- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1446–1406 BC
The Wilderness Years
Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.
या कालखंडातील वचने
- अनुवाद १:३८सुमारे इ.स.पू. १४५१
पण तुझा मदतनीस, नूनाचा पुत्र यहोशुआ प्रवेश करेल. तू त्याला प्रोत्साहन दे, कारण तो या वतनाचा ताबा घेण्यासाठी इस्राएली लोकांचे मार्गदर्शन करेल.
- अनुवाद १:३९सुमारे इ.स.पू. १४५१
जी बालके पारतंत्र्यात जातील असे तुम्ही म्हणता, ज्यांना त्यांचे बरेवाईटही कळत नाही, त्यांना मी तो देश बहाल करेन आणि ते त्याला आपल्या ताब्यात घेतील.
- अनुवाद १:४०सुमारे इ.स.पू. १४५१
परंतु तुम्ही मागे वळून वाळवंटातून तांबड्या समुद्राच्या वाटेने कूच करावे.”
- अनुवाद १:४१सुमारे इ.स.पू. १४५१
तेव्हा लोकांनी कबुली दिली, “आम्ही याहवेहविरुद्ध पाप केले आहे; आम्ही आमच्या वचनदत्त देशात जाऊ व तो मिळविण्यासाठी याहवेह परमेश्वराच्या आज्ञेनुसार आम्ही वर जाऊन लढाई करू.” असे म्हणून त्यांना आपली शस्त्रे सरसावली. त्यांना वाटले की हा सर्व डोंगराळ प्रदेश आपण सहज जिंकून घेऊ.
- अनुवाद १:४२सुमारे इ.स.पू. १४५१
परंतु याहवेह मला म्हणाले, “त्यांना सांग, ‘लढाई करण्यास वर जाऊ नका, कारण मी तुमच्याबरोबर राहणार नाही. तुमचा तुमच्या शत्रूकडून पराभव होईल.’ ”
- अनुवाद १:४३सुमारे इ.स.पू. १४५१
तुम्हाला मी तसे सांगितले, पण तुम्ही माझे ऐकले नाही. उलट पुन्हा याहवेहच्या आज्ञेविरुद्ध बंड केले आणि धिटाई करून त्या डोंगराळ देशात शत्रूवर चाल करून गेले.
- अनुवाद १:४४सुमारे इ.स.पू. १४५१
तिथे डोंगराळ देशात राहणार्या अमोर्यांनी तुमच्यावर चाल करून मधमाश्यांप्रमाणे सेईरपासून होरमाहपर्यंत तुमचा पाठलाग केला व तुम्हाला मार दिला.
- अनुवाद १:४५सुमारे इ.स.पू. १४५१
यानंतर तुम्ही परत येऊन याहवेहसमोर शोक करू लागलात, परंतु त्यांनी तुमच्या रडण्याकडे लक्ष दिले नाही.
- अनुवाद १:४६सुमारे इ.स.पू. १४५१
म्हणून तुम्ही कादेश येथेच दीर्घकाल राहिला, असे तुम्ही तिथे दिवस घालविले.
- अनुवाद २:१सुमारे इ.स.पू. १४५३
नंतर आम्ही मागे वळून अरण्यामधून तांबड्या समुद्राकडे निघालो, कारण याहवेहनी मला तशी आज्ञा दिली होती आणि अनेक वर्षे आम्ही सेईर पर्वताच्या सभोवतालच्या प्रदेशात भ्रमण करीत राहिलो.
- अनुवाद २:२सुमारे इ.स.पू. १४५३
मग याहवेह मला म्हणाले,
- अनुवाद २:३सुमारे इ.स.पू. १४५३
“तुम्ही या पर्वताच्या सभोवती दीर्घकाल राहिला आहात, तर आता उत्तरेकडे वळा.
- अनुवाद २:४सुमारे इ.स.पू. १४५३
लोकांना आदेश दे: ‘सेईर येथे राहणार्या एसावाच्या वंशजाच्या, म्हणजे त्यांच्या एदोमी भाऊबंदांच्या देशातून ते पुढे जाणार आहेत. तुमची त्यांना भीती वाटेल, म्हणून तुम्ही खबरदारी घ्या.
