मुख्य मजकुरावर जा

Riches बद्दल बायबलमधील वचने

225 वचने · 107 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. संपत्ती पुष्कळ मित्र आकर्षित करते, परंतु अगदी जवळचा मित्रही गरिबाला सोडून जातो.

  2. लबाड बोलून मिळवलेली संपत्ती, म्हणजे उडून जाणारी वाफ आणि प्राणघातक सापळा आहे.

  3. जसा श्रीमंत गरिबावर सत्ता चालवितो, तसाच कर्जदार आपल्या सावकाराचा नोकर होतो.

  4. श्रीमंत होण्यासाठी जो गरिबांवर जुलूम करतो तो आणि जो श्रीमंतांना बक्षिसे देतो—दोघेही दरिद्री होतील.

  5. श्रीमंत होण्यासाठी स्वतःला झिजवू नकोस; स्वतःच्या चातुर्यावर भरवसा ठेऊ नकोस.

  6. तू श्रीमंतीकडे नजर टाकताच, ते निघून गेलेले असते, कारण पंख उगवताच गरुडाप्रमाणे ते आकाशात उडून जाईल.

  7. आपल्या कळपाच्या स्थितीची योग्य जाणीव ठेवा, तुमच्या पशूंकडे काळजीपूर्वक लक्ष द्या;

  8. कारण संपत्ती सर्वकाळ टिकत नाही, आणि मुकुट पिढ्यान् पिढ्या सुरक्षित नसतो.

  9. जो गरिबांकडून व्याज किंवा फायदा घेऊन संपत्ती वाढवितो, ती दुसर्‍याकरिता साठवितो, जो गरिबांवर दया दाखवेल.

  10. श्रीमंत माणसे त्यांच्या दृष्टीने स्वतःला शहाणे समजतात; परंतु जो गरीब आणि विवेकी आहे तो पाहतो की श्रीमंत कसे भ्रमात पडलेले आहेत.

  11. प्रामाणिक मनुष्याला भरपूर आशीर्वाद मिळेल, पण झटपट श्रीमंत होण्याची इच्छा धरणारा दंडापासून अलिप्त राहणार नाही.

  12. कंजूष माणसे श्रीमंत होण्यासाठी उतावळे असतात आणि त्यांना माहीत नसते की दारिद्र्य त्यांची वाट पाहत आहे.

  13. कपटी वागणे आणि असत्य बोलणे यापासून मला दूर ठेवा; मला दारिद्र्य किंवा श्रीमंतीही देऊ नका; परंतु फक्त माझी रोजची भाकर मला द्या.

  14. कारण असे होऊ नये, कि मी श्रीमंत झालो तर तुम्हाला विसरेन आणि म्हणेन, ‘याहवेह कोण आहे?’ किंवा दरिद्री झालो तर कदाचित मी चोरी करेन आणि माझ्या परमेश्वराच्या नावाची निंदा होईल.”

  15. जो व्यक्ती परमेश्वराला संतुष्ट करतो, त्याला परमेश्वर ज्ञान, बुद्धी आणि आनंद देतात, परंतु पाप्यांना संपत्ती गोळा करून ती जो व्यक्ती परमेश्वराला प्रसन्न करतो त्याच्या हाती सोपविण्याचे कार्य दिले आहे. हे सुद्धा वार्‍याचा पाठलाग करण्यासारखे व्यर्थ आहे.

  16. एक एकटाच मनुष्य होता; त्याला ना मुलगा होता ना भाऊ. त्याच्या श्रमाला अंत नव्हता, तरी त्याच्या डोळ्यात धनाने तृप्तता नव्हती. तो विचारीत होता, “मी कोणासाठी हे श्रम करीत आहे,” “आणि मी स्वतःला आनंदापासून का वंचित ठेवीत आहे?” हे सुद्धा व्यर्थ आहे— ही दैन्यावस्था आहे.

  17. भूमीचे फळ तर सर्वांसाठी आहे; राजासुद्धा त्याद्वारे नफा मिळवितो.

  18. पैशावर प्रेम असणार्‍याला पैसा कधीच पुरेसा नसतो; जो कोणी संपत्तीवर प्रेम करतो, तो कधीही आपल्या मिळकती मध्ये समाधानी नसतो, हे सुद्धा व्यर्थच आहे.

  19. संपत्ती वाढली म्हणजे, तिचा उपभोग घेणारे सुद्धा वाढतात. आणि ती केवळ आपल्या दृष्टीने बघून आनंदित होण्या व्यतिरिक्त त्या मालकाला काय लाभ?

  20. खाण्यास कमी किंवा भरपूर मिळो कष्टकर्‍याला सुखाची झोप लागते. परंतु श्रीमंताची विपुल संपत्ती त्यांना रात्री झोप येऊ देत नाही.

  21. सूर्याखाली मी एक भयंकर गोष्ट पाहिली: जसे मालकाची हानी होण्यासाठी साठविलेली संपत्ती,

  22. किंवा काही दुर्दैवी व्यवहारामध्ये तो सर्व पैसा गमावून बसतो आणि शेवटी मुलाबाळांकडे वारसाहक्काने मिळण्यास काहीही शिल्लक नसते.

  23. प्रत्येकजण आपल्या आईच्या उदरातून नग्न येतो, आणि जसे सर्वजण येतात, तसेच ते परत जातात. त्यांचे कष्टार्जित असे काहीही त्यांच्या हातात घेऊन ते जाऊ शकत नाहीत.

  24. ही देखील अतिशय भयानक दुष्टता आहे: सर्वजण जसे येतात, तसेच ते जातात, आणि वार्‍यासाठी कष्ट करून त्यांना काय मिळते?

  25. त्यांच्या सर्व दिवसांत ते अंधारात राहून अत्यंत निराशा, यातना आणि क्रोधासह अन्न खातात,