मुख्य मजकुरावर जा

circa 1446–1406 BC

The Wilderness Years

Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.

2,247 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. अनुवाद २:१७सुमारे इ.स.पू. १४५३

    याहवेह मला म्हणाले,

  2. अनुवाद २:१८सुमारे इ.स.पू. १४५३

    “आज तुम्हाला आर येथे मोआबाची सीमा ओलांडून जायचे आहे.

  3. अनुवाद २:१९सुमारे इ.स.पू. १४५३

    जेव्हा तुम्ही अम्मोनी लोकांच्या भूमीत प्रवेश कराल, अम्मोनी लोकांना त्रास देऊ नका, कारण मी त्यांचा कोणताही प्रदेश तुम्हाला देणार नाही, तो सर्व मी लोटाच्या वंशजांना वतनादाखल दिला आहे.”

  4. अनुवाद २:२०सुमारे इ.स.पू. १४५३

    (तो देश तिथे राहाणाऱ्या रेफाईम लोकांचा देखील मानला जात होता; परंतु अम्मोनी लोक त्यांना जमजुम्मी म्हणत.

  5. अनुवाद २:२१सुमारे इ.स.पू. १४५३

    त्यांच्या वंशातील लोक धिप्पाड आणि संख्येने पुष्कळ होते. ते अनाकी लोकांइतके उंच होते, परंतु अम्मोनी लोकांपुढून त्यांना याहवेहने घालवून दिले व त्यांच्या नाश केला. त्यांच्या जागी अम्मोन्यांनी त्या देशात वस्ती केली.

  6. अनुवाद २:२२सुमारे इ.स.पू. १४५३

    जेव्हा तिथे राहणार्‍या होरी लोकांना त्यांनी घालवून लावले व त्यांचा नाश केला. त्यांनी त्यांना हुसकावून लावले आणि आजपर्यंत त्यांच्या जागी ते वस्ती करून राहत आहेत, त्याचप्रमाणे सेईर येथे राहाणाऱ्या एसावाच्या वंशजांसाठीही याहवेहने असेच केले.

  7. अनुवाद २:२३सुमारे इ.स.पू. १४५३

    गाझा शहरापर्यंत विखुरलेल्या गावातून वस्ती करून राहिलेल्या अव्वी लोकांवर कफतोरहून आलेल्या कफतोरी लोकांनी हल्ला चढवून त्यांचा संहार केला व त्या ठिकाणी वस्ती केली.)

  8. अनुवाद २:२४सुमारे इ.स.पू. १४५३

    “आता उठा आणि आर्णोन नदी ओलांडून जा. पाहा, हेशबोनचा राजा अमोरी सीहोन आणि त्याचा देश मी तुमच्या हाती दिला आहे. तो देश ताब्यात घेण्यास सुरुवात करा व त्याच्याशी युद्ध करा.

  9. अनुवाद २:२५सुमारे इ.स.पू. १४५३

    आजपासून पुढे मी असे करेन की अखिल पृथ्वीतलावरील लोक तुमच्यापुढे भीतीने थरथर कापतील व तुमच्या आगमनाची चाहूल लागताच दहशत घेतील.”

  10. अनुवाद २:२६सुमारे इ.स.पू. १४५३

    नंतर शांततेची बोलणी करण्याकरिता मी केदेमोथच्या रानातून हेशबोनचा राजा सीहोनकडे दूत पाठवून म्हटले,

  11. अनुवाद २:२७सुमारे इ.स.पू. १४५३

    “आम्हाला तुझ्या देशामधून जाऊ दे. आम्ही मुख्य रस्त्यावरच राहू; उजवीकडे वा डावीकडे वळणारही नाही.

  12. अनुवाद २:२८सुमारे इ.स.पू. १४५३

    आम्ही वाटेने जात असताना तुमचे अन्न व पाणी तुमच्याकडून चांदीच्या किमतीत विकत घेऊ. तुमच्या देशातून पायी चालत जाण्याची फक्त आम्हाला परवानगी द्या—

  13. अनुवाद २:२९सुमारे इ.स.पू. १४५३

    सेईरमध्ये राहणारे एसावाचे वंशज आणि आरवासी मोआबी यांनी आमच्यासाठी केले—आम्ही यार्देन ओलांडून याहवेह आमचे परमेश्वर आम्हाला देत असलेल्या देशात जाईपर्यंत तुम्ही आमच्यासोबत करा.”

