Commerce बद्दल बायबलमधील वचने: Increased the wealth of nations and individuals
Increased the wealth of nations and individuals बद्दल वचने
शलोमोनचे सर्व प्याले सोन्याचे होते. लबानोनच्या वाळवंटातील राजवाड्यात असलेली सर्व पात्रे सुद्धा शुद्ध सोन्याची होती. चांदीचे काहीही बनविले नव्हते, कारण शलोमोनच्या काळात चांदीचे मोल कमी मानले जात असे.
हीरामच्या सेवकांद्वारे चालविलेल्या गलबतांबरोबर शलोमोन राजाचाही व्यापारी गलबतांचा तांडा होता. तीन वर्षातून एकदा ही गलबते सोने, चांदी, हस्तिदंत, वानरे आणि मोर घेऊन परत येत असत.
संपत्ती व ज्ञानाने शलोमोन राजा पृथ्वीवरील सर्व राजांपेक्षा अधिक महान होता.
ती एका व्यापारी जहाजासारखी आहे, तिची भोजनसामुग्री ती फार लांब जाऊन आणते.
ती रात्र सरताच उठते; आणि तिच्या कुटुंबीयांच्या भोजनाचा प्रबंध करते आणि दासींना त्यांचा वाटा पुरविते.
ती शेत घेण्याचा विचार करते, आणि ते विकत घेते; तिच्या मिळकतीमधून ती द्राक्षमळा लावते.
ती उत्साही व कष्टाळू आहे. कामे पूर्ण करण्यासाठी तिचे बाहू सशक्त आहेत.
तिचा व्यापार लाभदायक व्हावा यासाठी ती सतर्क असते, आणि तिचा दिवा रात्रीही मालवत नाही.