Skip to content

Prudence बद्दल बायबलमधील वचने

192 वचने · 40 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “कैसराचे!” त्यांनी उत्तर दिले. “मग,” येशू म्हणाले, “जे कैसराचे आहे, ते कैसराला द्या आणि जे परमेश्वराचे आहे ते परमेश्वराला द्या.”

  2. मूर्ख कुमारींनी दिव्यांबरोबर आपले तेल घेतले नाही.

  3. “त्यांनी उत्तर दिले, ‘नाही, ते तुम्हास व आम्हास पुरणार नाही. तुम्ही तेल विकणार्‍यांकडे जा आणि स्वतःसाठी विकत आणा.’

  4. “योग्य बोललात, गुरुजी” त्या मनुष्याने उत्तर दिले, “परमेश्वर ‘एकच आहेत आणि त्यांच्याशिवाय दुसरे परमेश्वर नाहीत’ हे आपण बरोबर सांगितले आहे.

  5. त्यांच्यावर पूर्ण अंतःकरणाने आणि तुमच्या पूर्ण जिवाने आणि तुमच्या पूर्णशक्तीने प्रीती करणे आणि जशी स्वतःवर तशी तुमच्या शेजार्‍यावर प्रीती करणे, हे सर्व प्रकारची होमार्पणे व बली वाहण्यापेक्षा फारच महत्त्वाचे आहे.”

  6. त्याने सुज्ञतेने उत्तर दिले आहे हे पाहून येशू त्याला म्हणाले, “तू परमेश्वराच्या राज्यापासून दूर नाहीस.” आणि तेव्हापासून कोणी त्यांना आणखी प्रश्न विचारावयास धजले नाहीत.

  7. “समजा कोणा एकास बुरूज बांधावयाचा असेल, तर प्रथम बसून खर्चाचा नीट अंदाज करून व तो पूर्ण करण्यासाठी पुरेसे पैसे आहे की नाही याचा अंदाज घेत नाही का?

  8. कारण जर तुम्ही पाया घातला आणि नंतर जर तो पूर्ण करण्यास समर्थ झाला नाही, तर ते पाहून प्रत्येकजण त्याची थट्टा करतील.

  9. म्हणतील, ‘या मनुष्याने बांधण्यास सुरुवात केली खरी, पण तो पूर्ण करू शकला नाही.’

  10. “किंवा असा कोण राजा आहे, जो दुसर्‍या राजाच्या विरुद्ध युद्धास जाणार आहे. तो बसून विचार करणार नाही का, जो वीस हजार सैनिक घेऊन येत आहे त्याच्याविरुद्ध लढण्यासाठी त्याला दहा हजारांना घेऊन जाणे शक्य होईल का?

  11. जर त्याला हे शक्य नसेल, तर शत्रू दूर आहे तेव्हाच शांतीच्या प्रस्तावाचे बोलणे करण्यासाठी प्रतिनिधीमंडळ पाठवेल.

  12. परंतु गमालियेल नावाचा एक परूशी, जो शास्त्राध्यापक व सर्व लोकांमध्ये सन्मान्य मानलेला, न्यायसभेपुढे उभा राहिला आणि त्याने या माणसांना थोडा वेळ बाहेर न्यावे, अशी आज्ञा केली.

  13. मग तो न्यायसभेला उद्देशून म्हणाला, “अहो इस्राएली लोकहो, या मनुष्यांच्या बाबतीत काही करण्याच्या तुमच्या उद्देशाचा काळजीपूर्वक विचार करा.

  14. काही काळापूर्वी थुदास नावाचा मनुष्य पुढे येऊन मी कोणीतरी आहे असे म्हणू लागला, त्याला सुमारे चारशे अनुयायी मिळाले. त्याचा वध करण्यात येऊन सर्व अनुयायांची पांगापांग झाली व सर्वकाही नष्ट झाले.

  15. त्याच्यानंतर शिरगणतीच्या वेळी, गालीलकर यहूदाह पुढे आला आणि त्याने एका टोळीस बंडास प्रवृत्त केले. परंतु तो सुद्धा मारला गेला आणि त्याच्या अनुयायांचीही पांगापांग झाली.

  16. म्हणून मी तुम्हाला या सद्य परिस्थितीत असा सल्ला देत आहे की या माणसांना सोडून द्या. त्यांना जाऊ द्या, कारण हा बेत किंवा कार्य मनुष्यांचे असेल, तर ते नष्ट होईल.

  17. परंतु जर हे परमेश्वराचे असेल, तर तुम्ही या माणसांना थांबविण्यास समर्थ होणार नाही आणि तुम्ही केवळ परमेश्वराविरुद्ध लढत आहात, असे तुम्हाला आढळून येईल.”

  18. सेर्गियोस पौलुस नावाच्या राज्यपालाचा तो एक सेवक होता. सेर्गियोस पौलुस हा बुद्धिमान व ज्ञानी मनुष्य होता. या राज्यपालाने बर्णबा व शौलना बोलाविले, कारण परमेश्वराचे वचन ऐकण्याची त्याची इच्छा होती.

  19. नंतर पौलाला, समजले की तिथे उपस्थित असलेल्या लोकांमध्ये काही सदूकी आहेत आणि इतर परूशी आहेत, तेव्हा पौल न्यायसभेच्या समोर म्हणाला, “बंधूंनो, माझे पूर्वज परूशी होते, त्यांच्याप्रमाणे मी परूशी आहे आणि माझी आशा व मृतांचे पुनरुत्थान यामुळे माझी चौकशी होत आहे.”

  20. तुमच्या दृष्टीने जे चांगले ते तुम्हाला माहीत आहे, त्याबद्दल वाईट बोलण्याचा प्रसंग आणू नका.

  21. कारण असे लिहिले आहे: “ज्ञानी लोकांचे ज्ञान मी नष्ट करेन. बुद्धिमानाची बुद्धी मी निष्फळ करेन.”

  22. तुम्ही म्हणाल, “मला काहीही करण्याची मुभा आहे,” पण सर्वच गोष्टी हिताच्या नसतात. “मला काहीही करण्याची मुभा असली” तरी कोणत्याही गोष्टींची सत्ता मजवर चालणार नाही.

  23. परंतु अन्न आपल्याला परमेश्वराच्या जवळ नेत नाही; जर आपण खात नाही तर आपली हानी होत नाही आणि जर खातो तर काही अधिक चांगले होत नाही.

  24. तरी तुमच्या या अधिकाराचा उपयोग करीत असताना जे दुर्बल आहेत त्यांना अडखळण होऊ नये म्हणून सावधगिरी बाळगा.

  25. कारण एखाद्या दुबळ्या विवेकबुद्धीच्या मनुष्याने तुमच्यासारख्या ज्ञानी व्यक्तीला मूर्तीच्या मंदिरामध्ये अन्न खातांना पाहिले तर ते मूर्तीला वाहिलेले खाण्याचे त्याला धैर्य प्राप्त होणार नाही का?