मुख्य मजकुरावर जा

circa 1050–1010 BC

Samuel & King Saul

Israel demands a king; Samuel anoints Saul, whose disobedience leads to his rejection as God chooses a man after his own heart.

810 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. 1 शमुवेल १९:७सुमारे इ.स.पू. १०६२

    तेव्हा योनाथानने दावीदाला बोलाविले आणि झालेले सर्व संभाषण त्याला सांगितले. त्याने त्याला शौलाकडे नेले आणि नेहमीप्रमाणे दावीद शौलापुढे राहिला.

  2. 1 शमुवेल १९:८सुमारे इ.स.पू. १०६२

    त्यानंतर पुन्हा एकदा युद्ध सुरू झाले आणि दावीद जाऊन पलिष्ट्यांशी लढला, त्याने त्यांना असे मारले की ते त्याच्यापुढून पळून गेले.

  3. 1 शमुवेल १९:९सुमारे इ.स.पू. १०६२

    परंतु शौल आपल्या घरी हातात भाला घेऊन बसला असता दावीद त्याच्यापुढे वीणा वाजवित होता, तेव्हा याहवेहकडून पाठविलेला एक दुष्ट आत्मा शौलावर आला,

  4. 1 शमुवेल १९:१०सुमारे इ.स.पू. १०६२

    शौलाने दावीदाला आपल्या भाल्याने भिंतीशी खिळण्याचा प्रयत्न केला, परंतु दावीद तिथून निसटला आणि भाला भिंतीत शिरला. त्या रात्री दावीद निसटला.

  5. 1 शमुवेल १९:११सुमारे इ.स.पू. १०६२

    शौलाने दावीदाच्या घरावर पहारा ठेवून सकाळी त्याला मारावे म्हणून माणसे पाठवली. परंतु दावीदाची पत्नी मीखल हिने त्याला सावध केले, “जर आज रात्री तू आपला जीव वाचवण्यासाठी पळ काढला नाही तर उद्या सकाळी तू मारला जाशील.”

  6. 1 शमुवेल १९:१२सुमारे इ.स.पू. १०६२

    तेव्हा मीखलने दावीदाला खिडकीतून खाली उतरविले आणि तो पळून गेला.

  7. 1 शमुवेल १९:१३सुमारे इ.स.पू. १०६२

    मीखलने एक मूर्ती घेऊन ती पलंगावर ठेवली, उशाकडे शेळीचे केस लावून ते एका वस्त्राने झाकले.

  8. 1 शमुवेल १९:१४सुमारे इ.स.पू. १०६२

    जेव्हा शौलाने दावीदाला पकडण्यासाठी माणसे पाठवली, तेव्हा मीखल म्हणाली, “तो आजारी आहे.”

  9. 1 शमुवेल १९:१५सुमारे इ.स.पू. १०६२

    तेव्हा शौलाने दावीदाला पाहण्यासाठी माणसे परत पाठवली आणि त्यांना सांगितले, “त्याच्या पलंगासहित त्याला घेऊन या म्हणजे मी त्याला ठार मारेन.”

  10. 1 शमुवेल १९:१६सुमारे इ.स.पू. १०६२

    परंतु जेव्हा माणसे आत गेली, त्यांना दिसले की पलंगावर मूर्ती होती आणि उशाशी शेळीचे केस.

  11. 1 शमुवेल १९:१७सुमारे इ.स.पू. १०६२

    शौल मीखलला म्हणाला, “तू मला असे का फसविलेस आणि त्याने पळून जावे म्हणून तू माझ्या शत्रूला का जाऊ दिलेस?” मीखल त्याला म्हणाली, “मला तो म्हणाला, ‘मला जाऊ दे, मी तुला का मारावे?’ ”

  12. 1 शमुवेल १९:१८सुमारे इ.स.पू. १०६२

    जेव्हा दावीद निसटून पळाला तेव्हा तो रामाह येथे शमुवेलकडे गेला आणि शौलाने त्याच्याशी केले ते सर्वकाही त्यांना सांगितले. मग तो व शमुवेल नायोथ येथे जाऊन राहिले.

  13. 1 शमुवेल १९:१९सुमारे इ.स.पू. १०६२

    दावीद रामाहतील नायोथ येथे असल्याचे शौलाला कळले;

  14. 1 शमुवेल १९:२०सुमारे इ.स.पू. १०६२

    तेव्हा त्याने दावीदाला पकडण्यासाठी माणसे पाठवली, परंतु जेव्हा त्यांनी संदेष्ट्यांचा घोळका भविष्यवाणी करीत आणि शमुवेल त्यांचा पुढारी म्हणून तिथे उभा आहे असे पाहिले, तेव्हा परमेश्वराचा आत्मा शौलाच्या माणसांवर आला आणि ते सुद्धा भविष्यवाणी करू लागले.

