- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 930–586 BC
The Divided Kingdom
The kingdom splits into Israel and Judah; prophets warn of judgment as both nations slowly drift into idolatry and exile.
या कालखंडातील वचने
- 2 इतिहास १२:८सुमारे इ.स.पू. ९७०
तथापि, ते त्याच्या अधीन होतील, म्हणजे माझी सेवा करणे आणि दुसऱ्या देशातील राजांची सेवा करणे यातील फरक त्यांना समजून येईल.”
- 2 इतिहास १२:९सुमारे इ.स.पू. ९७०
इजिप्तचा राजा शिशाक याने जेव्हा यरुशलेमवर हल्ला केला, त्याने याहवेहच्या मंदिरातील भांडारे व राजवाड्यातील भांडारे लुटून नेली. शलोमोनने बनविलेल्या सोन्याच्या ढालींसहीत त्याने सर्वकाही घेतले.
- 2 इतिहास १२:१०सुमारे इ.स.पू. ९७०
म्हणून रेहोबोअम राजाने त्या सोन्याच्या ढालींच्या ऐवजी कास्याच्या ढाली तयार केल्या व राजवाड्यातील पहारेकर्यांच्या कामगिरीवर असलेल्यांच्या हाती स्वाधीन केल्या.
- 2 इतिहास १२:११सुमारे इ.स.पू. ९७०
जेव्हा राजा याहवेहच्या मंदिरात जात असे, तेव्हा पहारेकरी त्या ढाली घेऊन त्याच्याबरोबर जात असत आणि नंतर त्या त्यांच्या चौकीत ठेवत असत.
- 2 इतिहास १२:१२सुमारे इ.स.पू. ९७०
रेहोबोअमने स्वतःला नम्र केले त्यामुळे, याहवेहचा राग त्याच्यापासून दूर वळला आणि तो पूर्णपणे नष्ट झाला नाही. खरोखरच, यहूदीयामध्ये काही चांगलेही होते.
- 2 इतिहास १२:१३सुमारे इ.स.पू. ९७५
रेहोबोअम राजाने स्वतःला यरुशलेममध्ये स्थिर केले आणि राजा म्हणून राहिला. त्यावेळी तो एकेचाळीस वर्षांचा होता आणि आपले नाव द्यावे म्हणून याहवेहने सर्व इस्राएलच्या गोत्रांतून ज्या शहराची निवड केली त्या यरुशलेमात त्याने राज्य केले. त्याच्या आईचे नाव नामाह होते; ती अम्मोनी होती.
- 2 इतिहास १२:१४सुमारे इ.स.पू. ९७५
त्याने दुष्ट कृत्य केले, कारण याहवेहचा शोध घ्यावा याकडे त्याने त्याचे अंतःकरण लावलेले नव्हते.
- 2 इतिहास १२:१५सुमारे इ.स.पू. ९७५
रेहोबोअमच्या कारकिर्दीतील घटनांबद्दल, सुरुवातीपासून शेवटपर्यंत, शमायाह संदेष्टा आणि इद्दो द्रष्टा यांनी तयार केलेल्या वंशावळीत त्या लिहिलेल्या नाहीत काय? रेहोबोअम व यरोबोअम यांच्यामध्ये सतत युद्ध होत राहिले.
- 2 इतिहास १२:१६सुमारे इ.स.पू. ९७५
रेहोबोअम त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला दावीदाच्या नगरात पुरण्यात आले. आणि त्याच्यानंतर त्याचा पुत्र अबीयाह त्याचा वारस म्हणून राजा झाला.
- 2 इतिहास १३:१सुमारे इ.स.पू. ९५८
इस्राएलचा राजा यरोबोअमच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी अबीयाह यहूदीयाचा राजा झाला.
- 2 इतिहास १३:२सुमारे इ.स.पू. ९५८
त्याने यरुशलेमात तीन वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव माकाह होते. ती गिबियाह येथील उरीएल याची कन्या होती. अबीयाह व यरोबोअम यांच्यामध्ये युद्ध झाले.
- 2 इतिहास १३:३सुमारे इ.स.पू. ९५८
अबीयाहने चार लाख सक्षम योद्धे घेतले, यरोबोअम आठ लाख संख्या असलेले सक्षम सैन्य घेऊन त्याच्या विरोधात युद्धरेषेवर जाऊन थांबला.
- 2 इतिहास १३:४सुमारे इ.स.पू. ९५८
अबीयाह एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील सेमाराईम पर्वतावर उभा राहिला आणि म्हणाला, “यरोबोअम आणि सर्व इस्राएल लोकांनो, माझे ऐका!
