- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Servants बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
“ ‘याजकाच्या कुटुंबा बाहेरील इतर कोणीही, त्याच्याकडे आलेले पाहुणे किंवा त्याच्याकडे काम करणारे मजूर यांनी पवित्र अर्पणांतील कोणताही पदार्थ खाऊ नये.
त्या शब्बाथाच्या वर्षी जमीन जे काही पीक येईल ते सर्वांना म्हणजेच तुम्ही, तुमचे नोकरचाकर, तुमच्याकडे असलेले गुलाम आणि तुमच्यात राहणारा कोणीही परदेशीय यांना खाण्याची मोकळीक आहे.
पन्नासावे वर्ष पवित्र मानावे आणि संपूर्ण देशातील सर्व लोकांना मुक्ततेची घोषणा करावी. तुमच्यासाठी हा महोत्सव असेल; तुमच्यातील प्रत्येकाने तुमच्या कौटुंबिक मालमत्तेकडे आणि तुमच्या स्वतःच्या कुळाकडे परत जावे.
“ ‘जर तुमच्यापैकी कोणी इस्राएली गरीब झाला असेल आणि त्याने स्वतःला तुम्हाला विकले असेल, तर तुम्ही त्यांना गुलामासारखे कामे करावयास लावू नये.
तर रोजदारीवर ठेवलेल्या नोकराप्रमाणे किंवा तुमच्या आश्रिताप्रमाणे तुम्ही त्याला वागणूक द्यावी आणि योबेल वर्षापर्यंत तो तुमची सेवा करेल.
त्यानंतर त्यांना आणि त्यांच्या मुलाबाळांना सोडण्यात येईल आणि ते आपल्या कुटुंबातील पूर्वजांच्या वतनात परत जाऊ शकतील.
“ ‘तुमचे पुरुष आणि स्त्री गुलाम तुमच्या सभोवतालच्या राष्ट्रांमधून यावेत; तुम्ही त्यांच्याकडून गुलाम विकत घेऊ शकता.
तुम्ही तुमच्यामध्ये राहणारे काही तात्पुरते रहिवासी आणि तुमच्या देशात जन्मलेल्या त्यांच्या कुळातील सदस्यांना देखील विकत घेऊ शकता आणि ते तुमची मालमत्ता बनतील.
तुम्ही ते तुमच्या मुलांना वारसाहक्कात देऊ शकता आणि त्यांना आयुष्यभर गुलाम बनवू शकता, पण तुमच्या इस्राएली बांधवांना अशा प्रकारची कठोर वागणूक तुम्ही देऊ नये.
“ ‘तुमच्यात राहणारा एखादा परदेशी श्रीमंत झाला व इस्राएली वंशातील कोणी आपल्या दारिद्र्यामुळे स्वतःला त्या परदेश्याला वा परदेशी कुटुंबाला विकून टाकले,
तर त्याची विक्री झाल्यावरही त्याच्या घराण्यापैकी कोणालाहीः
त्याचा चुलता, पुतण्या किंवा त्याच्या जवळचा कोणीही खंडणी भरून त्याला सोडवून घेऊ शकेल, त्याला स्वतःलाच पैसा मिळाला तर खंडणी भरून तो स्वतःची सुटका करून घेऊ शकेल.
त्याने स्वतःला विकले त्या वर्षापासून योबेल वर्षापर्यंत जितकी वर्षे राहिली असतील तितकी मोजून याकाळात एका मजुराला जितकी मजुरी द्यावी लागेल तितका पैसा भरून त्याची सुटका करावी.
जर त्याला पुष्कळ वर्षे लागत असतील, तर त्यांनी त्यांच्या सुटकेसाठी दिलेल्या किमतीचा मोठा भाग त्यांच्यासाठी द्यावा.
जर योबेल वर्षाला थोडीच वर्षे राहिली असतील तर त्यांनी हिशोब करावा आणि त्यांच्या सुटकेसाठी नियमाप्रमाणे किंमत द्यावी.
तो दरवर्षी मजुराच्या हिशोबाप्रमाणे त्याच्याबरोबर वागणूक करेल आणि ज्यांच्याकडून सेवा करून घेतात त्यांना कठोर वागणूक देऊ नये.
“ ‘योबेल वर्षापर्यंतही तो मुक्त झाला नसेल, तर तो व त्याची मुलेबाळे योबेल वर्षी मुक्त होतील,
कारण इस्राएली लोक माझेच सेवक आहेत; मीच त्यांना इजिप्त देशातून बाहेर आणले; मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.
तुमच्या शेजार्याच्या पत्नीची अभिलाषा धरू नका. त्याच्या घराचा किंवा भूमीचा, त्याच्या दासाचा किंवा दासीचा, त्याच्या बैलाचा किंवा गाढवाचा किंवा शेजार्याच्या मालकीच्या कशाचाही लोभ करू नका.”
पण ही सर्व अर्पणे याहवेह तुमचे परमेश्वर निवडील त्या ठिकाणी तुमचे पुत्र, कन्या, तुमचे दास व दासी व तुमच्या शहरात राहणारे लेवी, या सर्वांसह तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर खावीत. तुम्ही जे करता त्या प्रत्येक सेवेबद्दल परमेश्वरापुढे आनंद करावा.
जर तुमच्यापैकी कोणी—इब्री पुरुष किंवा इब्री स्त्री—दास म्हणून स्वतःला विकले आणि सहा वर्षे त्यांनी तुमची सेवा केल्यानंतर सातव्या वर्षी त्यांना मुक्त करावे.
आणि ज्यावेळी तुम्ही त्यांना मुक्त कराल, त्यावेळी त्यांना रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका.
तर तुम्ही तुमच्या गुरांच्या कळपातून, तुमच्या खळ्यातून, तुमच्या द्राक्षारसाच्या कुंडातून उदारहस्ते द्यावे. ज्याप्रकारे याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला आशीर्वादित केले आहे त्याप्रकारे त्यांना द्या.
परंतु तुमच्या दासाची तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रीती असेल आणि त्याला तुमच्या घरी राहण्यात आनंद वाटत असेल आणि तो तुम्हाला म्हणेल की “तुम्हाला सोडून जाण्याची माझी इच्छा नाही,”
तर आरी घेऊन, त्याचा कान दरवाजावर धरून, तो आरपार टोचावा. मग तो तुमचा कायमचाच दास होईल. तुमच्या दासीचेही असेच करावे.