मुख्य मजकुरावर जा

circa 1050–1010 BC

Samuel & King Saul

Israel demands a king; Samuel anoints Saul, whose disobedience leads to his rejection as God chooses a man after his own heart.

810 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. 1 शमुवेल १७:४५सुमारे इ.स.पू. १०६३

    दावीद त्या पलिष्ट्याला म्हणाला, “तू तलवार, भाला व बरची घेऊन माझ्याविरुद्ध आलास, परंतु ज्या इस्राएली सैन्याच्या परमेश्वराला तू तुच्छ लेखले; त्या याहवेह, सेनाधीश परमेश्वराच्या नावाने मी तुझ्याविरुद्ध येतो.

  2. 1 शमुवेल १७:४६सुमारे इ.स.पू. १०६३

    आज याहवेह तुला माझ्या हाती देईल, मी तुला मारून टाकीन व तुझा शिरच्छेद करेन. या आजच्या दिवशी मी पलिष्टी सैन्याची शरीरे पक्ष्यांना व जंगली जनावरांना देईन आणि सर्व जगाला समजेल की परमेश्वर इस्राएलात आहेत.

  3. 1 शमुवेल १७:४७सुमारे इ.स.पू. १०६३

    येथे जमलेल्या प्रत्येकाने जाणावे की तलवार किंवा भाल्याने याहवेह आम्हाला सोडवित नाही; कारण युद्ध याहवेहचे आहे आणि तुम्हा सर्वांना याहवेह आमच्या हाती देतील.”

  4. 1 शमुवेल १७:४८सुमारे इ.स.पू. १०६३

    पलिष्टी गल्याथ जसा दावीदावर हल्ला करण्यासाठी पुढे येऊ लागला, तसा दावीद त्याचा सामना करण्यास त्याच्या दिशेने धावत गेला.

  5. 1 शमुवेल १७:४९सुमारे इ.स.पू. १०६३

    दावीदाने आपल्या बटव्यातील एक दगड घेऊन, तो गोफणीत घातला व तो त्या पलिष्ट्याच्या कपाळावर मारला. तो दगड त्याच्या कपाळात शिरला आणि गल्याथ जमिनीवर पालथा पडला.

  6. 1 शमुवेल १७:५०सुमारे इ.स.पू. १०६३

    अशाप्रकारे, दावीदाने त्या पलिष्ट्यावर गोफण व गोट्याद्वारे विजय मिळविला; त्याच्या हाती तलवार नसताना त्याने त्या पलिष्ट्याला मारून टाकले.

  7. 1 शमुवेल १७:५१सुमारे इ.स.पू. १०६३

    दावीद धावत जाऊन त्याच्यावर उभा राहिला, त्याने त्या पलिष्ट्याच्या म्यानातून तलवार काढून त्या तलवारीनेच त्याचे डोके कापले. जेव्हा पलिष्ट्यांनी पाहिले की त्यांचा नायक मरण पावला त्यांनी तिथून पळ काढला.

  8. 1 शमुवेल १७:५२सुमारे इ.स.पू. १०६३

    तेव्हा इस्राएली व यहूदीयाच्या सैनिकांनी उठून आरोळी केली, त्यांनी गथ व एक्रोनच्या वेशींपर्यंत पलिष्ट्यांचा पाठलाग केला. मरण पावलेले पलिष्टी शाराईमाच्या वाटेवर गथ व एक्रोन येथवर पडलेले होते.

  9. 1 शमुवेल १७:५३सुमारे इ.स.पू. १०६३

    इस्राएली लोक पलिष्ट्यांचा पाठलाग करण्याचे सोडून परत आले व त्यांची छावणी लुटली.

  10. 1 शमुवेल १७:५४सुमारे इ.स.पू. १०६३

    दावीदाने त्या पलिष्ट्याचे शिर घेऊन यरुशलेमास आणले; पण त्या पलिष्ट्याची शस्त्रे आपल्या तंबूत ठेवली.

  11. 1 शमुवेल १७:५५सुमारे इ.स.पू. १०६३

    शौलाने दावीदाला पलिष्ट्याशी युद्ध करण्यास जाताना पाहिले, तेव्हा त्याने सेनापती अबनेर याला विचारले, “हा तरुण कोणाचा पुत्र आहे?” अबनेरने उत्तर दिले, “महाराज चिरायू होवो, मला माहीत नाही.”

