मुख्य मजकुरावर जा

circa 930–586 BC

The Divided Kingdom

The kingdom splits into Israel and Judah; prophets warn of judgment as both nations slowly drift into idolatry and exile.

1,722 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्या दिवसांमध्ये प्रवास करणे सुरक्षित नव्हते, कारण तेथील सर्व रहिवाशांमध्ये मोठा गोंधळ माजला होता.

  2. एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राकडून आणि एक शहर दुसऱ्या शहराकडून चिरडले जात होते, कारण परमेश्वर त्यांना सर्वप्रकारच्या संकटांनी त्रास देत होते.

  3. परंतु तुम्ही तर खंबीर व्हा आणि हार मानू नका, कारण तुम्हाला तुमच्या कामाचे प्रतिफळ मिळेल.”

  4. जेव्हा आसाने हे शब्द आणि ओदेद संदेष्ट्याचा पुत्र अजऱ्याहची भविष्यवाणी ऐकली तेव्हा त्याला धीर आला. त्याने यहूदाह आणि बिन्यामीनच्या संपूर्ण देशातील आणि त्याने ताब्यात घेतलेल्या एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील गावांमधील अमंगळ मूर्ती काढून टाकल्या. त्याने याहवेहच्या मंदिराच्या प्रवेशमंडपासमोर याहवेहची जी वेदी होती, तिची दुरुस्ती केली.

  5. नंतर त्याने सर्व यहूदीया आणि बिन्यामीन आणि एफ्राईम, मनश्शेह आणि शिमओन येथील लोकांना जमविले, जे त्यांच्यामध्ये स्थायिक झाले होते, कारण त्याचे परमेश्वर याहवेह त्याच्याबरोबर आहेत हे पाहून इस्राएलमधून मोठ्या संख्येने लोक त्याच्याकडे आले होते.

  6. ते आसाच्या कारकिर्दीच्या पंधराव्या वर्षी तिसऱ्या महिन्यात यरुशलेम येथे जमले.

  7. त्यावेळेस त्यांनी परत आणलेल्या लुटीतून याहवेहसाठी सातशे गुरे आणि सात हजार मेंढ्या व शेळ्यांचे बलिदान केले.

  8. त्यांनी त्यांच्या संपूर्ण अंतःकरणाने आणि जिवाने त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेह यांचा शोध घ्यावा, असा करार केला.

  9. जे इस्राएलचे परमेश्वर याहवेह यांचा शोध घेणार नाहीत, त्या सर्वांना, लहान किंवा मोठे, पुरुष किंवा स्त्रीस जिवे मारण्यात येईल.

  10. त्यांनी मोठ्याने गर्जना करून, कर्णे व शिंगे वाजवून याहवेहची शपथ घेतली.

  11. यहूदीया येथील सर्व लोकांनी या शपथेबद्दल आनंद केला, कारण त्यांनी संपूर्ण अंतःकरणापासून ती शपथ घेतली होती. त्यांनी उत्सुकतेने परमेश्वराचा शोध घेतला आणि ते त्यांना सापडले. त्यामुळे याहवेहनी त्यांना सर्व बाजूंनी विश्रांती दिली.

  12. आसा राजाने आपली आजी माकाह हिला राजमातेच्या पदावरून काढून टाकले, कारण तिने तिरस्करणीय अशी अशेराची उपासना करण्यासाठी एक मूर्ती घडविली होती. आसाने ती तोडून फोडली व किद्रोनच्या खोऱ्याजवळ जाळून टाकली.

  13. जरी त्याने इस्राएलातील पूजास्थाने मोडून टाकली नाही, तरीही आसाचे हृदय त्याच्या जीवनभरात याहवेहशी समर्पित होते.

  14. त्याने व त्याच्या पित्याने समर्पित केलेले चांदी व सोन्याचे सामान त्याने परमेश्वराच्या मंदिरात आणले.

  15. 2 इतिहास १५:१९सुमारे इ.स.पू. ९४१

    आसा राजाच्या कारकिर्दीच्या पस्तिसाव्या वर्षापर्यंत लढाई झाली नाही.

