मुख्य मजकुरावर जा

circa 6 BC – AD 30

The Life of Jesus

The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.

3,779 वचने · 4 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मत्तय ६:१३सुमारे इ.स. ३१

    आणि आम्हास परीक्षेत आणू नका, परंतु त्या दुष्टापासून आम्हास सोडवा. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्वकाळ तुमचेच आहेत. आमेन’

  2. मत्तय ६:१४सुमारे इ.स. ३१

    ज्यांनी तुमच्याविरुद्ध पाप केले, त्यांना तुम्ही क्षमा केली, तर तुमचा स्वर्गीय पिता तुमच्याही पातकांची क्षमा करतील.

  3. मत्तय ६:१५सुमारे इ.स. ३१

    पण जर तुम्ही त्यांना क्षमा करण्याचे नाकारले, तर तुमचा पिताही तुम्हाला क्षमा करणार नाही.

  4. मत्तय ६:१६सुमारे इ.स. ३१

    “तुम्ही उपास करता त्यावेळी, ढोंग्याप्रमाणे उदास चेहरा करू नका. आपण उपास करीत आहोत असे लोकांना दाखविण्यासाठी ते कोमेजलेल्या चेहर्‍यांनी वावरतात. मी तुम्हाला खरोखरच सांगतो की, त्यांचे संपूर्ण प्रतिफळ त्यांना मिळून चुकले आहे.

  5. मत्तय ६:१७सुमारे इ.स. ३१

    तुम्ही उपास करता तेव्हा डोक्याला तेल लावा व आपले तोंड धुवा,

  6. मत्तय ६:१८सुमारे इ.स. ३१

    म्हणजे तुम्ही उपास करीत आहात असे लोकांना समजणार नाही. पण केवळ तुमच्या अदृश्य पित्याला समजेल आणि मग तुमचा पिता जे तुम्ही गुप्त प्रकारे केलेल्या गोष्टी पाहतात ते तुम्हाला प्रतिफळ देतील.

  7. मत्तय ६:१९सुमारे इ.स. ३१

    “तुमची धनसंपत्ती तुम्ही पृथ्वीवर साठवून ठेवू नका, कारण तिथे तिला कसर लागून, गंजून तिचा नाश होतो. शिवाय चोरही ती लुटून नेतात.

  8. मत्तय ६:२०सुमारे इ.स. ३१

    पण तुमची धनसंपत्ती स्वतःसाठी स्वर्गामध्ये साठवून ठेवा. कारण तिथे तिला कसर लागत नाही व ती गंजून जात नाही, तिचा नाश होत नाही आणि चोरही ती लुटून नेत नाहीत.

  9. मत्तय ६:२१सुमारे इ.स. ३१

    कारण जिथे तुमची संपत्ती आहे, तिथे तुमचे मनही असेल.

  10. मत्तय ६:२२सुमारे इ.स. ३१

    “डोळा शरीराचा दिवा आहे. तुझे डोळे निर्दोष असले, तर सर्व शरीरही प्रकाशमय होईल.

  11. मत्तय ६:२३सुमारे इ.स. ३१

    पण तुमचे डोळे दोषपूर्ण असले, तर तुमचे संपूर्ण शरीर अंधाराने भरून जाईल. म्हणून तुमच्यातील प्रकाशच जर अंधार असला, तर तो अंधार केवढा मोठा!

  12. मत्तय ६:२४सुमारे इ.स. ३१

    “कोणी दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही. तुम्ही एकाचा द्वेष कराल आणि दुसर्‍यावर प्रीती कराल किंवा एकाला समर्पित असाल आणि दुसर्‍याला तुच्छ मानाल. तुम्हाला परमेश्वराची आणि धनाची सेवा एकाच वेळी करता येणार नाही.

  13. मत्तय ६:२५सुमारे इ.स. ३१

    “मी तुम्हाला सांगतो, आपण काय खावे, किंवा काय प्यावे अशी आपल्या जिवाविषयी, किंवा आपण काय पांघरावे अशी आपल्या शरीराविषयी काळजी करू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रांपेक्षा शरीर अधिक महत्त्वाचे नाही काय?

  14. मत्तय ६:२६सुमारे इ.स. ३१

    आकाशातील पाखरांकडे पाहा; ते धान्य पेरीत नाही, कापणी करीत नाही व कोठारात साठवित नाही आणि तरी देखील तुमचे स्वर्गीय पिता त्यांना खायला घालतात. तुम्ही त्यांच्यापेक्षा कितीतरी अधिक मोलवान नाही का?

  15. मत्तय ६:२७सुमारे इ.स. ३१

    शिवाय काळजी करून आयुष्यातील एक तास तरी कोणास वाढविता येईल काय?

  16. मत्तय ६:२८सुमारे इ.स. ३१

    “आणि तुम्ही वस्त्राविषयी काळजी का करावी? रानातील फुले कशी वाढतात हे पाहा. ती कष्ट करीत नाहीत किंवा कातीत नाहीत.

  17. मत्तय ६:२९सुमारे इ.स. ३१

    तरी मी तुम्हाला सांगतो की शलोमोनदेखील आपल्या सर्व वैभवात त्यांच्याइतका नटला नव्हता.

  18. मत्तय ६:३०सुमारे इ.स. ३१

    जे आज आहे आणि उद्या अग्नीत टाकले जाते, त्या गवताला जर परमेश्वर असा पोशाख घालतात, तर अहो अल्पविश्वासी, ते तुम्हाला अधिक विशेष पोशाख घालणार नाहीत काय?

  19. मत्तय ६:३१सुमारे इ.स. ३१

    म्हणून ‘आम्ही काय खाणार?’ किंवा ‘आम्ही काय पिणार?’ किंवा ‘आम्ही काय पांघरावे?’ असे म्हणत काळजी करू नका.

  20. मत्तय ६:३२सुमारे इ.स. ३१

    कारण परकीय लोक या गोष्टींच्या मागे लागतात, आणि तुम्हाला या गोष्टींची गरज आहे, हे तुमच्या स्वर्गातील पित्याला माहीत आहे.

  21. मत्तय ६:३३सुमारे इ.स. ३१

    परंतु तुम्ही प्रथम त्यांचे राज्य आणि नीतिमत्व मिळविण्यासाठी झटा म्हणजे या सर्व गोष्टीही तुम्हाला प्राप्त होतील.

  22. मत्तय ६:३४सुमारे इ.स. ३१

    म्हणून उद्याच्या गोष्टींची चिंता करू नका, उद्याची चिंता उद्या, प्रत्येक दिवसाचा त्रास त्या दिवसासाठी पुरेसा आहे.

  23. मत्तय ७:१सुमारे इ.स. ३१

    “इतरांचा न्याय करू नका, म्हणजे तुमचाही न्याय होणार नाही.

  24. मत्तय ७:२सुमारे इ.स. ३१

    कारण ज्या पद्धतीने तुम्ही इतरांचा न्याय कराल, त्याच पद्धतीने तुमचाही न्याय करण्यात येईल, ज्या मापाने तुम्ही मापून द्याल, त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल.

  25. मत्तय ७:३सुमारे इ.स. ३१

    “आपल्या डोळ्यातील मुसळ लक्षात न आणता तू आपल्या भावाच्या डोळ्यातील कुसळ का पाहतोस?