Skip to content

Prudence बद्दल बायबलमधील वचने

192 वचने · 40 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जे कोणी त्यांच्या तोंडावर आणि त्यांच्या जिभेवर नियंत्रण ठेवतात, ते संकटापासून दूर राहतात.

  2. सुज्ञ मनुष्य धोका ओळखतो आणि आश्रयास जातो, परंतु भोळा मनुष्य पुढे जात राहतो आणि दंड भोगतो.

  3. जसा श्रीमंत गरिबावर सत्ता चालवितो, तसाच कर्जदार आपल्या सावकाराचा नोकर होतो.

  4. वचन देऊन हात मिळवणी करणार्‍यासारखे तुम्ही होऊ नका किंवा कर्जाचे जामीन होऊ नका;

  5. जर तुमच्याकडे कर्ज फेडण्यास पैसे नसतील तर ते तुमचे अंथरूणसुद्धा काढून घेतील.

  6. जेव्हा तू अधिकार्‍यांबरोबर भोजन करतोस, तेव्हा तुझ्यासमोर काय आहे हे चांगले लक्षात घे,

  7. आणि जर तू खादाड असशील तर तुझ्या गळ्यावर सुरी लाव.

  8. त्याच्या स्वादिष्ट पदार्थांची हाव धरू नकोस, कारण ते भोजन फसविणारे आहे.

  9. मूर्ख माणसांबरोबर बोलू नकोस, कारण ते तुझ्या समंजस शब्दांचा तिरस्कार करतील.

  10. लढाईवर जाण्यासाठी निश्चितच तज्ञांच्या मार्गदर्शनाची गरज असते, कारण अनेक सल्लागारांद्वारे विजय प्राप्त होते.

  11. तुझे बाहेरचे काम योग्यप्रकारे पूर्ण कर आणि तुझे शेत तयार कर; त्यानंतर, तुझे घर बांध.

  12. ते न्यायालयात नेण्याची घाई करू नकोस, कारण जर तुझा शेजारी तुला फजीत करेल, तर शेवटी तू काय करशील?

  13. जर तू तुझ्या शेजार्‍याला न्यायालयात घेऊन जातोस तर, दुसर्‍याच्या विश्वासाला धोका देऊ नकोस,

  14. नाहीतर तो ऐकणारा तुला निर्लज्ज ठरवेल आणि तुझ्याविरुद्ध तो दावा दाखल करेल.

  15. मूर्खाला त्याच्या मूर्खतेप्रमाणे उत्तर देऊ नको, नाहीतर तू सुद्धा त्याच्यासारखाच होशील.

  16. मूर्खाला त्याच्या मूर्खतेला योग्य असे उत्तर द्या, नाहीतर तो स्वतःला शहाणा समजू लागेल.

  17. सुज्ञ मनुष्य धोका ओळखतो आणि आश्रयास जातो, परंतु भोळा मनुष्य पुढे जात राहतो आणि दंड भोगतो.

  18. टवाळी करणारे शहरात गोंधळ करतात, परंतु सुज्ञ लोक राग घालवून टाकतात.

  19. मूर्ख त्याच्या रागाच्या उद्रेकाला पूर्ण वाट करून देतो, परंतु सुज्ञ माणसे शेवटी शांती प्रस्थापित करतात.

  20. ती शेत घेण्याचा विचार करते, आणि ते विकत घेते; तिच्या मिळकतीमधून ती द्राक्षमळा लावते.

  21. तिचे शब्द सुज्ञपणाचे आहेत. तिच्या जिभेवर विश्वासूपणाचे शिक्षण असते.

  22. अति नीतिमान होऊ नका, किंवा अति सुज्ञानीही असू नका— तुम्ही स्वतःचा नाश का करून घ्यावा?

  23. अति दुष्ट होऊ नका, आणि मूर्खही असू नका— तुमची वेळ येण्यापूर्वी का मरावे?

  24. मी म्हणतो, राजाच्या आज्ञेचे पालन करा, कारण तशी तुम्ही परमेश्वरासमोर शपथ घेतली आहे.

  25. राजाची उपस्थिती सोडण्याची घाई करू नका. परंतु एखाद्या वाईट गोष्टींच्या बाजूने उभे राहू नका, कारण राजा त्याला योग्य वाटेल ते करतो.