- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Prudence बद्दल बायबलमधील वचने: General references
General references बद्दल वचने
कारण कानाला शब्दाची पारख आहे जशी जिभेला अन्नाची चव आहे.
आमच्यासाठी जे योग्य ते जाणून घेऊ या; आणि जे उत्तम ते एकत्र शिकू या.
संगीत दिग्दर्शकासाठी. यदूथून याकरिता दावीदाचे स्तोत्र. मी स्वतःशी म्हणालो, “मी आपले आचरण जपणार आणि माझी जीभ पापापासून जपणार; अनीतिमान लोक माझ्याभोवती असतील, तेव्हा मी माझ्या मुखाला मुसक्या बांधीन.”
ज्यांचे अंतःकरण उदार असून ते मुक्तपणे उसने देतात त्यांचे भले होते, जे आपला व्यवहार न्यायाने करतात.
माझ्या मुला, जर तू तुझ्या शेजार्याला जामीन राहिला आहेस, जर अनोळखी व्यक्तीचे कर्ज फेडण्यास तू वचनबद्ध झालास,
तर तू जे काही बोललास, त्यामुळे तू जाळ्यात सापडला आहेस, तुझ्या मुखातील वचनाने तू स्वतःला पाशात गुंतवून घेतले आहेस.
मी, सुज्ञान, सुज्ञतेबरोबर सहवास करते; ज्ञान आणि विवेक माझ्याकडे आहेत.
चहाडी करण्याने विश्वासघात होतो, परंतु विश्वासपात्र मनुष्य गुपित उघड करीत नाही.
अपरिचितासाठी जामीन राहिल्यास निश्चितच नुकसान होते, परंतु जो जामीनकीच्या हात मिळवणी नकार देतो तो सुरक्षित राहतो.
जो कोणी त्याच्या कुटुंबाचा नाश करतो, त्याला वारसा म्हणून केवळ वारा मिळेल, आणि मूर्खाला शहाण्याचा दास व्हावे लागेल.
मनुष्याची प्रशंसा त्याच्या सुज्ञतेच्या प्रमाणात होते, परंतु विकृत बुद्धीचा मनुष्य घृणित लेखला जातो.
मूर्ख आपला क्रोध तत्काळ दर्शवितो, परंतु सुज्ञ मनुष्य अपमानाकडे दुर्लक्ष करतो.
सुज्ञ मनुष्य आपले ज्ञान प्रकट करीत नाही, परंतु मूर्खाचे हृदय मूर्खपणाचे प्रसरण करतात.
जे सर्व समंजस असतात ते सुज्ञतेने वागतात, परंतु मूर्ख माणसे त्यांचा मूर्खपणा उघड करतात.
सुज्ञाची सुज्ञता त्याला योग्य मार्ग दाखविते, पण मूर्खाची मूर्खता धोका आहे.
साधीभोळी माणसे कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवतात. परंतु सुज्ञ विचारपूर्वक पाऊल उचलतो.
सुज्ञ मनुष्य याहवेहचे भय बाळगतो आणि वाईटापासून दूर राहतो. परंतु मूर्ख तापट डोक्याचा आहे आणि तरीही त्याला सुरक्षित वाटते.
साध्याभोळ्याला मूर्खपणाचा वारसा मिळतो, तर सुज्ञाला सुज्ञतेचा मुकुट मिळतो.
मूर्ख पुत्र आपल्या आईवडिलांचा सल्ला तुच्छ मानतो, पण जो सुधारणा अंमलात आणतो, तो सुज्ञपणा दाखवितो.
उपयुक्त सल्लागार नसले की योजना विफल होतात; परंतु अनेक सल्लागारांमुळे योजना यशस्वी होतात.
जो कोणी शिक्षणाकडे काळजीपूर्वक लक्ष देतो, त्याची समृद्धी होते, आणि जो याहवेहवर भरवसा ठेवतो तो आशीर्वादित असतो.
सुज्ञ अंतःकरण समंजस म्हणून ओळखले जाते, आणि मधुर वचनांनी शिक्षणाला प्रोत्साहन मिळते.
सुज्ञ गुलाम आपल्या धन्याच्या लज्जास्पद मुलावर सत्ता गाजवील, आणि कुटुंब सभासदाप्रमाणे मालमत्तेत वाटा मिळवील.
जो हस्तांदोलन करून शपथ घेऊन शेजार्याच्या कर्जफेडीची हमी घेतो, तो विवेकहीन मनुष्य आहे.
विवेकशील मनुष्याचे अंतःकरण ज्ञान आत्मसात करते. सुज्ञाचे कान ज्ञानाचा शोध घेतात.