- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 6 BC – AD 30
The Life of Jesus
The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.
या कालखंडातील वचने
- मत्तय ५:३६सुमारे इ.स. ३१
आणि स्वतःच्या मस्तकाचीही शपथ वाहू नका, कारण तुम्हाला एक केसही पांढरा किंवा काळा करता येत नाही.
- मत्तय ५:३७सुमारे इ.स. ३१
जे काही तुम्हाला म्हणावयाचे ते साधे ‘होय’ किंवा ‘नाही’ असावे; यापेक्षा अधिक त्या दुष्टापासून येते.
- मत्तय ५:३८सुमारे इ.स. ३१
“ ‘डोळ्याबद्दल डोळा व दाताबद्दल दात,’ असे म्हटलेले तुम्ही ऐकले आहे,
- मत्तय ५:३९सुमारे इ.स. ३१
पण मी तुम्हाला सांगतो, दुष्ट मनुष्याला प्रतिकार करू नका. तुमच्या एका गालावर कोणी चापट मारली तर दुसराही गाल पुढे करा.
- मत्तय ५:४०सुमारे इ.स. ३१
जो कोणी तुमच्यावर फिर्याद किंवा वाद करून तुमची बंडी घेऊ पाहतो, त्याला तुमच्या अंगरखाही देऊन टाका.
- मत्तय ५:४१सुमारे इ.स. ३१
जर कोणी तुम्हाला एक मैल जाण्याची सक्ती करेल, तर त्याच्याबरोबर दोन मैल जा.
- मत्तय ५:४२सुमारे इ.स. ३१
तुम्हाजवळ कोणी काही मागत असल्यास त्यांना द्या आणि ज्यांना उसने हवे असेल तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका.
- मत्तय ५:४३सुमारे इ.स. ३१
“ ‘तुमच्या शेजार्यावर प्रीती करा आणि शत्रूंचा द्वेष करा,’ असे सांगितले होते ते तुम्ही ऐकले आहे.
- मत्तय ५:४४सुमारे इ.स. ३१
पण मी तुम्हाला सांगतो, तुमच्या शत्रूंवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.
- मत्तय ५:४५सुमारे इ.स. ३१
अशा वागण्याने तुम्ही स्वर्गीय पित्याचे पुत्र व्हाल. कारण ते आपला सूर्यप्रकाश चांगले आणि वाईट करण्यार्या अशा दोघांनाही देतात आणि नीतिमान व अनीतिमान या दोघांवरही पाऊस पाडतात.
- मत्तय ५:४६सुमारे इ.स. ३१
जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावरच तुम्ही प्रीती केली, तर त्यात तुम्हाला असे कोणते मोठे श्रेय मिळणार आहे? जकातदारही तसेच करतात की नाही?
- मत्तय ५:४७सुमारे इ.स. ३१
आणि तुम्ही आपल्या बंधूनाच अभिवादन करीत असाल तर इतरांहून चांगले ते काय करता? गैरयहूदी तसेच करतात की नाही?
- मत्तय ५:४८सुमारे इ.स. ३१
म्हणून जसा तुमचा स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे, तसे तुम्हीही परिपूर्ण असावे.”
- मत्तय ६:१सुमारे इ.स. ३१
“तुमच्या नीतिमत्वाचे आचरण लोकांसमोर न करण्याची काळजी घ्या. कारण तसे केल्याने तुमच्या स्वर्गीय पित्यापासून मिळणार्या प्रतिफळास तुम्ही मुकाल.
- मत्तय ६:२सुमारे इ.स. ३१
“म्हणून तुम्ही एखाद्या गरजवंताला दान देता, तेव्हा तुतार्या वाजवून जाहीर करू नका, जसे ढोंगी रस्त्यांवर किंवा सभागृहांमध्ये लोकांकडून मान करून घेण्यासाठी करतात. मी तुम्हाला खरोखर सांगतो की, त्यांना त्यांचे पूर्ण प्रतिफळ मिळाले आहे.
- मत्तय ६:३सुमारे इ.स. ३१
तुम्ही गरजवंतास देता तेव्हा तुमचा उजवा हात काय करतो हे तुमच्या डाव्या हाताला कळू देऊ नका.
- मत्तय ६:४सुमारे इ.स. ३१
म्हणजे तुमचे दान करणे गुप्त राहील, मग तुमच्या गुप्त गोष्टी पाहणारा पिता तुम्हाला प्रतिफळ देईल.
- मत्तय ६:५सुमारे इ.स. ३१
“तुम्ही प्रार्थना करताना ढोंग्यासारखे होऊ नका, रस्त्यांच्या कोपर्यात किंवा सभागृहांमध्ये उभे राहून, दुसर्यांना दिसावे म्हणून प्रार्थना करण्यास त्यांना आवडते. मी तुम्हाला खचित सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत.
- मत्तय ६:६सुमारे इ.स. ३१
तुम्ही प्रार्थना करता, तेव्हा आपल्या खोलीत जा, दार बंद करा आणि मग तुमच्या अदृश्य पित्याची प्रार्थना करा. तुम्ही गुप्त प्रकारे केलेली प्रार्थना तुमचा पिता ऐकेल, तेव्हा ते तुम्हाला प्रतिफळ देतील.
- मत्तय ६:७सुमारे इ.स. ३१
आणि तुम्ही प्रार्थना करता, तेव्हा गैरयहूदी लोकांप्रमाणे निरर्थक बडबड करू नका, त्यांच्या पुष्कळ बोलण्यामुळे त्यांचे म्हणणे ऐकले जाईल असे त्यांना वाटते.
- मत्तय ६:८सुमारे इ.स. ३१
त्यांच्यासारखे होऊ नका, तुम्ही मागण्यापूर्वीच तुम्हाला कशाची गरज आहे हे तुमच्या पित्याला माहीत असते.
- मत्तय ६:९सुमारे इ.स. ३१
“तर, तुम्ही याप्रमाणे प्रार्थना करीत जा: “ ‘हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुमचे नाव पवित्र मानिले जावो,
- मत्तय ६:१०सुमारे इ.स. ३१
तुमचे राज्य येवो, जशी स्वर्गात तशीच पृथ्वीवरही, तुमची इच्छा पूर्ण होवो.
- मत्तय ६:११सुमारे इ.स. ३१
आमची रोजची भाकर आज आम्हाला द्या.
- मत्तय ६:१२सुमारे इ.स. ३१
आणि जशी आम्ही आमच्या अपराध्यांस क्षमा केली आहे, तशी तुम्ही आमच्या अपराधांची क्षमा करा.