन करा, फक्त जे चांगले आणि कृपाळू आहेत अशांच्याच नाही, तर जे कठोर आहेत अशा धन्यांच्यासुद्धा अधीन राहा.

  13. कारण त्याला परमेश्वराची जाणीव असल्यामुळे जर कोणी मनुष्य अन्यायी दुःखाच्या वेदना सहन करतो, तर ते प्रशंसनीय आहे.

  14. परंतु चूक केल्याबद्दल मिळालेली शिक्षा तुम्ही सहन केली तर त्यात काय मोठेपणा आहे? परंतु जर चांगले केल्याबद्दल तुम्ही दुःख भोगले आणि ते सहन केले तर हे परमेश्वराच्या दृष्टीने प्रशंसनीय आहे.

  15. यासाठीच तुम्हाला पाचारण करण्यात आलेले आहे, कारण ख्रिस्ताने तुमच्यासाठी दुःख सहन करून तुमच्यासमोर एक आदर्श ठेवला आहे, यासाठी की तुम्ही त्यांचे अनुकरण करावे.

  16. हे त्यांना स्वतंत्रतेचे वचन देतात जेव्हा ते स्वतःच दुष्टतेचे दास आहेत, कारण “लोक ज्याच्या अधिकारात आहेत, ते त्याचे दास आहेत.”