- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 6 BC – AD 30
The Life of Jesus
The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.
या कालखंडातील वचने
- मत्तय ४:११सुमारे इ.स. २६
मग सैतान त्यांना सोडून निघून गेला आणि देवदूतांनी येऊन त्यांची सेवा केली.
- मत्तय ४:१२सुमारे इ.स. २६
योहानाला बंदिवासात टाकले आहे हे ऐकताच, येशू गालील प्रांतात निघून गेले.
- मत्तय ४:१३सुमारे इ.स. २६
नासरेथ सोडल्यानंतर जबुलून व नफताली या प्रांताजवळ असलेल्या सरोवराच्या किनार्यावरील कफर्णहूम येथे गेले.
- मत्तय ४:१४सुमारे इ.स. २६
या घटनेने संदेष्टा यशायाह याने केलेले भाकीत पूर्ण झाले. ते असे:
- मत्तय ४:१५सुमारे इ.स. २६
“जबुलून प्रांत आणि नफताली प्रांत, समुद्राच्या मार्गावरचा आणि यार्देनेच्या पलीकडचा प्रांत, गैरयहूदीयांचा गालील प्रांत—
- मत्तय ४:१६सुमारे इ.स. २६
अंधारात राहणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला; मृत्युछायेच्या दरीत बसलेल्यांवर प्रकाश उदय पावला आहे.”
- मत्तय ४:१७सुमारे इ.स. २६
तेव्हापासून येशूंनी उपदेश करण्यास सुरुवात केली, “पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.”
- मत्तय ४:१८सुमारे इ.स. २६
येशू गालील सरोवराच्या जवळून चालत असताना, त्यांनी शिमोन ज्याचे नाव पेत्र असेही होते आणि त्याचा भाऊ आंद्रिया यांना पाहिले. ते सरोवरात जाळे टाकीत होते, कारण ते मासे धरणारे होते.
- मत्तय ४:१९सुमारे इ.स. २६
येशू त्यांना म्हणाले, “चला माझ्यामागे या, म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करेन.”
- मत्तय ४:२०सुमारे इ.स. २६
लगेच त्यांनी त्यांची जाळी सोडली आणि ते त्यांच्यामागे गेले.
- मत्तय ४:२१सुमारे इ.स. २६
किनार्यावरून पुढे गेल्यावर त्यांनी आणखी दोन भाऊ, म्हणजे जब्दीचे पुत्र, याकोब आणि त्याचा भाऊ योहानला पाहिले. ते आपल्या वडिलांसह होडीत बसून आपली जाळी तयार करत होते. येशूंनी त्यांनाही हाक मारून बोलाविले,
- मत्तय ४:२२सुमारे इ.स. २६
आणि ताबडतोब त्यांनी नाव व आपला पिता यांना सोडून त्यांच्यामागे गेले.
- मत्तय ४:२३सुमारे इ.स. २६
येशू सभागृहांमध्ये शिक्षण देत, राज्याच्या शुभवार्तेची घोषणा, व लोकांचा प्रत्येक आजार आणि विकार बरे करीत सर्व गालील प्रांतात फिरले.
- मत्तय ४:२४सुमारे इ.स. २६
त्याचा वृतांत गालील प्रांताच्या सीमेपलीकडेही पसरत गेला. त्यामुळे सीरियासारख्या दूरदूरच्या ठिकाणाहूनही आजारी लोक बरे होण्यासाठी त्यांच्याकडे येऊ लागले. कसल्याही प्रकारचा आजार किंवा वेदना झालेले, भूतग्रस्त किंवा झटके येत असलेले, तसेच पक्षघात झालेले लोक, या सर्वांना त्यांनी बरे केले.
- मत्तय ४:२५सुमारे इ.स. २६
गालील प्रांत, दकापलीस, यरुशलेम, यहूदीया आणि यार्देन पलीकडील प्रदेशातून येथूनही मोठा समुदाय त्यांच्यामागे आला.
- मत्तय ५:१सुमारे इ.स. ३१
लोकांची गर्दी पाहून, येशू टेकडीवर गेले आणि तिथे बसले. त्यांचे शिष्य त्यांच्याकडे आले.
- मत्तय ५:२सुमारे इ.स. ३१
मग ते त्यांना शिकवू लागले. ते म्हणाले:
- मत्तय ५:३सुमारे इ.स. ३१
“धन्य आहेत ते, जे आत्म्याने नम्र आहेत, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.
- मत्तय ५:४सुमारे इ.स. ३१
धन्य आहेत ते, जे शोकग्रस्त आहेत, कारण त्यांना सांत्वन मिळेल.
- मत्तय ५:५सुमारे इ.स. ३१
धन्य आहेत ते, जे सौम्य आहेत, कारण ते पृथ्वीचे वतनाधिकारी होतील.
- मत्तय ५:६सुमारे इ.स. ३१
धन्य आहेत ते, ज्यांना नीतिमत्वाची तहान व भूक लागली आहे, कारण ते तृप्त केले जातील.
- मत्तय ५:७सुमारे इ.स. ३१
धन्य ते, जे दयाळू आहेत, कारण त्यांना दयाळूपणाने वागविले जाईल.
- मत्तय ५:८सुमारे इ.स. ३१
धन्य आहेत ते, जे शुद्ध अंतःकरणाचे आहेत, कारण त्यांना परमेश्वराचे दर्शन घडेल.
- मत्तय ५:९सुमारे इ.स. ३१
धन्य आहेत ते, जे शांती प्रस्थापित करतात, कारण ते परमेश्वराची मुले म्हटले जातील.
- मत्तय ५:१०सुमारे इ.स. ३१
धन्य आहेत ते, ज्यांचा नीतिमत्वासाठी छळ करण्यात येतो, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.