मुख्य मजकुरावर जा

Riches बद्दल बायबलमधील वचने

225 वचने · 107 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तरी एक चांगली गोष्ट मी पाहिली: मनुष्याने खावे, प्यावे व परमेश्वराने आपल्याला सूर्याखाली दिलेल्या या थोड्या दिवसाच्या कष्टमय जीवनात जे आहे, त्यात समाधान मानावे—हाच त्यांचा वाटा आहे.

  2. आणि याशिवाय परमेश्वराने जर कोणा मनुष्याला संपत्ती आणि तिचा उपभोग घेण्यासाठी आरोग्य दिले असेल, तर त्यांनी त्या परिश्रमात आनंद करावा—हे त्यांना परमेश्वराचे दान आहे. आनंदाने काम करणे व जीवनात जे वाट्याला येईल त्यात समाधान मानणे, ही खरोखर परमेश्वराची देणगी आहे.

  3. असे करणार्‍याला आपल्या भूतकाळाचे मनन करावे लागत नाही, कारण परमेश्वर त्याचे अंतःकरण आनंदाने भरून ठेवतो.

  4. सूर्याखाली आढळणारी आणखी एक वाईट गोष्ट मला दिसली, जी मानवावर अतिशय भारी आहे:

  5. परमेश्वर काही माणसांना भरपूर संपत्ती, मान सन्मान देतात; त्यांचे हृदय इच्छिते अशा कशाचीही त्यांना वाण पडत नाही. मात्र त्याचा उपभोग घेण्याची क्षमता त्याला देत नाहीत आणि परके त्याचा आनंद उपभोगतात. हे निरर्थक आहे, फार वाईट आहे.

  6. सुज्ञान, हे वतन प्राप्तीप्रमाणे चांगले आहे, आणि ज्यांना सूर्य दिसतो त्यांच्यासाठी ते लाभदायक आहे.

  7. जसे धन तसेच सुज्ञान हे एक आश्रयस्थान आहे, परंतु सुज्ञानाचा फायदा हा आहे: ज्ञान ज्यांच्या मालकीचे आहे, त्यांचे रक्षण करते.

  8. मनोरंजनासाठी मेजवानी असते, द्राक्षारस जीवनाला आनंदित बनविते, आणि पैशाने सर्व समस्याचे समाधान होते.

  9. तुम्ही जे एका घरानंतर दुसरे घर बांधता, आणि जोपर्यंत जागा संपत नाही शेताला शेत जोडून घेतात, आणि मग त्या भूमीवर तुम्ही एकटेच राहता, त्यांना धिक्कार असो.

  10. याहवेहने असे म्हणतात: “शहाण्याने स्वतःच्या शहाणपणाचा अभिमान बाळगू नये. बलाढ्य मनुष्याने बलाचा तोरा मिरवू नये आणि श्रीमंताने श्रीमंतीचा गर्व करू नये.

  11. तित्तर पक्षी आपण न दिलेल्या अंडींना उबवितो अशाप्रकारे अन्यायाने संपत्ती मिळविणारे लोक असतात. अर्ध्या जीवनात त्यांची संपत्ती त्यांना सोडून जाते, आणि आयुष्याच्या अखेरीस ते एक मूर्ख ठरविले जातात.

  12. “माझे अंतःकरण मोआबसाठी जणू बासरीवर शोकगीत गात आहे; कीर-हरेसेथसाठी विलापाने बासरीगत गीत गात आहे. त्यांनी साठविलेली विपुल संपत्ती नाहीशी झाली आहे.

  13. तुझ्या खोर्‍यांचा तू गर्व का करतेस, सुपीक खोर्‍यांची तू बढाई का मारते? हे अमोन्यांच्या अविश्वासू कुमारिके, तुझ्या संपत्तीवर भरवसा करून तू म्हणतेस, माझ्यावर कोण हल्ला करू शकतो?

  14. तुझी सुज्ञता व समज याद्वारे तू आपल्यासाठी संपत्ती मिळविली आणि आपल्या खजिन्यात सोने आणि चांदीचा साठा केलास.

  15. व्यापारातील तुझ्या महान कुशलतेने तू आपले धन वाढविलेस, आणि तुझ्या संपत्तीमुळे तुझे हृदय गर्विष्ठ झाले आहे.

  16. ते तुला खाली गर्तेत आणतील, आणि तिथे समुद्राच्या मधोमध तुझा भयानक मृत्यू होईल.

  17. एफ्राईम बढाई मारतो, “मी फार धनवान आहे; मी श्रीमंत झालो आहे. माझ्या सर्व संपत्तीसह त्यांना माझ्यामध्ये कोणताही अपराध किंवा पाप आढळणार नाही.”

  18. ते लोभीपणाने इतरांची शेते बळकावतात, दुसऱ्यांची घरेही हिसकावून घेतात. ते कपटाने लोकांची घरे बळकावतात आणि त्यांच्या पूर्वजांची संपत्ती लुटतात.

  19. म्हणून याहवेह म्हणतात: “मी या लोकांविरुद्ध विपत्ती योजत आहे, ज्यापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकत नाही. तुम्ही पुन्हा कधीही गर्वाने चालणार नाही, कारण तो आपत्तीचा काळ असेल.

  20. तुमचे श्रीमंत लोक हिंसा करतात; तुमचे रहिवासी लबाड आहेत आणि त्यांची जीभ कपटी गोष्ट बोलते.

  21. “ते सगळे त्याचा उपहास व अपमान करून टोमणा मारून म्हणणार नाहीत काय, “ ‘जो चोरीच्या सामानाचे ढीग लावतो आणि अवैध कामे करून स्वतःला धनवान बनवितो, त्याचा धिक्कार असो! हे असे केव्हापर्यंत चालत राहणार?’

  22. तुमचे कर्जदाते अचानक तुमच्यापुढे येणार नाहीत काय? ते उठून तुमचा थरकाप करणार नाहीत काय? मग तुम्ही त्यांचे सावज बनाल.

  23. कारण तुम्ही पुष्कळ राष्ट्रांची लूट केली आहे, मग जे राहिलेले लोक आहेत, ते तुमची लूट करतील. तुम्ही मनुष्यांचे रक्त वाहिले आहे; तुम्ही देश व नगरांचा आणि त्यात राहणाऱ्या प्रत्येकाचा नाश केला.

  24. त्यांचे सोने किंवा त्यांची चांदी त्यांना याहवेहच्या क्रोधापासून वाचवू शकणार नाही.” त्यांच्या ईर्षेच्या अग्नीने संपूर्ण पृथ्वी भस्म होईल, कारण जे सर्व पृथ्वीवर रहिवास करतात त्यांचा ते अकस्मातपणे अंत करतील.

  25. ‘रुपे माझे आहे व सोनेही माझे आहे,’ सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात.