मुख्य मजकुरावर जा

circa 930–586 BC

The Divided Kingdom

The kingdom splits into Israel and Judah; prophets warn of judgment as both nations slowly drift into idolatry and exile.

1,722 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 2 इतिहास १३:१७सुमारे इ.स.पू. ९५८

    अबीयाह आणि त्याच्या सैन्याने त्यांचे इतके मोठे नुकसान केले की, इस्राएलच्या सक्षम लोकांमधील पाच लाख लोक मारले गेले.

  2. 2 इतिहास १३:१८सुमारे इ.स.पू. ९५८

    त्या प्रसंगी इस्राएल लोकांचा पराभव झाला आणि यहूदीयाचे लोक विजयी झाले, कारण ते याहवेह, त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर यांच्यावर विसंबून राहिले होते.

  3. 2 इतिहास १३:१९सुमारे इ.स.पू. ९५८

    अबीयाहने यरोबोअम याचा पाठलाग केला आणि त्याच्याकडून बेथेल, यशनाह आणि एफ्रोन ही नगरे आणि त्यांच्या आजूबाजूची गावे घेतली.

  4. 2 इतिहास १३:२०सुमारे इ.स.पू. ९५८

    इस्राएलचा राजा यरोबोअम अबीयाहच्या हयातीत परत सत्ता मिळवू शकला नाही. शेवटी याहवेहने त्याला ताडण केले आणि तो मरण पावला.

  5. 2 इतिहास १३:२१सुमारे इ.स.पू. ९५८

    इकडे यहूदीयाचा राजा अबीयाह फारच बलशाली झाला. त्याला चौदा पत्नी, बावीस पुत्र व सोळा कन्या होत्या.

  6. 2 इतिहास १३:२२सुमारे इ.स.पू. ९५८

    अबीयाह याच्या शासनकाळातील इतर घटना, त्याने काय केले आणि तो काय म्हणाला, हे सर्व इद्दो संदेष्ट्याने लिहिलेल्या इतिहासात नमूद केलेले आहे.

  7. 2 इतिहास १४:१सुमारे इ.स.पू. ९५५

    मग अबीयाह त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला दावीदाच्या नगरात पुरले गेले. आणि त्याचा पुत्र आसा त्याचा वारस म्हणून राजा झाला. त्याच्या कारकिर्दीच्या दहा वर्षे राज्यात शांतता होती.

  8. 2 इतिहास १४:२सुमारे इ.स.पू. ९४१

    आसाने याहवेह त्याच्या परमेश्वराच्या दृष्टीने जे चांगले आणि योग्य होते ते केले.

  9. 2 इतिहास १४:३सुमारे इ.स.पू. ९४१

    उच्च स्थानावरील परदेशीय दैवतांच्या वेदीचा त्याने नाश केला, पवित्र दगडांचे तुकडे केले आणि अशेरा मूर्तिस्तंभ कापून टाकले.

  10. 2 इतिहास १४:४सुमारे इ.स.पू. ९४१

    त्याने यहूदीयाला त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेहचा आश्रय घेण्याची आणि त्यांचे नियम आणि आज्ञा पाळण्याची आज्ञा दिली.

  11. 2 इतिहास १४:५सुमारे इ.स.पू. ९४१

    त्याने यहूदीयाच्या प्रत्येक नगरातील उच्च स्थाने व धूप जाळण्याची प्रत्येक वेदी उद्ध्वस्त केली आणि त्याच्या काळात राज्यास शांतता लाभली.

  12. 2 इतिहास १४:६सुमारे इ.स.पू. ९४१

    त्याने यहूदीयाची तटबंदी असलेली नगरे बांधली, कारण देशात शांतता होती. त्या वर्षांमध्ये त्याच्याबरोबर युद्ध करणारा कोणी नव्हता, कारण याहवेहनी त्याला विश्रांती दिली होती.

  13. 2 इतिहास १४:७सुमारे इ.स.पू. ९४१

    तो यहूदीयांना म्हणाला, “चला, आपण या गावांची बांधणी करू या आणि त्यांच्याभोवती बुरूज, फाटके आणि गज लावूया. भूमी अजूनही आमची आहे, कारण आम्ही आमचे परमेश्वर याहवेहचा आश्रय घेतला आहे; आम्ही त्यांचा आश्रय घेतला आणि त्यांनी आम्हाला प्रत्येक बाजूंनी विश्रांती दिली आहे.” म्हणून त्यांनी ते बांधले आणि समृद्ध झाले.

