मुख्य मजकुरावर जा

circa 1050–1010 BC

Samuel & King Saul

Israel demands a king; Samuel anoints Saul, whose disobedience leads to his rejection as God chooses a man after his own heart.

810 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. 1 शमुवेल २०:८सुमारे इ.स.पू. १०६२

    तर, तुझ्या सेवकावर दया दाखव, कारण तू त्याला याहवेहसमोर तुझ्याशी करार करून घेतले आहेस. जर मी दोषी आहे, तर तू स्वतःच मला मार! तुझ्या पित्याच्या हाती मला का स्वाधीन करावे?”

  2. 1 शमुवेल २०:९सुमारे इ.स.पू. १०६२

    “कधीच नाही!” योनाथान म्हणाला. “जर मला थोडीतरी कल्पना असती की, माझ्या पित्याने तुला इजा करावयाचे योजले आहे, तर मी तुला सांगणार नाही काय?”

  3. 1 शमुवेल २०:१०सुमारे इ.स.पू. १०६२

    दावीदाने योनाथानाला विचारले, “जर तुझ्या पित्याने तुला कठोर उत्तर दिले तर मला कोण सांगणार?”

  4. 1 शमुवेल २०:११सुमारे इ.स.पू. १०६२

    योनाथान दावीदाला म्हणाला, “चल, आपण बाहेर मैदानात जाऊ.” तेव्हा ते मिळून तिकडे गेले.

  5. 1 शमुवेल २०:१२सुमारे इ.स.पू. १०६२

    नंतर योनाथान दावीदाला म्हणाला, “याहवेह इस्राएलचे परमेश्वर यांची मी शपथ घेतो की, परवा या सुमाराला मी खात्रीने माझ्या पित्याचे मनोगत समजून घेईन, जर तुझ्या हिताचे काही असले तर ते मी तुला कळविणार नाही काय?

  6. 1 शमुवेल २०:१३सुमारे इ.स.पू. १०६२

    परंतु जर तुला इजा करावी असा माझ्या पित्याचा हेतू असला आणि जर त्याविषयी मी तुला कळवले नाही आणि तुला शांतीने पाठवले नाही, तर याहवेह योनाथानशी असेच किंवा त्याहून अधिक कठोरपणे वागो. याहवेह जसे माझ्या पित्याबरोबर आहेत तसेच तुझ्याबरोबरही असोत.

  7. 1 शमुवेल २०:१४सुमारे इ.स.पू. १०६२

    आणि जशी याहवेहची अटळ दया तशी मी जिवंत असेपर्यंत माझ्यावर असू दे, म्हणजे मी मरणार नाही,

  8. 1 शमुवेल २०:१५सुमारे इ.स.पू. १०६२

    एवढेच नाही तर, याहवेहने दावीदाच्या प्रत्येक शत्रूंना पृथ्वीच्या पाठीवरून काढून टाकले तरीसुद्धा माझ्या कुटुंबावरील तुझी दया कधीही काढू नकोस.”

  9. 1 शमुवेल २०:१६सुमारे इ.स.पू. १०६२

    तेव्हा योनाथानने दावीदाच्या घराण्याबरोबर एक करार केला, तो म्हणाला, “आता याहवेह दावीदाच्या शत्रूंची झडती घेवो.”

  10. 1 शमुवेल २०:१७सुमारे इ.स.पू. १०६२

    आणि योनाथानने दावीदाकडून त्याच्या आपल्या प्रीतिकरिता त्याच्या शपथेची पुष्टी केली, कारण आपल्या जिवासारखीच त्याने त्याच्यावर प्रीती केली.

  11. 1 शमुवेल २०:१८सुमारे इ.स.पू. १०६२

    नंतर योनाथान दावीदाला म्हणाला, “उद्या चंद्रदर्शन आहे. तुझी अनुपस्थिती जाणवेल, कारण तुझे आसन रिकामे असणार.

  12. 1 शमुवेल २०:१९सुमारे इ.स.पू. १०६२

    परवाच्या दिवशी संध्याकाळपर्यंत तू त्या ठिकाणी जाऊन लप, जिथे आधी हा त्रास सुरू झाला तेव्हा लपला होता आणि एझेल दगडाकडे वाट पाहा.

  13. 1 शमुवेल २०:२०सुमारे इ.स.पू. १०६२

    मी निशाणा साधित आहे असे दाखवित त्या दगडाच्या दिशेने तीन बाण मारेन.