- अनुवाद २:५सुमारे इ.स.पू. १४५३
त्यांना लढाईला प्रवृत्त करू नका, कारण त्यांची भूमी मी तुम्हाला देणार नाही, मी तुम्हाला तिथे पाऊल ठेवण्यासही जागा देणार नाही. मी सेईर पर्वताचा मुलूख एसावाला दिला आहे.
- अनुवाद २:६सुमारे इ.स.पू. १४५३
तुम्ही तिथे जे काही अन्न खाल व पाणी प्याल त्याच्या मोबदल्यात त्यांना चांदी द्या.’ ”
- अनुवाद २:७सुमारे इ.स.पू. १४५३
याहवेह तुमच्या परमेश्वराने तुमच्या हाताच्या प्रत्येक कार्याला आशीर्वादित केले आहे. या विशाल अरण्यात तुमचे भटकणे त्यांनी पाहिले आहे, चाळीस वर्षे याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्याबरोबर आहेत व तुम्हाला कशाचेही उणे पडले नाही.
- अनुवाद २:८सुमारे इ.स.पू. १४५३
म्हणून आम्ही सेईर येथे राहणाऱ्या एसावाच्या वंशातील भाऊबंदांच्या देशाला वळसा घालून दक्षिणेकडे एलाथ व एजिओन-गेबेरकडे जाणारा अराबाचा रस्ता पार करून उत्तरेकडे प्रवास करीत मोआब वाळवंटाकडे निघालो.
- अनुवाद २:९सुमारे इ.स.पू. १४५३
तेव्हा याहवेह आम्हाला म्हणाले, “मोआबी लोकांना उपद्रव किंवा लढाईसाठी प्रवृत करू नका, कारण मी त्यांच्या देशाचा कोणताही भाग वतन म्हणून तुम्हाला देणार नाही. मी लोटाच्या वंशजांना आर प्रदेश वतन म्हणून दिला आहे.”
- अनुवाद २:१०सुमारे इ.स.पू. १४५३
(एमी लोक त्या भागात राहात होते—बलवान व बहुसंख्य आणि अनाकी लोकांसारखे उंच असे होते.
- अनुवाद २:११सुमारे इ.स.पू. १४५३
एमी व अनाकी या दोन्हीही जमातीस पुष्कळदा रेफाईम असेही म्हणत, पण मोआबी मात्र त्यांना एमीच म्हणत.
- अनुवाद २:१२सुमारे इ.स.पू. १४५३
पूर्वीच्या काळी होरी लोक सेईरमध्ये राहत असत, परंतु एसावाचे वंशज एदोमींनी त्यांना तिथून घालवून दिले व तिथे वस्ती केली. याहवेहने वतन दिलेल्या प्रदेशातून ज्याप्रमाणे इस्राएली लोकांनी तेथील लोकांना घालवून दिले होते त्याचप्रमाणे.)
- अनुवाद २:१३सुमारे इ.स.पू. १४५३
आणि याहवेह म्हणाले, “आता उठा आणि जेरेद ओहोळ पार करून जा.” तेव्हा आम्ही ओहोळ पार केला.
- अनुवाद २:१४सुमारे इ.स.पू. १४५३
पण कादेश-बरनेआहून निघून जेरेद ओहोळ ओलांडून जाण्यास आम्हाला तब्बल अडतीस वर्षे लागली, कारण याहवेहने घेतलेल्या शपथेमुळे लढाऊ पुरुषांची संपूर्ण पिढी छावणीतून नष्ट झाली होती.
- अनुवाद २:१५सुमारे इ.स.पू. १४५३
त्या सर्वांचा नाश होईपर्यंत छावणीतून त्यांचा संहार करावा म्हणून याहवेहचा हात त्यांच्यावर उगारलेला होता.
- अनुवाद २:१६सुमारे इ.स.पू. १४५३
आता जेव्हा या लोकांमधील शेवटचा योद्धा मरण पावला,