  16. 2 इतिहास १६:१सुमारे इ.स.पू. ९३०

    आसाच्या कारकिर्दीच्या छत्तिसाव्या वर्षी यहूदीयाचा राजा आसा याच्या सीमेतून कोणी बाहेर जाऊ नये किंवा आत येऊ नये म्हणून इस्राएलचा राजा बाशा याने यहूदीयावर स्वारी केली आणि रामाह शहराची तटे बांधली.

  17. 2 इतिहास १६:२सुमारे इ.स.पू. ९३०

    त्यानंतर आसाने याहवेहच्या मंदिरातील आणि त्याच्या राजवाड्यातील खजिन्यातून चांदी व सोने काढून घेतले व ते दिमिष्कात राज्य करणारा बेन-हदाद अरामच्या राजाकडे पाठवले.

  18. 2 इतिहास १६:३सुमारे इ.स.पू. ९३०

    आणि म्हटले, “माझ्या व तुझ्या वडिलांमध्ये होता तसा तुझ्या व माझ्यात एक करार असावा. पाहा, मी तुला चांदी व सोने पाठवित आहे. तर आता इस्राएलचा राजा बाशा याच्याशी असलेला तुझा करार मोड म्हणजे तो माझ्यापासून निघून जाईल.”

  19. 2 इतिहास १६:४सुमारे इ.स.पू. ९३०

    बेन-हदाद आसा राजाशी सहमत झाला व आपल्या सैन्याच्या सेनापतींना इस्राएलच्या नगरांवर हल्ला करण्यास पाठवले. त्यांनी इय्योन, दान, आबेल-माईम आणि नफतालीचे सर्व भांडारशहरे ही जिंकून घेतली.

  20. 2 इतिहास १६:५सुमारे इ.स.पू. ९३०

    बाशाने जेव्हा हे ऐकले तेव्हा रामाह बांधण्याचे थांबविले आणि ते अर्धवट टाकून दिले.

  21. 2 इतिहास १६:६सुमारे इ.स.पू. ९३०

    नंतर आसा राजाने यहूदीयातील सर्व पुरुषांना आणले आणि जे दगड आणि लाकूड बाशा वापरत होता, ते त्यांनी रामाह येथून नेऊन त्यांच्यापासून त्याने गेबा आणि मिस्पाह हे बांधले.

  22. 2 इतिहास १६:७सुमारे इ.स.पू. ९३०

    त्याचवेळेस हनानी हा संदेष्टा यहूदीयाचा राजा आसा याच्याकडे आला आणि त्याला म्हणाला, “तुम्ही अरामच्या राजावर भरवसा ठेवला आणि तुमचे परमेश्वर याहवेह यांच्यावर ठेवला नाही, या कारणाने अरामच्या राजाचे सैन्य तुमच्या हातून निसटले आहे.

  23. 2 इतिहास १६:८सुमारे इ.स.पू. ९३०

    कूशी लोक आणि लिबियाचे लोक हे मोठ्या संख्येने रथ आणि घोडेस्वार असलेले बलाढ्य सैन्य नव्हते का? तरीसुद्धा जेव्हा तुम्ही याहवेहवर भरवसा ठेवला, तेव्हा त्यांनी त्यांना तुमच्या हाती दिले.

  24. 2 इतिहास १६:९सुमारे इ.स.पू. ९३०

    कारण ज्यांची अंतःकरणे याहवेह यांच्याबरोबर पूर्णपणे वचनबद्ध आहेत, त्यांना बळ देण्यासाठी त्यांची दृष्टी संपूर्ण पृथ्वीवर व्याप्त आहे. तुम्ही मूर्खपणा केला आहे आणि आतापासून तुम्ही युद्धात असाल.”

  25. 2 इतिहास १६:१०सुमारे इ.स.पू. ९३०

    यामुळे आसा संदेष्ट्यावर रागावला; तो इतका संतापला की त्याने त्याला तुरुंगात टाकले. त्याचवेळेस आसाने काही लोकांवर क्रूरपणे अत्याचार केले.