मुख्य मजकुरावर जा

Servants बद्दल बायबलमधील वचने

291 वचने · 147 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आमच्यापैकी कोणाच्याही जवळ जर तो प्याला सापडला तर त्याला मृत्यू येवो; आणि आम्ही सर्वजण तुझ्या धन्याचे गुलाम होऊ.”

  2. फारोहच्या ज्या अधिकार्‍यांना याहवेहच्या शब्दाचे भय वाटले, त्यांनी आपले चाकर व गुरे लगबगीने आत आणली.

  3. तुझे हे सर्व सेवक माझ्याकडे येतील व माझ्या पाया पडून मला म्हणतील, ‘तू व तुझे अनुसरण करणारे सर्व लोक निघून जा!’ त्यानंतर मी निघून जाईन.” मग मोशे रागाने संतापून फारोहसमोरून निघून गेला.

  4. पण तू मोल देऊन विकत घेतलेला गुलाम व ज्याची सुंता तू करून घेतली आहे त्याने ते खावे.

  5. पण तात्पुरता रहिवासी किंवा मोलकरी यांनी ते खाऊ नये.

  6. परंतु सातवा दिवस याहवेह तुमचे परमेश्वर यांचा शब्बाथ आहे. त्या दिवशी तुम्ही कोणतेही काम करू नये, तुम्ही किंवा तुमचा पुत्र किंवा कन्या, तुमचा दास किंवा दासी, तुमचे पशू किंवा तुमच्या नगरात राहणारा परदेशी यांनी देखील कोणतेही काम करू नये.

  7. तुमच्या शेजार्‍याच्या घराचा लोभ धरू नका. तुमच्या शेजार्‍याच्या पत्नीची अभिलाषा धरू नका किंवा त्याच्या दासाचा किंवा दासीचा, किंवा त्याच्या बैलाचा किंवा त्याच्या गाढवाचा, किंवा त्याच्या मालकीचे जे काही असेल त्या कशाचाही लोभ धरू नका.

  8. “तुम्ही जर एखादा इब्री गुलाम विकत घेतला, तर त्याने तुमची सहा वर्षे सेवा करावी. परंतु सातव्या वर्षी तो काहीही भरपाई न घेता स्वतंत्र होईल.

  9. जर तो एकटाच आला, तर तो एकटाच स्वतंत्र जाईल; परंतु तो आपल्या पत्नीसोबत आला तर तीसुद्धा त्याच्याबरोबर जाईल.

  10. जर गुलाम असताना त्याच्या मालकाने त्याचे लग्न करून दिले आणि त्याला मुले व मुली झाले, तर ती स्त्री व तिची लेकरे त्या मालकाच्या हक्काची राहतील आणि तो मनुष्य एकटाच स्वतंत्र केला जाईल.

  11. “पण जर तो गुलाम जाहीर करतो की, मी माझ्या मालकावर, माझ्या पत्नीवर व माझ्या लेकरांवर प्रीती करतो आणि तुम्हाला सोडून जाण्याची माझी इच्छा नाही,

  12. तर त्याच्या मालकाने त्याला न्यायाधीशांसमोर आणावे. मग त्याने त्याला दरवाजाकडे किंवा दरवाजाच्या चौकटीजवळ आणावे व आरीने त्याचा कान टोचावा. यानंतर तो त्याचा जीवनभर गुलाम म्हणून राहील.

  13. “एखाद्या मनुष्याने आपली मुलगी गुलाम म्हणून विकली, तर पुरुष केले जातात त्याप्रमाणे ती स्वतंत्र केली जाणार नाही.

  14. ज्याने तिला आपल्यासाठी निवडून घेतले होते, त्या आपल्या मालकाला जर ती संतुष्ट करीत नाही, तर त्याने तिची खंडणी भरून तिला जाऊ द्यावे; तिला परक्याला विकण्याचा त्याला अधिकार नाही, कारण त्याने तिचा विश्वास तोडला आहे.

  15. पण आपल्या मुलासाठी जर तो तिची निवड करतो, तर त्याने आपल्या मुलीचे हक्क तिला द्यावे.

  16. जर तो दुसर्‍या स्त्रीशी विवाह करतो, तर त्याने पहिल्या पत्नीला अन्न, वस्त्र, आणि वैवाहिक हक्क यापासून वंचित ठेऊ नये.

  17. जर तो या तीन गोष्टी तिला पुरवित नाही तर ती पैसे न देताच मोकळी जाऊ शकते.

  18. “जो कोणी एखाद्याचे अपहरण करतो त्याला जिवे मारावे, पीडित व्यक्ती त्याच्या ताब्यात असो किंवा कोणाला विकलेली असो.

  19. “जो कोणी आपल्या गुलाम स्त्री किंवा पुरुषाला काठीने मारेल व त्यामुळे गुलाम मरण पावला, तर त्या धन्याला शिक्षा व्हावी.

  20. पण जर गुलाम एक किंवा दोन दिवसात बरा झाला तर त्यांना पैशाची शिक्षा होणार नाही, कारण गुलाम त्यांच्या मालकीचा आहे.

  21. “एखाद्या धन्याने आपल्या गुलाम स्त्री किंवा पुरुषाच्या डोळ्यांवर मारून तो फोडला तर डोळ्याची भरपाई म्हणून त्याने त्यांना स्वतंत्र करावे.

  22. एखादा धनी जो आपल्या गुलाम पुरुष किंवा स्त्रीचा दात पाडतो, तर दाताची भरपाई म्हणून त्याने त्यांना स्वतंत्र करावे.

  23. पण बैलाने जर एखाद्या स्त्री किंवा पुरुष गुलामाला हुंदडून मारले, तर त्या गुलामाच्या मालकाला बैलाच्या मालकाने तीस चांदीची नाणी द्यावीत व बैलाला धोंडमार करावी.

  24. पण ते जर सूर्योदय झाल्यावर घडले, तर मारणारा रक्तदोषी ठरेल. “ज्याने चोरी केली त्याने खचितच भरपाई करून द्यावी, पण त्याच्याकडे काहीही नसले, तर त्याला चोरीची भरपाई म्हणून विकून टाकावे.

  25. “ ‘तुम्ही कोणाला फसवू नये किंवा तुमच्या शेजार्‍याला लुबाडू नये. “ ‘मजुरांची मजुरी रात्रभर दिवस उजाडेपर्यंत आपल्याजवळ ठेवू नये.