मुख्य मजकुरावर जा

Kings बद्दल बायबलमधील वचने

580 वचने · 175 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आमोनच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याविरुद्ध कट रचला आणि राजाची त्याच्या राजवाड्यात हत्या केली.

  2. तेव्हा त्या देशातील लोकांनी आमोन राजाविरुद्ध ज्यांनी कट रचला होता, त्या सर्वांना ठार मारले आणि त्यांनी त्याचा पुत्र योशीयाहला त्याच्या जागेवर राजा केले.

  3. आमोनाच्या कारकिर्दीतील इतर घटना, आणि त्याने जे सर्व केले, हे यहूदीयाच्या राजांचा इतिहासग्रंथात नमूद केलेले नाही काय?

  4. उज्जाच्या बागेत त्याला त्याच्याच कबरेत मूठमाती देण्यात आली. आणि त्याच्या ठिकाणी त्याचा पुत्र योशीयाह राजा झाला.

  5. वयाच्या तेविसाव्या वर्षी यहोआहाज राजा झाला आणि त्याने तीन महिने यरुशलेमात राज्य केले, त्याच्या आईचे नाव हमूटल असे होते; ती लिब्नाह येथील यिर्मयाहची कन्या होती.

  6. त्याने आपल्या पूर्वजांच्या प्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते केले.

  7. त्याने यरुशलेमात राज्य करू नये म्हणून फारोह नखोने त्याला हमाथातील रिब्लाह येथे बेड्या घालून ठेवले. फारोह नखोने यहूदीयावर शंभर तालांत चांदी आणि एक तालांत सोने असा कर लादला.

  8. वयाच्या अठराव्या वर्षी यहोयाखीन राजा झाला, आणि त्याने यरुशलेमात तीन महिने राज्य केले. त्याच्या आईचे नाव नेहूष्टा होते. ती एलनाथानची कन्या असून यरुशलेमची होती.

  9. त्याने त्याच्या पित्याप्रमाणेच याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते केले.

  10. त्याच्याच कारकिर्दीत बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरच्या सैन्याने यरुशलेमावर स्वारी करून शहरास वेढा दिला,

  11. आणि त्याचे अधिकारी हा वेढा घालत असताना बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर स्वतः शहरात आला.

  12. यहूदीयाचा राजा यहोयाखीन, त्याची आई, त्याचे सेवक, त्याच्या राजघराण्यातील सेवक आणि त्याचे अधिकारी हे सर्व त्याला शरण गेले. बाबेलचा राजाच्या कारकिर्दीच्या आठव्या वर्षी, त्याने यहोयाखीनला कैदी बनविले.

  13. याहवेहने घोषणा केल्याप्रमाणे, नबुखद्नेस्सरने याहवेहच्या मंदिरातील व राजवाड्यातील सर्व संपत्ती लुटून नेली आणि इस्राएलाच्या शलोमोन राजाने याहवेहच्या मंदिरासाठी ठेवलेले सोन्याचे कटोरे तोडून त्यांचे तुकडे केले.

  14. यरुशलेम येथील लोक त्याने बंदिवासात नेले: सर्व अधिकारी आणि लढाऊ पुरुष आणि सर्व कुशल कामगार आणि कारागीर—एकूण दहा हजार. देशात फक्त सर्वात गरीब लोक उरले.

  15. नबुखद्नेस्सर यहोयाखीनला बंदी करून बाबेलला घेऊन गेला. त्याने राजाची आई, त्याच्या पत्नी, त्याचे अधिकारी आणि देशातील प्रतिष्ठित लोकांना देखील यरुशलेमहून बाबेलला नेले.

  16. बाबेलच्या राजाने युद्धासाठी सक्षम आणि बलवान योद्धांचे संपूर्ण सात हजार सैन्य आणि एक हजार कुशल कारागीर आणि लोहार बाबेलला नेले.

  17. पलिष्ट्यांनी इस्राएलविरुद्ध युद्ध केले; इस्राएली लोक त्यांच्यापुढून पळून गेले, आणि गिलबोआ डोंगरावर पुष्कळजण मारले गेले.

  18. पलिष्ट्यांनी शौल आणि त्याच्या पुत्रांचा आवेशाने पाठलाग केला आणि त्याचे पुत्र योनाथान, अबीनादाब आणि मलकी-शुआ यांना ठार मारले.

  19. शौलाच्या सर्व बाजूंनी युद्ध भयंकर वाढत गेले आणि जेव्हा धनुर्धऱ्यांनी त्याला गाठले व त्याला जखमी केले.

  20. तेव्हा शौल त्याच्या शस्त्रवाहकाला म्हणाला, “तुझी तलवार उपस आणि मला आरपार भोसक, नाहीतर हे बेसुंती लोक येऊन माझी विटंबना करतील.” परंतु त्याचा शस्त्रवाहक घाबरून गेला होता आणि तो तसे करेना; तेव्हा शौलाने त्याची स्वतःची तलवार घेतली आणि तिच्यावर तो पडला.

  21. जेव्हा शस्त्रवाहकाने पाहिले की शौल मरण पावला आहे, तेव्हा तो सुद्धा आपल्या तलवारीवर पडला आणि मरण पावला.

  22. अशाप्रकारे शौल आणि त्याचे तीन पुत्र मरण पावले, त्याचे सर्व कुटुंब एकत्रच मृत्यू पावले.

  23. जेव्हा खोर्‍यात असलेल्या इस्राएली लोकांनी पाहिले की सैन्याने पळ काढला आहे आणि शौल आणि त्याचे पुत्र मरण पावले आहेत, तेव्हा त्यांनी त्यांची नगरे सोडली आणि तिथून पलायन केले. पलिष्ट्यांनी येऊन तिथे वस्ती केली.

  24. दुसर्‍या दिवशी जेव्हा पलिष्टी लोक मेलेल्या लोकांच्या वस्तू लुटण्यासाठी आले, तेव्हा त्यांना गिलबोआ डोंगरावर शौल आणि त्याचे पुत्र मृत होऊन पडलेले दिसले.

  25. त्यांनी शौलास लुबाडून, त्याचे शिर व त्याचे शस्त्र काढून घेतले आणि पलिष्ट्यांच्या संपूर्ण देशामध्ये आणि त्यांच्या मूर्तींमध्ये आणि आणि त्यांच्या लोकांमध्ये जाहीर करण्यास संदेशवाहक पाठवले.