Skip to content

Servants बद्दल बायबलमधील वचने

291 वचने · 147 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “त्यावेळी मी येईन आणि तुमची पारख करून न्याय करेन. जादूटोणा करणारे, व्यभिचारी व खोटी साक्ष देणारे, आपल्या मजुरांना लुबाडणारे, विधवा व अनाथांवर जुलूम करणारे, परकियांना न्यायापासून वंचित करणारे, पण माझे भय न बाळगणारे, अशा सर्व दुष्ट लोकांविरुद्ध मी त्वरित कारवाई करेन,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.

  2. कारण मी स्वतः अधिकाराच्या अधीन असलेला मनुष्य असून माझ्या अधिकाराखाली सैनिक आहेत. मी एकाला, ‘जा,’ म्हटले की तो जातो आणि दुसर्‍याला, ‘ये,’ म्हटले की तो येतो आणि माझ्या नोकराला, ‘हे कर,’ अथवा ‘ते कर,’ असे म्हटले तर तो ते करतो.”

  3. त्या नोकराला हे कर्ज फेडणे अशक्य होते, म्हणून प्रभूने कर्जदार, त्याची पत्नी, त्याची मुले, आणि त्याचे जे सगळे होते ते विकून कर्ज वसूल करण्याची आज्ञा दिली.

  4. “पण तो थांबावयास तयार नव्हता. त्याने त्या मनुष्याला अटक करवून तो पैसे फेडेपर्यंत तुरुंगात डांबून ठेवले.

  5. ज्याप्रमाणे मी तुझ्यावर दया केली त्याप्रमाणे तू त्याच्यावर दया करू नये काय?

  6. “स्वर्गाचे राज्य एका जमीनदारासारखे आहे. तो आपल्या द्राक्षमळ्यातील हंगामाचे पीक कापण्याकरिता मजूर शोधण्यासाठी अगदी सकाळीच बाहेर पडला.

  7. एक दिवसासाठी एक दिनार देण्याचे कबूल करून, त्याने मजुरांना आपल्या द्राक्षमळ्यात पाठविले.

  8. “सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तो बाहेर गेला, तेव्हा बाजारपेठेत दुसरे काही मजूर रिकामे उभे असल्याचे त्याने पाहिले.

  9. मी मानवपुत्र, सेवा करवून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास आणि पुष्कळांच्या उद्धारासाठी आपला जीव खंडणी म्हणून द्यावयास आलो आहे.”

  10. धनी येईल, तेव्हा जो दास आपली कामगिरी बजावीत असताना त्याला आढळेल, तो धन्य होय.

  11. आणि तो सोबतीच्या दासांना मारहाण करू लागेल आणि मद्यपीं बरोबर खाऊ आणि पिऊ लागेल.

  12. तर त्या दासाचा धनी, तो अपेक्षा करीत नाही आणि तो सावध नाही अशा घटकेला येईल.

  13. त्यांनी उशीर न करता त्यांना बोलाविले, तेव्हा ते आपला पिता जब्दी याला नावेमध्ये मजुरांबरोबर सोडून त्यांच्यामागे गेले.

  14. त्यांच्यापैकी काहीजण येशूंवर थुंकू लागले. त्यांनी त्यांचे डोळे बांधले, त्यांना बुक्क्या मारल्या आणि म्हटले, “भविष्यवाणी करा!” मग पहारेकर्‍यांनी त्यांना चपराका मारून आपल्या ताब्यात घेतले.

  15. घरोघरी न जाता तिथेच राहा आणि तुम्हाला जे देण्यात येईल, ते खा व प्या. कारण कामकरी आपल्या वेतनास पात्र आहे.

  16. “शेवटी तो शुद्धीवर आला आणि स्वतःशीच म्हणाला, ‘माझ्या पित्याच्या घरी नोकर चाकरांनाही पुरून उरेल इतके अन्न असते, पण मी मात्र इकडे उपाशी मरत आहे.

  17. “जर तुम्ही अगदी लहान गोष्टींत विश्वासू राहिला तर पुष्कळ गोष्टींत विश्वासू असाल, जर कोणी अगदी लहान गोष्टीत अप्रामाणिक राहिला तर पुष्कळ गोष्टीत अप्रामाणिक असेल.

  18. तुम्ही ऐहिक संपत्ती हाताळण्यासंबधी प्रामाणिक नसाल, तर खरी संपत्ती कोण तुम्हाला सोपवून देईल?

  19. तुम्ही इतर लोकांच्या संपत्ती संबंधी विश्वासू नसाल, तर तुम्हाला स्वतःची संपत्ती कोण देईल?

  20. “तरीपण त्याचा राज्याभिषेक करण्यात येऊन तो घरी परतला. मग त्याने ज्या दासांना पैसे दिले होते, त्यांनी त्या पैशावर किती नफा मिळविला, हे पाहण्याकरिता बोलाविले.

  21. “पहिला सेवक म्हणाला, ‘महाराज, मी तुमच्या एका मीनावर आणखी दहा मीना मिळविल्या आहेत.’

  22. “नंतर दुसरा दास आला आणि म्हणाला, ‘महाराज, मी तुमच्या मीनावर आणखी पाच मीना मिळविल्या आहेत.’

  23. श्रेष्ठ कोण आहे, जो भोजन करतो, की जो सेवा करतो? अर्थात् जो बसून जेवतो तोच ना? पाहा, सेवा करणार्‍यासारखा मी तुम्हामध्ये आहे.

  24. परंतु भाडेकरू, जो मेंढपाळ नाही, तो लांडगा येताना पाहतो व मेंढरे तशीच सोडून पळून जातो, मग तो लांडगा त्या कळपावर हल्ला करतो आणि त्यांची पांगापांग होते.

  25. तो मनुष्य पळून जातो कारण तो भाडेकरू असतो आणि त्याला मेंढरांची काहीच काळजी नसते.