Riches बद्दल बायबलमधील वचने: General references
General references बद्दल वचने
जो देश देण्याचे वचन याहवेह तुमच्या परमेश्वराने तुमचे पूर्वज अब्राहाम, इसहाक व याकोबाला दिले होते, त्या देशात जेव्हा ते तुम्हाला घेऊन जातील व जी तुम्ही स्वतः वसविलेली नाहीत—अशी मोठी व सुंदर शहरे तुम्हाला देतील,
तुम्ही स्वतः भरले नाहीत अशा सर्व चांगल्या वस्तूंनी भरलेली घरे, तुम्ही स्वतः खोदल्या नाहीत अशा विहिरी आणि तुम्ही स्वतः लावले नाहीत असे द्राक्षमळे व जैतुनाचे वृक्ष—तुम्ही ते सर्व खाल आणि तृप्त व्हाल,
ज्या याहवेहने तुम्हाला इजिप्त देशातून, दास्यगृहातून बाहेर आणले त्यांना तुम्ही विसरू नये याची खबरदारी घ्या.
जेव्हा तुम्ही खाल आणि तृप्त व्हाल, याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला उत्तम देश दिल्याबद्दल त्यांचा धन्यवाद करा.
परंतु याच वेळी तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे, नाहीतर तुम्ही आपल्या समृद्धीत याहवेह तुमच्या परमेश्वराला विसराल व त्यांच्या ज्या आज्ञा, नियम व विधी मी तुम्हाला आज देत आहे, त्या पाळण्याचे सोडून द्याल.
कारण जेव्हा तुम्ही खाल आणि तृप्त व्हाल, जेव्हा सुंदर घरे बांधाल आणि त्यात वस्ती कराल,
आणि जेव्हा तुमची शेरडेमेंढरे व गुरे यांची वृद्धी झालेली असेल आणि तुमचे चांदी आणि सोने व तुमची मालमत्ता वाढलेली असेल,
तेव्हा तुमचे अंतःकरण उन्मत्त होईल आणि ज्यांनी तुम्हाला इजिप्त देशाच्या गुलामगिरीतून काढून बाहेर आणले, त्या याहवेह तुमच्या परमेश्वराला तुम्ही विसरून जाल.
विषारी सापाचा आणि विंचवांचा धोका असलेल्या अफाट व भयानक रानातून व उष्ण आणि कोरड्या भूमीतून त्यांनी तुम्हाला आणले. शुष्क भूमीत खडक फोडून तुम्हाला पाणी दिले.
त्यांनी तुम्हाला रानात खावयास मान्ना दिला, जो तुमच्या पूर्वजांना कधीच माहीत नव्हता, यासाठी की त्यांनी तुम्हाला नम्र करावे आणि तुमची परीक्षा घ्यावी, जेणेकरून शेवटी तुमचे भले व्हावे.
तुम्ही आपल्या मनात म्हणाल, “माझ्या शक्तीने व माझ्या हाताच्या बळाने मी हे धन मिळविले आहे.”
परंतु याहवेह तुमच्या परमेश्वराचे स्मरण ठेवा, कारण संपत्ती निर्माण करण्याचे सामर्थ्य केवळ तेच तुम्हाला पुरवितात, आणि आजच्या प्रमाणेच ते तुमच्या पूर्वजांशी शपथपूर्वक केलेल्या कराराची पुष्टी करतात.
जो देश मी त्यांच्या पूर्वजांना शपथ वाहून देऊ केला आहे, त्या दुधामधाचा प्रवाह वाहणार्या देशात, मी त्यांना आणेन आणि ते खाऊन पिऊन तृप्त व संपन्न होतील, तेव्हा ते इतर दैवतांकडे वळतील आणि त्यांची उपासना करू लागतील, माझी उपेक्षा करतील आणि माझा करार मोडतील.
लवकरच यशुरून स्वस्थ झाला आणि लाथा झाडू लागला; खाऊन पिऊन धष्टपुष्ट व आकर्षक झाला. उन्मत्त होऊन त्याने त्याच्या निर्माणकर्त्या परमेश्वराचा तिरस्कार केला, आणि आपल्या तारणदुर्गाचा त्याग केला.
गरिबी आणि संपत्ती याहवेह पाठवितात; ते नम्र करतात आणि उंचही तेच करतात.
दुर्जनांनी दुष्टाईने मिळविलेल्या विपुल धनापेक्षा नीतिमानाचे सीमित धन बरे;
दुष्टाईने मिळविलेल्या संपत्तीस कायमचे मूल्य नसते परंतु धार्मिकता मृत्यूपासून सोडविते.
याहवेहच्या आशीर्वादाने धनसंपत्ती मिळते, त्यासाठी दुःखद परिश्रम करावे लागत नाहीत.
प्रकोपाच्या दिवशी संपत्ती निरुपयोगी असते, परंतु नीतिमत्व मृत्यूपासून सोडविते.
जे आपल्या संपत्तीवर भरवसा ठेवतात, तो नाश पावतील, परंतु नीतिमान मनुष्य हिरव्या पानाप्रमाणे बहरेल.
एखादी व्यक्ती श्रीमंतीचा दिखावा करते, परंतु त्याच्याकडे काहीच नसते; दुसरा एकजण गरीब असल्याचा दिखावा करतो, परंतु त्याच्याकडे खूप संपत्ती असते.
मनुष्याची श्रीमंती त्याच्या जिवासाठी खंडणी देईल, परंतु गरीब मनुष्य अशा धमकीला प्रतिसाद देऊ शकत नाही.
सुज्ञांची संपत्ती त्यांचा मुकुट असतो, परंतु मूर्खांची मूर्खता केवळ मूर्खताच उत्पन्न करते.
नीतिमानाच्या घरात विपुल समृद्धी असते, परंतु दुष्टांची मिळकत विनाश आणते.
अपार समृद्धी व त्यासोबत येणारी संकटे असणे, यापेक्षा याहवेहचे भय बाळगून मिळविलेले थोडेसे धन बरे.