Skip to content

Jabbok

7 verses

32.1900, 35.6700 गूगल नकाशावर पाहा

Jabbok चा उल्लेख असलेली वचने

  1. परंतु त्या रात्रीच याकोब उठला आणि त्याने त्याच्या दोन्ही पत्नी व उपपत्नी आणि अकरा मुले यांना जागे केले आणि यार्देन नदीच्या किनार्‍याने त्यांना यब्बोक नदीच्या उताराने पार नेले

  2. परंतु इस्राएलने त्याला तलवारीवर धरले आणि आर्णोन नदीपासून यब्बोक नदीपर्यंत, अम्मोनी लोक राहतात तिथपर्यंत त्यांच्या देशावर कब्जा केला, कारण त्यांची सीमा तटबंदची होती.

  3. मात्र याहवेह आमच्या परमेश्वराच्या आज्ञेनुसार अम्मोनी लोकांच्या प्रदेशापासून आम्ही दूरच राहिलो. तसेच यब्बोक नदी व त्या डोंगराळ प्रदेशात वसलेल्या शहरापासूनही आम्ही दूर राहिलो.

  4. रऊबेन आणि गाद यांना मात्र गिलआद देशातील यब्बोक नदीपासून ते आर्णोन नदीच्या खोर्‍याच्या मध्यापर्यंतचा सर्व भाग मिळाला. गिलआद ही अम्मोन लोकांची सीमा होती.

  5. हेशबोन येथे राज्य करणारा अमोर्‍यांचा राजा सीहोन. त्याच्या राज्याचा विस्तार आर्णोन खोर्‍याच्या कडेवरील अरोएर शहरापासून आणि आर्णोन खोर्‍याच्या मध्यभागापासून अम्मोनी लोकांच्या सीमेवरील यब्बोक नदीपर्यंत होता. यामध्ये अर्ध्या गिलआदाचा समावेश होता.

  6. अम्मोन्यांच्या राजाने इफ्ताहाच्या दूतांना उत्तर दिले, “जेव्हा इस्राएली लोक इजिप्त देशामधून बाहेर आले, तेव्हा आर्णोन नदीपासून यब्बोक आणि यार्देन या नद्यांपर्यंतचा सर्व मुलूख त्यांनी हिरावून घेतला होता. आता तो शांततेने परत केला जावा.”

  7. आर्णोन ते यब्बोकपर्यंत आणि वाळवंटापासून यार्देनपर्यंत अमोर्‍यांचा सर्व प्रदेश काबीज केला.