Riches बद्दल बायबलमधील वचने: Guilt of trusting in
Guilt of trusting in बद्दल वचने
“जर मी सोन्यावर भरवसा ठेवला असेन किंवा शुद्ध सोन्याला म्हटले असते की, ‘तू माझा रक्षक आहेस,’
तर या पापांचा सुद्धा न्याय झाला पाहिजे, कारण याप्रकारे सर्वोच्च परमेश्वराशी माझे अविश्वासूपण असते.
तुझी सुज्ञता व समज याद्वारे तू आपल्यासाठी संपत्ती मिळविली आणि आपल्या खजिन्यात सोने आणि चांदीचा साठा केलास.
व्यापारातील तुझ्या महान कुशलतेने तू आपले धन वाढविलेस, आणि तुझ्या संपत्तीमुळे तुझे हृदय गर्विष्ठ झाले आहे.
ते तुला खाली गर्तेत आणतील, आणि तिथे समुद्राच्या मधोमध तुझा भयानक मृत्यू होईल.