- 2 इतिहास १३:५सुमारे इ.स.पू. ९५८
तुम्हाला माहीत नाही काय की, इस्राएलचे परमेश्वर याहवेह यांनी मिठाच्या कराराद्वारे इस्राएलचे राज्यपद दावीद आणि त्याच्या वंशजांना कायमचे दिले आहे?
- 2 इतिहास १३:६सुमारे इ.स.पू. ९५८
तरीसुद्धा दावीदाचा पुत्र शलोमोनचा अधिकारी, नेबाटाचा पुत्र यरोबोअमने त्याच्या धन्याच्या विरोधात बंड केले.
- 2 इतिहास १३:७सुमारे इ.स.पू. ९५८
कुचकामी गुंडांची टोळी त्याच्या सभोवती गोळा झाली व त्यांनी शलोमोनचा पुत्र रेहोबोअमचा विरोध केला, जो तेव्हा बालक असून व निर्णयक्षमता नसलेला होता व त्यांचा सामना करण्यास असमर्थ होता.
- 2 इतिहास १३:८सुमारे इ.स.पू. ९५८
“आणि आता तुम्ही याहवेहच्या राज्याला, जे दावीदाच्या वंशजांच्या हातात आहे, विरोध करण्याची योजना केली आहे. तुमचे खरोखरच प्रचंड सैन्य आहे आणि तुमच्याकडे यरोबोअमने तुमची दैवते केलेली सोन्याची वासरे आहेत.
- 2 इतिहास १३:९सुमारे इ.स.पू. ९५८
तुम्ही याहवेहचे याजक अहरोनाचे पुत्र आणि लेवी यांना हाकलून दिले आणि स्वतःचे याजक तयार केले, जसे इतर देशातील लोक करत नाहीत का? जो कोणी एक तरुण बैल आणि सात मेंढे घेऊन स्वतःला पवित्र करण्यासाठी येतो, तो जी दैवते नाहीत अशांचा पुजारी होऊ शकतो.
- 2 इतिहास १३:१०सुमारे इ.स.पू. ९५८
“आमच्याविषयी म्हणाल, याहवेह हे आमचे परमेश्वर आहेत आणि आम्ही त्यांना सोडले नाही. जे याजक याहवेहची सेवा करीत आहेत ते अहरोनाचे पुत्र आहेत आणि लेवीय त्यांना मदत करतात.
- 2 इतिहास १३:११सुमारे इ.स.पू. ९५८
रोज सकाळी आणि संध्याकाळी ते याहवेह यांना होमार्पणे आणि सुगंधी धूप अर्पण करतात. ते विधिपूर्वक स्वच्छ केलेल्या टेबलावर भाकरी ठेवतात आणि दररोज संध्याकाळी सोन्याच्या दीपमाळेवर दीप लावतात. आम्ही आमचे परमेश्वर याहवेहना हव्या असणाऱ्या गोष्टींचे पालन करीत आहोत. परंतु तुम्ही त्यांना सोडून दिले आहे.
- 2 इतिहास १३:१२सुमारे इ.स.पू. ९५८
परमेश्वर आम्हाबरोबर आहेत; ते आमचे नेतृत्व करतात. त्यांचे याजक तुझ्याविरुद्ध युद्धाचे रणशिंग वाजवितील. इस्राएलच्या लोकांनो, तुमच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेह, यांच्याविरुद्ध लढाई करू नका, कारण तुम्ही यशस्वी होणार नाही.”
- 2 इतिहास १३:१३सुमारे इ.स.पू. ९५८
यरोबोअमने पाठीमागील सर्व बाजूंनी सैन्य पाठवले होते, म्हणजे तो यहूदीयाच्या पुढे असताना, ते त्यांच्यामागे दबा धरून बसले होते.
- 2 इतिहास १३:१४सुमारे इ.स.पू. ९५८
यहूदीयांनी सभोवार पाहिले, तेव्हा आपण मागे व पुढे वेढले गेलो आहोत असे त्यांना दिसून आले, तेव्हा त्यांनी मदतीकरिता याहवेहचा धावा केला आणि याजक रणशिंग वाजवू लागले.
- 2 इतिहास १३:१५सुमारे इ.स.पू. ९५८
जेव्हा यहूदी लोकांनी रणगर्जना केली, तेव्हा परमेश्वराने यरोबोअम आणि संपूर्ण इस्राएली सैन्याचा अबीयाह आणि यहूदीयासमोर नायनाट केला.
- 2 इतिहास १३:१६सुमारे इ.स.पू. ९५८
इस्राएली लोक यहूदीयांसमोरून पळून गेले आणि परमेश्वराने त्यांना त्यांच्या हाती दिले.