मुख्य मजकुरावर जा

Commerce बद्दल बायबलमधील वचने: Carried on by means of ships

10 वचने · 64 पैलू

Carried on by means of ships बद्दल वचने

  1. आणि हीरामाने त्याच्या अनुभवी खलाश्यांना शलोमोनच्या माणसांबरोबर सेवा करण्यास पाठवले.

  2. त्यांनी ओफीरपर्यंत प्रवास करून चारशे वीस तालांत सोने परत आणले व ते शलोमोन राजाला दिले.

  3. काहीजण सागरात गलबतांमधून प्रवास करीत; ते महासागरातून येजा करून व्यापार करीत.

  4. त्यांनी याहवेहची कृत्ये, समुद्राच्या खोल तळाशी केलेले चमत्कार पाहिले.

  5. ते बोलले व सागरात प्रचंड उत्पात होऊन, त्या वादळाने लाटा उंचच उंच उसळल्या.

  6. त्या वर आकाशापर्यंत जातात, व मग समुद्रतळापर्यंत खाली येतात; या धोक्यातून जाताना त्यांचा धीर खचतो.

  7. ते मद्यप्यांसारखे डुलतात, झोकांड्या खातात; त्यांची मति कुंठित होते.

  8. त्यांच्या संकटात त्यांनी याहवेहकडे आरोळी मारली आणि याहवेहने या दुर्दशेतून त्यांना मुक्त केले.

  9. त्यांनी वादळ असे शांत केले की ते कुजबुज करू लागले, आणि समुद्राच्या लाटा अगदी स्तब्ध केल्या.

  10. ते शांत वातावरण बघून हे लोक हर्षित झाले, याहवेहनी त्यांना सुखरुपपणे त्यांच्या इच्छित बंदरात आणले.