  12. 1 शमुवेल १७:५६सुमारे इ.स.पू. १०६३

    राजा म्हणाला, “हा तरुण कोणाचा पुत्र आहे त्याचा तपास कर.”

  13. 1 शमुवेल १७:५७सुमारे इ.स.पू. १०६३

    दावीदाने त्या पलिष्ट्याला मारल्यावर परत येताच, अबनेरने त्याला शौलाकडे आणले, त्या पलिष्ट्याचे शिर अजूनही दावीदाच्या हातात होते.

  14. 1 शमुवेल १७:५८सुमारे इ.स.पू. १०६३

    शौलाने दावीदाला विचारले, “हे तरुणा, तू कोणाचा पुत्र आहेस?” दावीद म्हणाला, “आपला सेवक इशाय बेथलेहेमकर याचा मी पुत्र आहे.”

  15. 1 शमुवेल १८:१सुमारे इ.स.पू. १०६३

    दावीदाने शौलाशी आपले संभाषण संपविले, तेव्हा योनाथानचा जीव दावीदाशी जडला आणि जशी स्वतःवर तशी प्रीती त्याने दावीदावर केली.

  16. 1 शमुवेल १८:२सुमारे इ.स.पू. १०६३

    त्या दिवसापासून शौलाने दावीदाला आपल्याजवळ ठेवले व त्याला त्याच्या पित्याच्या घरी जाऊ दिले नाही.

  17. 1 शमुवेल १८:३सुमारे इ.स.पू. १०६३

    आणि योनाथानने दावीदाशी करार केला, कारण त्याने जशी आपल्या स्वतःच्या जिवावर तशी दावीदावर प्रीती केली.

  18. 1 शमुवेल १८:४सुमारे इ.स.पू. १०६३

    योनाथानने आपल्या अंगातील झगा काढून तो दावीदाला दिला. आपला अंगरखा, तलवार, धनुष्य व कंबरपट्टा सुद्धा दावीदाला दिले.

  19. 1 शमुवेल १८:५सुमारे इ.स.पू. १०६३

    शौलाने दावीदाला कोणत्याही कामगिरीवर पाठविले तरी त्यात दावीद यशस्वी होत असे, म्हणून शौलाने त्याला आपल्या सैन्यात उच्च हुद्दा दिला. ते सर्व सैनिकांना व शौलाच्या अधिकार्‍यांनाही आवडले.

  20. 1 शमुवेल १८:६सुमारे इ.स.पू. १०६३

    दावीदाने पलिष्टी गल्याथाला ठार मारल्यानंतर ज्यावेळी लोक परत घरी येत होते, त्यावेळी इस्राएलच्या सर्व नगरांतून प्रत्येक गावातून स्त्रिया गात व नाचत आणि हर्षाने डफ व झांजा वाजवित शौल राजाला भेटायला आल्या.

  21. 1 शमुवेल १८:७सुमारे इ.स.पू. १०६३

    नाचत असताना त्यांनी गीत गाईले: “शौलाने त्याच्या हजारास वधले, दावीदाने त्याचे दहा हजार वधले.”

  22. 1 शमुवेल १८:८सुमारे इ.स.पू. १०६३

    यामुळे शौल अतिशय रागावला; गीतांच्या या ओळींनी तो असंतुष्ट झाला. तो म्हणाला, “त्यांनी दावीदाला दहा हजारांचे श्रेय दिले आणि मला केवळ हजारांचे. राज्यावाचून त्याला आणखी काय मिळायचे राहिले?”

  23. 1 शमुवेल १८:९सुमारे इ.स.पू. १०६३

    आणि तेव्हापासून शौलाने दावीदावर पाळत ठेवली.

  24. 1 शमुवेल १८:१०सुमारे इ.स.पू. १०६३

    दुसर्‍या दिवशी परमेश्वराकडून पाठविलेला एक दुष्ट आत्मा शौलावर जोराने उतरला, तेव्हा तो आपल्या घरात भविष्यवाणी करू लागला. दावीद रोजच्याप्रमाणे आपली वीणा वाजवित होता व शौलाच्या हाती भाला होता

  25. 1 शमुवेल १८:११सुमारे इ.स.पू. १०६३

    “मी दावीदाला भिंतीशी खिळून टाकीन” असे म्हणत शौलाने भाला फेकला, परंतु दावीदाने त्याला दोनदा चुकविले.