  15. 1 शमुवेल १९:२१सुमारे इ.स.पू. १०६२

    जे झाले याविषयी शौलाला सांगण्यात आले, तेव्हा त्याने अजून माणसे पाठवली आणि त्यांनी सुद्धा भविष्यवाणी केली. शौलाने तिसर्‍यांदा माणसे पाठवली आणि त्यांनी सुद्धा भविष्यवाणी केली.

  16. 1 शमुवेल १९:२२सुमारे इ.स.पू. १०६२

    शेवटी, शौल स्वतः रामाहास निघाला व सेखू येथील मोठ्या विहिरीपर्यंत पोहोचल्यावर, त्याने विचारले, “दावीद व शमुवेल कुठे आहेत?” ते म्हणाले, “रामाहतील नायोथ येथे ते गेले आहेत.”

  17. 1 शमुवेल १९:२३सुमारे इ.स.पू. १०६२

    शौल रामाहतील नाइयोथकडे निघाला. परंतु परमेश्वराचा आत्मा त्याच्यावरही आला आणि नायोथपर्यंत पोहोचेपर्यंत भविष्यवाणी करीत चालत गेला.

  18. 1 शमुवेल १९:२४सुमारे इ.स.पू. १०६२

    त्याने आपली वस्त्रे काढली आणि शमुवेलपुढे भविष्यवाणी करू लागला. तो संपूर्ण दिवस व ती रात्र शौल विवस्त्र पडून राहिला. त्यावरूनच लोक म्हणतात, “शौलसुद्धा संदेष्ट्यांपैकी एक आहे काय?”

  19. 1 शमुवेल २०:१सुमारे इ.स.पू. १०६२

    नंतर दावीद रामाहतील नायोथ येथून पळून गेला आणि योनाथानकडे जाऊन त्याने विचारले, “मी काय केले आहे? माझा अपराध काय आहे? तुझ्या पित्याशी मी काय चुकीचे वागलो आहे की, ते मला मारण्याचा प्रयत्न करीत आहेत?”

  20. 1 शमुवेल २०:२सुमारे इ.स.पू. १०६२

    “कधीच नाही!” योनाथानने उत्तर दिले. “तू मरणार नाहीस! माझा पिता कोणतेही काम; लहान किंवा मोठे, ते मला सांगितल्याशिवाय करीत नाही. तर ते माझ्यापासून ही गोष्ट का लपवून ठेवतील? हे खरे आहे ना!”

  21. 1 शमुवेल २०:३सुमारे इ.स.पू. १०६२

    परंतु दावीदाने शपथ घेतली आणि म्हणाला, “तुझ्या पित्याला चांगलेच माहीत आहे की, मी तुझ्या दृष्टीत कृपा पावलो आहे आणि ते स्वतःशी म्हणाले आहेत, ‘योनाथानला हे माहीत होऊ नये नाहीतर तो दुःखी होईल.’ तरीपण जिवंत याहवेहची व तुझ्या जिवाची शपथ की, माझ्यामध्ये व मृत्यूमध्ये फक्त एका पावलाचे अंतर आहे.”

  22. 1 शमुवेल २०:४सुमारे इ.स.पू. १०६२

    योनाथान दावीदाला म्हणाला, “तुला वाटेल, ते मी तुझ्यासाठी करेन.”

  23. 1 शमुवेल २०:५सुमारे इ.स.पू. १०६२

    तेव्हा दावीद म्हणाला, “पाहा उद्या चंद्रदर्शन आहे आणि मला राजाबरोबर चंद्रदर्शनाचे भोजन करावयाचे आहे; पण मला जाऊ दे म्हणजे मी परवाच्या संध्याकाळपर्यंत शेतात लपून राहीन.

  24. 1 शमुवेल २०:६सुमारे इ.स.पू. १०६२

    जर माझी अनुपस्थिती तुझ्या पित्याला जाणवली, तर त्यांना सांग, ‘दावीदाला त्याच्या गावाकडे, बेथलेहेमकडे तातडीने जायचे होते, कारण त्याच्या संपूर्ण कुळासाठी वार्षिक यज्ञ आहे.’

  25. 1 शमुवेल २०:७सुमारे इ.स.पू. १०६२

    जर ते म्हणाले, ‘ठीक आहे,’ तर तुझा सेवक सुरक्षित आहे. परंतु जर त्यांचा संयम सुटला तर खात्री करून घे की, मला इजा करण्याचा त्यांचा हेतू आहे.