  14. 1 शमुवेल २०:२१सुमारे इ.स.पू. १०६२

    नंतर मी एका मुलाला पाठवेन आणि सांगेन, ‘जा, बाणांचा शोध कर.’ जर मी त्याला म्हटले, ‘पाहा, बाण तुझ्या अलीकडच्या बाजूला आहेत; ते इकडे घेऊन ये,’ तेव्हा तू ये, कारण खचितच जिवंत याहवेहची शपथ, तू सुरक्षित आहेस; तुला धोका नाही.”

  15. 1 शमुवेल २०:२२सुमारे इ.स.पू. १०६२

    पण जर मी त्या मुलाला म्हटले, “पाहा, बाण तुझ्या पलीकडे आहेत, तेव्हा तू निघून जा, कारण याहवेह तुला दूर पाठवित आहेत.

  16. 1 शमुवेल २०:२३सुमारे इ.स.पू. १०६२

    आणि ज्या विषयाबद्दल तू आणि मी चर्चा केली आहे, ते लक्षात ठेव, तुझ्या आणि माझ्यामध्ये याहवेह सर्वकाळ साक्षी आहे.”

  17. 1 शमुवेल २०:२४सुमारे इ.स.पू. १०६२

    तेव्हा दावीद शेतात जाऊन लपला आणि चंद्रदर्शनाच्या दिवशी राजा भोजनास बसले.

  18. 1 शमुवेल २०:२५सुमारे इ.स.पू. १०६२

    राजा नेहमीप्रमाणे आसनावर योनाथानच्या समोरच्या भिंतीजवळ बसला होता आणि अबनेर शौलाच्या बाजूला बसला, परंतु दावीदाचे आसन रिकामेच होते.

  19. 1 शमुवेल २०:२६सुमारे इ.स.पू. १०६२

    शौल त्या दिवशी काही बोलला नाही, कारण त्याला वाटले, “दावीदाला काहीतरी झाल्यामुळे तो विधीनुसार अशुद्ध झाला असेल; खात्रीनेच तो अशुद्ध आहे.”

  20. 1 शमुवेल २०:२७सुमारे इ.स.पू. १०६२

    परंतु दुसर्‍या दिवशी, त्या महिन्याच्या दुसर्‍या दिवशी दावीदाचे स्थान पुन्हा रिकामे होते. तेव्हा शौलाने त्यांचा पुत्र योनाथान याला विचारले, “इशायाचा पुत्र काल आणि आजही भोजनास का आला नाही?”

  21. 1 शमुवेल २०:२८सुमारे इ.स.पू. १०६२

    योनाथानने शौलास उत्तर दिले, “दावीदाने बेथलेहेमला जाण्यासाठी मला आग्रहाने परवानगी मागितली.

  22. 1 शमुवेल २०:२९सुमारे इ.स.पू. १०६२

    तो म्हणाला, ‘मला जाऊ दे, कारण माझे घराणे नगरामध्ये यज्ञ करीत आहेत आणि मी तिथे असावे असा माझ्या भावाने हुकूम केला आहे. जर तुझी माझ्यावर कृपादृष्टी असली, तर मला माझ्या भावांना भेटण्यासाठी जाऊ दे.’ त्यामुळे तो राजाच्या मेजवानीस आला नाही.”

  23. 1 शमुवेल २०:३०सुमारे इ.स.पू. १०६२

    शौलाचा राग योनाथानवर भडकला आणि तो त्याला म्हणाला, “भ्रष्ट आणि फितुरी स्त्रीच्या मुला! तू तुझ्या स्वतःची व जिने तुला जन्म दिला त्या तुझ्या आईची बेअब्रू करून त्या इशायच्या पुत्राच्या बाजूने आहेस हे मला माहीत नाही काय?

  24. 1 शमुवेल २०:३१सुमारे इ.स.पू. १०६२

    जोपर्यंत इशायाचा पुत्र या पृथ्वीवर जिवंत आहे, तोपर्यंत तू किंवा तुझे राज्य स्थापित होणार नाही. आताच कोणाला तरी त्याच्याकडे पाठवून त्याला माझ्याकडे घेऊन ये, कारण त्याने अवश्य मरावे!”

  25. 1 शमुवेल २०:३२सुमारे इ.स.पू. १०६२

    योनाथानने आपला पिता शौल याला विचारले, “त्याला मारून टाकावे असे त्याने काय केले आहे?”