Skip to content

Prudence बद्दल बायबलमधील वचने

192 वचने · 40 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. अपरिचितासाठी जामीन राहिल्यास निश्चितच नुकसान होते, परंतु जो जामीनकीच्या हात मिळवणी नकार देतो तो सुरक्षित राहतो.

  2. जो कोणी त्याच्या कुटुंबाचा नाश करतो, त्याला वारसा म्हणून केवळ वारा मिळेल, आणि मूर्खाला शहाण्याचा दास व्हावे लागेल.

  3. मनुष्याची प्रशंसा त्याच्या सुज्ञतेच्या प्रमाणात होते, परंतु विकृत बुद्धीचा मनुष्य घृणित लेखला जातो.

  4. मूर्ख आपला क्रोध तत्काळ दर्शवितो, परंतु सुज्ञ मनुष्य अपमानाकडे दुर्लक्ष करतो.

  5. सुज्ञ मनुष्य आपले ज्ञान प्रकट करीत नाही, परंतु मूर्खाचे हृदय मूर्खपणाचे प्रसरण करतात.

  6. जे सर्व समंजस असतात ते सुज्ञतेने वागतात, परंतु मूर्ख माणसे त्यांचा मूर्खपणा उघड करतात.

  7. सुज्ञाची सुज्ञता त्याला योग्य मार्ग दाखविते, पण मूर्खाची मूर्खता धोका आहे.

  8. साधीभोळी माणसे कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवतात. परंतु सुज्ञ विचारपूर्वक पाऊल उचलतो.

  9. सुज्ञ मनुष्य याहवेहचे भय बाळगतो आणि वाईटापासून दूर राहतो. परंतु मूर्ख तापट डोक्याचा आहे आणि तरीही त्याला सुरक्षित वाटते.

  10. साध्याभोळ्याला मूर्खपणाचा वारसा मिळतो, तर सुज्ञाला सुज्ञतेचा मुकुट मिळतो.

  11. मूर्ख पुत्र आपल्या आईवडिलांचा सल्ला तुच्छ मानतो, पण जो सुधारणा अंमलात आणतो, तो सुज्ञपणा दाखवितो.

  12. उपयुक्त सल्लागार नसले की योजना विफल होतात; परंतु अनेक सल्लागारांमुळे योजना यशस्वी होतात.

  13. जो कोणी शिक्षणाकडे काळजीपूर्वक लक्ष देतो, त्याची समृद्धी होते, आणि जो याहवेहवर भरवसा ठेवतो तो आशीर्वादित असतो.

  14. सुज्ञ अंतःकरण समंजस म्हणून ओळखले जाते, आणि मधुर वचनांनी शिक्षणाला प्रोत्साहन मिळते.

  15. सुज्ञ गुलाम आपल्या धन्याच्या लज्जास्पद मुलावर सत्ता गाजवील, आणि कुटुंब सभासदाप्रमाणे मालमत्तेत वाटा मिळवील.

  16. जो हस्तांदोलन करून शपथ घेऊन शेजार्‍याच्या कर्जफेडीची हमी घेतो, तो विवेकहीन मनुष्य आहे.

  17. विवेकशील मनुष्याचे अंतःकरण ज्ञान आत्मसात करते. सुज्ञाचे कान ज्ञानाचा शोध घेतात.

  18. उपहार तो देणार्‍याचा मार्ग मोकळा करते, तो तुम्हाला थोर लोकांच्या पुढे घेऊन जाईल!

  19. योग्य ज्ञान असल्याशिवाय इच्छा धरणे चांगले नाही— घाई करणारे पाय कितीदा असे मार्ग चुकवितात!

  20. मनुष्याची सुज्ञता त्याला मंदक्रोधी राखते; आणि चुकांकडे दुर्लक्ष करणे त्याची प्रतिष्ठा असते.

  21. मनुष्याच्या अंतःकरणाचे उद्देश हे खोल पाण्यासारखे आहेत, परंतु ज्याच्याकडे अंतर्दृष्टी असते तो त्या उद्देशांना ओढून बाहेर काढतो.

  22. जो अनोळखी व्यक्तीला जामीन राहतो त्याचे वस्त्र काढून घे; जर ते परक्यासाठी केले असेल तर ते गहाण म्हणून घे.

  23. सल्ला घेऊन योजना स्थापल्या जातात; म्हणून युद्ध करण्यापूर्वी योग्य मार्गदर्शन मिळव.

  24. कष्ट करणार्‍यांच्या योजना भरभराटीस येतात, पण उतावळेपणा दारिद्र्यास कारणीभूत होईल.

  25. शहाणा मनुष्य उत्कृष्ट भोजन आणि जैतून तेलाचा साठा करतो, पण मूर्ख मिळेल ते सर्व गिळून टाकतो.