मुख्य मजकुरावर जा

Kings बद्दल बायबलमधील वचने

580 वचने · 175 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्यांनी त्याची शस्त्रे त्यांच्या दैवतांच्या मंदिरात ठेवली आणि त्याचे शिर दागोनाच्या मंदिरात टांगले.

  2. पलिष्टी लोकांनी शौलाचे काय केले हे जेव्हा याबेश-गिलआदच्या रहिवाशांनी ऐकले,

  3. तेव्हा त्यांचे सर्व शूर पुरुष रणांगणावर गेले व त्यांनी शौल आणि त्याच्या पुत्रांचे मृतदेह याबेश येथे परत आणले. त्यांच्या अस्थी याबेश येथील एला झाडाखाली पुरल्या आणि सात दिवस उपास केला.

  4. याहवेहशी अविश्वासू राहिल्यामुळे शौलाला मृत्यू आला; कारण त्याने याहवेहची आज्ञा न पाळता, एका भूतविद्याप्रवीण स्त्रीचा सल्ला घेतला,

  5. आणि याहवेहचे मार्गदर्शन नाकारले, यामुळे याहवेहने त्याचा वध केला आणि त्याचे राज्य इशायाचा पुत्र दावीदास सोपविले.

  6. “तरीपण याहवेह इस्राएलच्या परमेश्वराने माझ्या सर्व घराण्यातून इस्राएलावर सदासर्वदा राज्य करण्यासाठी मला राजा म्हणून निवडले आहे. त्यांनी प्रथम यहूदाहच्या गोत्राची आणि या गोत्रातून माझ्या पित्याच्या घराण्याची आणि माझ्या पित्याच्या सर्व पुत्रांमधून माझी निवड करून आनंद मानला असून मला इस्राएलावर राजा केले आहे.

  7. याहवेहने मला पुष्कळ पुत्र दिलेले आहेत—माझ्या अनेक पुत्रांमधून—याहवेहने इस्राएलींच्या राजगादीवर बसण्यासाठी माझा पुत्र शलोमोन याची निवड केली.

  8. याहवेहने मला सांगितले: ‘तुझा पुत्र शलोमोन माझे मंदिर आणि अंगण बांधील, कारण मी त्याला माझा पुत्र म्हणून निवडले आहे आणि मी त्याचा पिता होईन.

  9. रेहोबोअम शेखेम येथे गेला, कारण इस्राएलचे सर्व लोक त्याला राजा करावे म्हणून तिथे गेले होते.

  10. जेव्हा नेबाटाचा पुत्र यरोबोअमने हे ऐकले (तो अजूनही इजिप्त देशातच होता तिथे तो शलोमोन राजापासून पळून गेला होता), तो इजिप्तवरून परत आला होता.

  11. तेव्हा त्यांनी यरोबोअमला बोलावून घेतले, मग तो आणि संपूर्ण इस्राएल रेहोबोअमकडे गेले व त्याला म्हणाले:

  12. “तुमच्या पित्याने आमच्यावर भारी जू ठेवले होते, तर आता मजुरीचा हा कठीण भार व हे भारी जू तुम्ही हलके करावे, म्हणजे आम्ही तुमची सेवा करू.”

  13. रेहोबोअमने उत्तर दिले, “माघारी जा आणि तीन दिवसांनी परत माझ्याकडे या.” तेव्हा लोक माघारी गेले.

  14. तेव्हा त्याचा पिता शलोमोनच्या जीवनकाळात त्यांची सेवा केलेल्या वडीलजनांना रेहोबोअम राजाने विचारले, तो म्हणाला, “या लोकांना मी काय उत्तर द्यावे असे तुम्हाला वाटते?”

  15. त्यांनी उत्तर दिले, “जर तुम्ही या लोकांना दया दाखविली आणि त्यांना संतुष्ट केले व त्यांना अनुकूल उत्तर दिले, तर ते नेहमीच तुमचे सेवक म्हणून राहतील.”

  16. पण रेहोबोअमने वडीलजनांचा सल्ला नाकारला आणि त्याच्याबरोबर वाढलेल्या व त्याच्या सेवेत असलेल्या तरुण पुरुषांचा सल्ला घेतला.

  17. त्याने त्यांना विचारले, “जे लोक मला म्हणतात, ‘तुझ्या पित्याने आमच्यावर घातलेले जू हलके करावे,’ त्यांना मी काय उत्तर द्यावे?”

  18. त्याच्याबरोबर वाढलेल्या तरुणांनी उत्तर दिले, “हे लोक तुम्हाला म्हणाले आहेत की, ‘तुमच्या पित्याने आमच्यावर भारी जू ठेवले होते, तर आता हे भारी जू तुम्ही हलके करावे.’ आता त्यांना सांग, ‘माझी करंगळी माझ्या पित्याच्या कमरेपेक्षाही जाड आहे.

  19. माझ्या पित्याने तुमच्यावर भारी जू लादले; मी ते अजून भारी करेन. माझ्या पित्याने तुम्हाला चाबकाने मारले; तर मी तुम्हाला विंचवांनी मारीन.’ ”

  20. तीन दिवसानंतर यरोबोअम व सर्व लोक रेहोबोअमकडे आले, कारण राजाने त्यांना सांगितले होते, “तीन दिवसांनी माझ्याकडे परत या.”

  21. वडील लोकांनी दिलेल्या सल्ल्याला नाकारत रेहोबोअम राजाने त्यांना कठोरपणे उत्तर दिले,

  22. तरुणांच्या सल्ल्याचे अनुसरण करीत तो म्हणाला, “माझ्या पित्याने तुमचे जू भारी केले; मी ते अजून भारी करेन. माझ्या पित्याने तुम्हाला चाबकाने मारले; तर मी तुम्हाला विंचवांनी मारीन.”

  23. अशाप्रकारे राजाने लोकांचे म्हणणे मानले नाही, कारण शिलोनी संदेष्टा अहीयाहच्याद्वारे परमेश्वराने नेबाटाचा पुत्र यरोबोअमला सांगितलेल्या वचनांची पूर्तता व्हावी म्हणून या घटना याहवेहकडून घडून आल्या होत्या.

  24. राजाने आपले म्हणणे ऐकले नाही असे जेव्हा इस्राएलच्या सर्व लोकांनी पाहिले, तेव्हा त्यांनी राजाला उत्तर दिले: “दावीदामध्ये आमचा काय वाटा, इशायच्या मुलाशी आमचा काय भाग, इस्राएला, तुझ्या डेर्‍यांपाशी जाऊन! दावीदा, आपल्या स्वतःचे घर सांभाळ!” असे म्हणत इस्राएलचे सर्व लोक परत घरी गेले.

  25. इस्राएलचा राजा यरोबोअमच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी अबीयाह यहूदीयाचा राजा झाला.