- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 930–586 BC
The Divided Kingdom
The kingdom splits into Israel and Judah; prophets warn of judgment as both nations slowly drift into idolatry and exile.
या कालखंडातील वचने
- 2 इतिहास ११:६सुमारे इ.स.पू. ९७५
बेथलेहेम, एटाम, तकोवा,
- 2 इतिहास ११:७सुमारे इ.स.पू. ९७५
बेथ-सूर, सोकोह, अदुल्लाम,
- 2 इतिहास ११:८सुमारे इ.स.पू. ९७५
गथ, मारेशाह, जीफ,
- 2 इतिहास ११:९सुमारे इ.स.पू. ९७५
अदोराईम, लाखीश, अजेकाह,
- 2 इतिहास ११:१०सुमारे इ.स.पू. ९७५
सोराह, अय्यालोन आणि हेब्रोन. ही तटबंदीची शहरे यहूदीया आणि बिन्यामीनमध्ये होती.
- 2 इतिहास ११:११सुमारे इ.स.पू. ९७५
त्याने त्या नगरांची संरक्षणव्यवस्था मजबूत केली आणि त्यांच्यामध्ये सेनापती ठेवले आणि त्यांना अन्न, जैतुनाचे तेल आणि द्राक्षारसाचा पुरवठा केला.
- 2 इतिहास ११:१२सुमारे इ.स.पू. ९७५
त्याने तेथील प्रत्येक नगरात ढाली आणि भाले ठेवले आणि त्यांना फारच सामर्थ्यवान केले. म्हणून यहूदीया आणि बिन्यामीन त्याच्याकडेच राहिले.
- 2 इतिहास ११:१३सुमारे इ.स.पू. ९७४
संपूर्ण इस्राएलमधील सर्व जिल्ह्यातील याजक आणि लेवींनी त्याची बाजू घेतली.
- 2 इतिहास ११:१४सुमारे इ.स.पू. ९७४
लेवीय लोकांनी त्यांची कुरणे आणि मालमत्तासुद्धा सोडली आणि ते यहूदीया आणि यरुशलेमेत आले, कारण यरोबोअम आणि त्याच्या मुलांनी त्यांना याहवेहचे याजक म्हणून नाकारले होते,
- 2 इतिहास ११:१५सुमारे इ.स.पू. ९७४
जेव्हा त्याने उच्चस्थानांसाठी आणि वासराच्या आणि बोकडाच्या मूर्ती तयार करून त्यासाठी स्वतःचे याजक नेमले.
- 2 इतिहास ११:१६सुमारे इ.स.पू. ९७४
इस्रायलच्या प्रत्येक वंशातील ज्या लोकांनी इस्राएलचे परमेश्वर याहवेहच्या शोधात त्यांचे अंतःकरण लावले होते, ते लेवीय लोकांच्या मागे यरुशलेमकडे त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेहसाठी यांच्या बलिदानांचे अर्पण करण्यासाठी गेले.
- 2 इतिहास ११:१७सुमारे इ.स.पू. ९७५
त्यांनी यहूदीयाचे राष्ट्र बळकट केले आणि शलोमोनचे पुत्र रेहोबोअमला तीन वर्षे पाठिंबा दिला, याकाळात त्यांनी दावीद आणि शलोमोनच्या मार्गाचे अनुसरण केले.
- 2 इतिहास ११:१८सुमारे इ.स.पू. ९७५
रेहोबोअमने महालाथ बरोबर विवाह केला, जी दावीदाचा पुत्र यरिमोथ आणि अबीहाईल, इशायाचा पुत्र एलियाबची कन्या होती.
- 2 इतिहास ११:१९सुमारे इ.स.पू. ९७५
तिने त्याच्या या मुलांना जन्म दिला: यऊश, शमरियाह आणि जाहम.
- 2 इतिहास ११:२०सुमारे इ.स.पू. ९७५
नंतर त्याने अबशालोमची कन्या माकाह हिच्याशी विवाह केला, जिने अबीयाह, अत्तय, जीजा आणि शेलोमीथ यांना जन्म दिला.
- 2 इतिहास ११:२१सुमारे इ.स.पू. ९७५
रेहोबोअमने त्याच्या इतर पत्नी आणि उपपत्नींपेक्षा अबशालोमची कन्या माकाहवर जास्त प्रीती केली. त्याला एकूण अठरा पत्नी आणि साठ उपपत्नी, अठ्ठावीस मुले आणि साठ मुली होत्या.
- 2 इतिहास ११:२२सुमारे इ.स.पू. ९७५
रेहोबोअमने माकाहचा मुलगा अबीयाह याला राजा करण्यासाठी त्याच्या सर्व भावांमध्ये राजपुत्र म्हणून त्याची नेमणूक केली.
- 2 इतिहास ११:२३सुमारे इ.स.पू. ९७५
तो फार हुशारीने वागला आणि त्याच्या काही मुलांना यहूदीया आणि बिन्यामीन प्रांतात आणि सर्व तटबंदीच्या शहरांमध्ये पांगविले. त्याने त्यांना विपुल पुरवठा दिला आणि त्यांच्यासाठी अनेक पत्नी केल्या.
- 2 इतिहास १२:१सुमारे इ.स.पू. ९७२
राजा म्हणून रेहोबोअमचे स्थान स्थापित झाल्यानंतर आणि तो बलवान झाला, तेव्हा त्याने आणि त्याच्याबरोबर असलेल्या सर्व इस्राएली लोकांनी याहवेह यांचे नियम सोडून दिले.
- 2 इतिहास १२:२सुमारे इ.स.पू. ९७०
याहवेहबरोबर ते अविश्वासू झाले, म्हणून इजिप्तचा राजा शिशाकने रेहोबोअम राजाच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षी यरुशलेमवर हल्ला केला.
- 2 इतिहास १२:३सुमारे इ.स.पू. ९७०
बाराशे रथ आणि साठ हजार घोडेस्वार आणि लिबिया, सुक्की आणि कूशी चे असंख्य सैन्य इजिप्तमधून त्याच्याबरोबर आले.
- 2 इतिहास १२:४सुमारे इ.स.पू. ९७०
त्याने यहूदीयाची तटबंदी असलेली शहरे काबीज केली आणि ते यरुशलेमपर्यंत आले.
- 2 इतिहास १२:५सुमारे इ.स.पू. ९७०
नंतर शमायाह संदेष्टा रेहोबोअम आणि शिशाकच्या भयाने यरुशलेममध्ये जमलेल्या यहूदीयाच्या पुढाऱ्यांकडे आला आणि त्यांना म्हणाला, “याहवेह असे म्हणतात, तुम्ही मला सोडून दिले आहे; त्यामुळेच मी आता तुम्हाला शिशाककडे सोडून देतो.”
- 2 इतिहास १२:६सुमारे इ.स.पू. ९७०
तेव्हा इस्राएलचे पुढारी आणि राजाने स्वतःला नम्र केले आणि ते म्हणाले, “याहवेह न्यायी आहेत!”
- 2 इतिहास १२:७सुमारे इ.स.पू. ९७०
जेव्हा याहवेहनी पाहिले की, त्यांनी स्वतःला नम्र केले आहे, तेव्हा याहवेहचे हे शब्द शमायाहकडे आले: “त्यांनी स्वतःला नम्र केले आहे, त्यामुळे मी त्यांचा नाश करणार नाही, परंतु लवकरच त्यांची सुटका करेन. माझा क्रोध शिशाकद्वारे यरुशलेमवर ओतला जाणार नाही.