Skip to content

Servants बद्दल बायबलमधील वचने

291 वचने · 147 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तो म्हणाला, “माझ्या स्वामी, मी आपला सेवक अपंग आहे, मी म्हणालो, ‘मी माझ्या गाढवावर खोगीर घालून त्यावर बसून माझ्या राजाबरोबर जाईन.’ परंतु माझा सेवक सीबा याने मला फसविले.

  2. परंतु तीन वर्षानंतर, शिमीचे दोन गुलाम, माकाहचा पुत्र आखीश, गथच्या राजाकडे पळून गेले आणि शिमीला सांगण्यात आले, “तुझे गुलाम गथमध्ये आहेत.”

  3. जेरेदाह येथील एक एफ्राईमकर, नेबाटाचा पुत्र यरोबोअमने सुद्धा शलोमोन राजाविरुद्ध बंड केले. त्याची आई विधवा होती, तिचे नाव जेरुआह होते.

  4. जिम्री, जो त्याच्या अधिकार्‍यांपैकी एक होता, जो त्याच्या निम्म्या रथांचा सेनापती होता, त्याने त्याच्याविरुद्ध कट रचला. एलाह त्यावेळी तिरजाह येथे, राजवाड्याचा अधिकारी अरजाच्या तिरजाह येथील घरी मद्यधुंद झाला होता.

  5. तेव्हा आपल्या कंबरेला गोणपाट नेसून व डोक्याला दोरी बांधून, ते इस्राएलच्या राजाकडे गेले व म्हणाले, “आपला सेवक बेन-हदाद म्हणतो: ‘कृपया मला जीवनदान द्यावे.’ ” राजाने म्हटले, “तो अजूनही जिवंत आहे काय? तो तर माझा भाऊ आहे.”

  6. संदेष्ट्यांच्या समुहातील एका मनुष्याची पत्नी रडून अलीशाला म्हणाली, “तुमचा सेवक माझा पती मरण पावला आहे आणि तुम्हाला माहीत आहे तो याहवेहचे भय बाळगणारा होता. पण आता त्याचा सावकार माझ्या दोन मुलांना त्याचे गुलाम व्हावे म्हणून घ्यायला येत आहे.”

  7. आता अरामातून टोळी बाहेर गेली आणि त्यांनी इस्राएलातील एका लहान मुलीला गुलाम म्हणून नेले आणि ती नामानाच्या पत्नीची सेवा करू लागली.

  8. एके दिवशी ती मुलगी आपल्या धनिणीला म्हणाली, “आपल्या स्वामींनी शोमरोनातील संदेष्ट्याची भेट घेतली असती तर किती बरे झाले असते! तो त्यांचा कुष्ठरोग बरा करू शकला असता.”

  9. ही इस्राएली मुलगी काय म्हणते हे नामानाने जाऊन राजाला सांगितले.

  10. नामानाचे सेवक त्याच्याकडे गेले आणि म्हणाले, “माझ्या पित्या, संदेष्ट्याने आपल्याला एखादी अवघड गोष्ट करावयास सांगितली असती, तर ती तुम्ही केली नसती काय? त्यांनी तर आपल्याला एवढेच सांगितले, जा स्नान कर आणि शुद्ध हो. तर मग तसे करावे की नाही?”

  11. इकडे परमेश्वराचा मनुष्य अलीशाचा सेवक गेहजी स्वतःस म्हणाला, “माझ्या धन्याने या अरामी नामानाकडून नजराणे न स्वीकारता त्याला असेच जाऊ दिले. जिवंत याहवेहची शपथ, आता मी स्वतः त्याच्यामागे पळत जाईन आणि त्याच्यापासून काहीतरी घेईन.”

  12. गेहजी म्हणाला, “सर्वकाही ठीक आहे. माझ्या धन्याने मला तुमच्याकडे हे सांगण्यास पाठविले आहे, ‘एफ्राईमच्या डोंगराळ भागातून संदेष्ट्यांच्या समुहातून दोन तरुण संदेष्टे आताच आले आहेत. कृपया त्यांना देण्यासाठी चांदीची एक तालांत व पोशाखांचे दोन जोड हवे आहेत.’ ”

  13. जेव्हा गेहजी डोंगराजवळ आला तेव्हा त्याने सेवकांकडून त्या थैल्या घेतल्या आणि त्या आपल्या घरी ठेवून दिल्या. त्याने त्या माणसांना परत पाठवून दिले आणि ते निघून गेले.

  14. आमोनच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याविरुद्ध कट रचला आणि राजाची त्याच्या राजवाड्यात हत्या केली.

  15. शेशानास पुत्र नव्हते, मात्र कन्या होत्या. त्याचा यरहा नावाचा एक इजिप्त येथील सेवक होता.

  16. शेशानाने आपली कन्या, आपला सेवक यरहास दिली; तिच्या पोटी त्यास अत्ताय झाला.

  17. पण त्या दिवसापासून पुढे माझे फक्त अर्धेच पुरुष काम करीत असत व बाकी अर्धे पाठीमागे भाले, ढाली, धनुष्य व शस्त्रे घेऊन होते. हे अधिकारी जे यहूदीयाचे लोक

  18. याकाळात आमच्यापैकी कोणीही, मी किंवा माझे बांधव, माझी माणसे किंवा माझ्याबरोबर असणारे पहारेकरी, कोणीही आपले कपडे बदलले नाहीत आणि जलाशयाला जाते वेळी देखील आम्ही आमची शस्त्रे नेहमीच आमच्याबरोबर बाळगत असू.

  19. आणखी दुसरे काही म्हणाले, “आमची शेते आणि द्राक्षमळे यावरील राजाचा कर भरता यावा म्हणून आम्हाला कर्जाऊ पैसे काढावे लागले आहेत.

  20. आम्ही त्यांचेच बांधव आहोत आणि आमची मुले त्यांच्या मुलांबाळांसारखीच आहेत, तरीसुद्धा जगण्यासाठी पुरेसे पैसे मिळावेत म्हणून आम्हाला आमची मुले व मुली गुलाम म्हणून कामाला लावावी लागतात. आमच्या काही कन्या आम्ही आधीच गुलाम म्हणून विकलेल्या आहेत, पण आम्ही असमर्थ आहोत, कारण आमची शेते व द्राक्षमळेसुद्धा इतरांचे झाले आहेत.”

  21. “या पृथ्वीवर मानवाला कठीण श्रम करावे लागत नाहीत का? त्यांचे दिवस हे मोलकर्‍यासारखे नाहीत काय?

  22. जसा गुलाम उत्कंठेने संध्याकाळच्या छायेची उत्कंठेने वाट पाहतो, किंवा जसा मजूर वेतनासाठी आशा लाऊन असतो,

  23. मी माझ्या सेवकाला आज्ञा करतो, आणि माझ्या मुखाने त्याला विनवणी करतो, परंतु तो उत्तर देत नाही.

  24. यज्ञ किंवा अन्नार्पणे यांची इच्छा तुम्हाला नाही— परंतु तुम्ही माझे कान उघडले आहेत; होमार्पण आणि पापार्पण यांनी तुम्हाला संतोष होत नाही.

  25. देशातील निष्ठावान लोकांवर मी माझी दृष्टी लावेन, जेणेकरून ते माझ्या सहवासात राहतील; ज्यांचे आचरण दोषरहित असेल, असेच लोक माझी सेवा करतील.