  14. 2 इतिहास १४:८सुमारे इ.स.पू. ९४१

    आसाकडे यहूदीयाचे तीन लाख योद्ध्यांचे सैन्य, मोठ्या ढाली आणि भाले घेऊन सुसज्ज होते आणि बिन्यामीन येथील दोन लाख ऐंशी हजार योद्ध्यांचे सैन्य, लहान ढाली आणि धनुष्य घेऊन सुसज्ज होते. हे सर्व शूर लढवय्ये पुरुष होते.

  15. 2 इतिहास १४:९सुमारे इ.स.पू. ९४१

    जेरह कूशी याने हजारोंच्या हजार संख्येने सैन्य आणि तीनशे रथ बरोबर घेऊन त्यांच्याविरुद्ध चढाई केली आणि तो मारेशाहपर्यंत आला.

  16. 2 इतिहास १४:१०सुमारे इ.स.पू. ९४१

    आसाने त्याचा सामना करण्यासाठी आगेकूच केले आणि ते मारेशाहजवळ असलेल्या जेफथाह खोऱ्यात युद्धासाठी स्थानबद्ध झाले.

  17. 2 इतिहास १४:११सुमारे इ.स.पू. ९४१

    तेव्हा आसाने त्याचे परमेश्वर याहवेहना हाक मारली आणि म्हणाला, “याहवेह, दुर्बल लोकांना पराक्रमी लोकांविरुद्ध मदत करणारे तुमच्यासारखे कोणी नाही. आमच्या परमेश्वरा, याहवेह आम्हाला मदत करा, कारण आम्ही तुमच्यावर अवलंबून आहोत आणि तुमच्याच नावामध्ये आम्ही या विशाल सैन्याविरुद्ध आलो आहोत. याहवेह, तुम्ही आमचे परमेश्वर आहात; मर्त्य मानवांनी तुमच्यावर विजयी होऊ नये.”

  18. 2 इतिहास १४:१२सुमारे इ.स.पू. ९४१

    तेव्हा याहवेहनी आसा आणि यहूदीया यांच्यासमोर कूशी लोकांना तडाखा दिला. कूशी लोक पळून गेले,

  19. 2 इतिहास १४:१३सुमारे इ.स.पू. ९४१

    आणि आसा आणि त्याच्या सैन्याने गरारपर्यंत त्यांचा पाठलाग केला. एवढ्या मोठ्या संख्येने कूशी पडले की ते परत स्वतःला उभारू शकले नाहीत; याहवेह आणि त्यांच्या सैन्यासमोर त्यांचा चुराडा झाला. यहूदीयाच्या लोकांनी मोठ्या प्रमाणावर लुटालूट करून नेली.

  20. 2 इतिहास १४:१४सुमारे इ.स.पू. ९४१

    गरारच्या सभोवतालची सर्व गावे त्यांनी उद्ध्वस्त केली, कारण याहवेहची दहशत त्यांच्यावर पसरली होती. त्यांनी ही सर्व गावे लुटली, कारण तिथे लुटण्यासारखी पुष्कळ सामुग्री होती.

  21. 2 इतिहास १४:१५सुमारे इ.स.पू. ९४१

    त्यांनी गुरांच्या छावण्यांवरही हल्ला केला आणि मेंढ्या, शेळ्या आणि उंटांचे कळप उचलून नेले. नंतर ते यरुशलेमकडे परतले.

  22. नंतर परमेश्वराचा आत्मा ओदेदाचा पुत्र अजर्‍याहवर आला.

  23. तो आसाला भेटण्यासाठी गेला आणि त्याला म्हणाला, “आसा आणि सर्व यहूदाह व बिन्यामीन माझे ऐका, याहवेह तुमच्याबरोबर आहेत, जेव्हा तुम्ही त्यांच्याबरोबर राहाल. जर तुम्ही त्यांचा शोध घ्याल, तर ते तुम्हाला सापडतील, परंतु जर तुम्ही त्यांना सोडाल, तर ते तुम्हाला सोडतील.

  24. आता पुष्कळ काळपर्यंत इस्राएलमध्ये खरे परमेश्वर नव्हते, शिकविण्यासाठी याजक आणि नियम नव्हते.

  25. तरीपण संकटसमयी ते इस्राएलचे परमेश्वर याहवेहकडे वळले व त्यांनी त्यांचा शोध केला, तेव्हा त्यांनी त्यांची मदत केली.