Skip to content

Commerce बद्दल बायबलमधील वचने

82 वचने · 64 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. योसेफाला आपले बोलणे समजत असेल असे त्यांना वाटले नाही, कारण तो दुभाषी वापरत होता.

  2. तो तिथून बाहेर पडला व रडू लागला, थोड्या वेळाने तो परत आला आणि त्याने शिमओनाची निवड करून त्याला त्यांच्या डोळ्यांसमक्ष बांधून घेतले.

  3. नंतर योसेफाने आपल्या नोकरांना त्यांची पोती धान्याने भरण्यास सांगितले; पण त्याचवेळी त्याने प्रत्येक भावाने दिलेले पैसे ज्याच्या त्याच्या पोत्यात ठेवून द्यावे अशी सूचना दिली. त्याने आपल्या भावांना प्रवासासाठी अन्नसामुग्री देण्याचा आदेश दिला.

  4. शेवटी त्यांनी धान्याची पोती गाढवांवर लादली आणि ते घरी जाण्यास निघाले.

  5. परंतु ते रात्रीच्या मुक्कामासाठी थांबले असताना त्यांच्यापैकी एकाने गाढवांना देण्यासाठी थोडे धान्य काढले. धान्य काढीत असताना आपले पैसे पोत्याच्या तोंडाशी असलेले त्याला दिसले.

  6. तो आपल्या भावांना म्हणाला, “अरे हे काय? माझे पैसे माझ्या पोत्यातच आहेत!” ते सर्वजण भयभीत झाले. भयाने थरथर कापत ते एकमेकास म्हणाले, “परमेश्वराने आपल्याशी हे काय केले?”

  7. कनान देशात ते आपले पिता याकोबाकडे आले आणि इजिप्तमध्ये जे काही घडले त्याची सर्व हकिकत त्यांनी त्याला सांगितली.

  8. ते म्हणाले, “त्या देशाचा अधिकारी आमच्याशी अत्यंत कठोरतेने बोलला, त्याने आम्हाला हेर असल्यासारखे वागविले.”

  9. आम्ही त्याला म्हटले, “आम्ही हेर नाहीत; आम्ही प्रामाणिक माणसे आहोत.

  10. आम्ही बारा भाऊ असून एकाच पित्याचे पुत्र आहोत. आमचा एक भाऊ मरण पावला आहे, आणि धाकटा भाऊ कनान देशामध्ये आमच्याच पित्याजवळ राहिला आहे.”

  11. तेव्हा त्या देशाचा अधिपती आम्हाला म्हणाला, “तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही प्रामाणिक माणसे आहात की नाही, याची खात्री करून घेण्यासाठी मी असे ठरविले आहे: तुमच्यापैकी एका भावाला येथे तुरुंगात ठेवावे; बाकीच्यांनी तुमच्या कुटुंबीयांसाठी धान्य घेऊन घरी जावे.

  12. पण तुमच्या धाकट्या भावाला माझ्याकडे घेऊन या; मगच तुम्ही हेर नाहीत, तर प्रामाणिक माणसे आहात हे मला समजेल. तर मी तुमचा भाऊ तुम्हाला परत देईन व तुम्ही या देशात व्यापार करू शकाल.”

  13. तोलण्यात खरे तराजू आणि वजन उपयोगात आणावे आणि मापण्यात तुम्ही खरे एफा आणि हीन उपयोगात आणावे; कारण ज्याने तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले तो याहवेह मी तुमचा परमेश्वर आहे.

  14. “ ‘माझे सर्व विधी आणि माझे सर्व नियम याकडे तुम्ही लक्ष द्यावे आणि त्यांचे पालन करावे. मी याहवेह आहे.’ ”

  15. आणि हीरामाने त्याच्या अनुभवी खलाश्यांना शलोमोनच्या माणसांबरोबर सेवा करण्यास पाठवले.

  16. त्यांनी ओफीरपर्यंत प्रवास करून चारशे वीस तालांत सोने परत आणले व ते शलोमोन राजाला दिले.

  17. शलोमोनचे सर्व प्याले सोन्याचे होते. लबानोनच्या वाळवंटातील राजवाड्यात असलेली सर्व पात्रे सुद्धा शुद्ध सोन्याची होती. चांदीचे काहीही बनविले नव्हते, कारण शलोमोनच्या काळात चांदीचे मोल कमी मानले जात असे.

  18. हीरामच्या सेवकांद्वारे चालविलेल्या गलबतांबरोबर शलोमोन राजाचाही व्यापारी गलबतांचा तांडा होता. तीन वर्षातून एकदा ही गलबते सोने, चांदी, हस्तिदंत, वानरे आणि मोर घेऊन परत येत असत.

  19. संपत्ती व ज्ञानाने शलोमोन राजा पृथ्वीवरील सर्व राजांपेक्षा अधिक महान होता.

  20. काहीजण सागरात गलबतांमधून प्रवास करीत; ते महासागरातून येजा करून व्यापार करीत.

  21. त्यांनी याहवेहची कृत्ये, समुद्राच्या खोल तळाशी केलेले चमत्कार पाहिले.

  22. ते बोलले व सागरात प्रचंड उत्पात होऊन, त्या वादळाने लाटा उंचच उंच उसळल्या.

  23. त्या वर आकाशापर्यंत जातात, व मग समुद्रतळापर्यंत खाली येतात; या धोक्यातून जाताना त्यांचा धीर खचतो.

  24. ते मद्यप्यांसारखे डुलतात, झोकांड्या खातात; त्यांची मति कुंठित होते.

  25. त्यांच्या संकटात त्यांनी याहवेहकडे आरोळी मारली आणि याहवेहने या दुर्दशेतून त्यांना मुक्त केले.