  14. अनुवाद २:३०सुमारे इ.स.पू. १४५३

    परंतु हेशबोनाच्या सीहोन राजाने आम्हाला जाण्यास परवानगी दिली नाही. याहवेह तुमच्या परमेश्वराने त्याला तुमच्या हातात देण्यासाठी त्याचा आत्मा हट्टी आणि त्याचे हृदय कठीण केले होते.

  15. अनुवाद २:३१सुमारे इ.स.पू. १४५३

    मग याहवेह म्हणाले, “सीहोन राजाचा देश तुम्हाला देण्यास मी आता सुरुवात केली आहे. जेव्हा तुम्ही तो देश ताब्यात घ्याल, तेव्हा तो कायमचा तुमच्या मालकीचा होईल.”

  16. अनुवाद २:३२सुमारे इ.स.पू. १४५३

    सीहोन आणि त्याची सर्व सेना आमच्यासोबत युद्ध करण्यास याहस येथे एकत्रित झाली,

  17. अनुवाद २:३३सुमारे इ.स.पू. १४५३

    परंतु याहवेह आमच्या परमेश्वराने त्याला आमच्या अधीन केले, आम्ही त्याला, त्याच्या पुत्रांसह संपूर्ण सेनेला चिरडून टाकले.

  18. अनुवाद २:३४सुमारे इ.स.पू. १४५३

    त्यावेळी आम्ही त्याची सर्व नगरे घेतली. त्यांच्या सर्वांचा नाश केला—पुरुष, स्त्रिया आणि मुले. आम्ही कोणालाही जिवंत सोडले नाही.

  19. अनुवाद २:३५सुमारे इ.स.पू. १४५३

    फक्त त्यांची गुरे जिवंत ठेवली. त्यांची नगरे काबीज करून ती सर्व संपत्ती आम्ही घेतली.

  20. अनुवाद २:३६सुमारे इ.स.पू. १४५३

    आर्णोन खोर्‍याच्या कडेला असलेल्या अरोएर शहरापासून खोर्‍यातील शहरापर्यंत व त्या शहरापासून गिलआदापर्यंत एकही दुर्गम शहर राहिले नाही. याहवेह आमच्या परमेश्वराने हे सर्व आमच्या अधीन करून दिले.

  21. अनुवाद २:३७सुमारे इ.स.पू. १४५३

    मात्र याहवेह आमच्या परमेश्वराच्या आज्ञेनुसार अम्मोनी लोकांच्या प्रदेशापासून आम्ही दूरच राहिलो. तसेच यब्बोक नदी व त्या डोंगराळ प्रदेशात वसलेल्या शहरापासूनही आम्ही दूर राहिलो.

  22. अनुवाद ३:१सुमारे इ.स.पू. १४५२

    मग आम्ही वळलो आणि बाशानाच्या वाटेने वर गेलो आणि बाशानचा राजा ओग आपले सर्व सैन्य जमवून आमच्याशी युद्ध करण्यासाठी एद्रेई येथे आला.

  23. अनुवाद ३:२सुमारे इ.स.पू. १४५२

    याहवेहने मला म्हटले, “त्याला भिऊ नकोस; कारण मी त्याला व त्याच्या सर्व सैन्याला तुझ्या हाती दिले आहे. अमोर्‍यांचा राजा सीहोन जो हेशबोनात राज्य करीत होता त्याचे तू जसे केले तसेच याचे कर.”

  24. अनुवाद ३:३सुमारे इ.स.पू. १४५२

    याप्रमाणे याहवेह आमच्या परमेश्वराने बाशानचा ओग राजा त्याच्या सर्व सैन्यासह आमच्या अधीन झाला. आम्ही त्यांचा असा संहार केला की त्यांच्यातील कोणीही मागे जिवंत राहिला नाही.

  25. अनुवाद ३:४सुमारे इ.स.पू. १४५२

    त्याची सगळी शहरे आम्ही त्यावेळी घेतली होती. अर्गोबचा संपूर्ण प्रदेश आणि बाशानमधील ओगचे राज्य, साठ नगरातील असे एकही शहर राहिले नाही जे आम्ही त्यांच्याकडून घेतले नाही.