मुख्य मजकुरावर जा

circa 1050–1010 BC

Samuel & King Saul

Israel demands a king; Samuel anoints Saul, whose disobedience leads to his rejection as God chooses a man after his own heart.

810 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. 1 शमुवेल १८:१२सुमारे इ.स.पू. १०६३

    शौलाला दावीदाची भीती वाटत होती, कारण याहवेह त्याच्याबरोबर होते परंतु शौलाला याहवेहने सोडले होते.

  2. 1 शमुवेल १८:१३सुमारे इ.स.पू. १०६३

    तेव्हा शौलाने दावीदाला आपल्या पुढून घालवून दिले व हजारांचा सेनापती म्हणून नेमले आणि दावीदाने त्या सैनिकांचे युद्धात नेतृत्व केले.

  3. 1 शमुवेल १८:१४सुमारे इ.स.पू. १०६३

    प्रत्येक कामात दावीद यशस्वी होत असे, कारण याहवेह त्याच्याबरोबर होते.

  4. 1 शमुवेल १८:१५सुमारे इ.स.पू. १०६३

    दावीद किती यशस्वी होतो हे जेव्हा शौलाने पाहिले, तेव्हा त्याला दावीदाची अधिक भीती वाटू लागले.

  5. 1 शमुवेल १८:१६सुमारे इ.स.पू. १०६३

    परंतु सर्व इस्राएली व यहूदीयाचे लोक दावीदावर प्रीती करीत होते. कारण तो त्यांचे युद्धात नेतृत्व करीत असे.

  6. 1 शमुवेल १८:१७सुमारे इ.स.पू. १०६३

    एके दिवशी शौल दावीदास म्हणाला, “माझी थोरली कन्या मेरब तुला मी पत्नी म्हणून देईन, केवळ शौर्याने माझी सेवा कर व याहवेहच्या लढाया लढ.” कारण शौल स्वतःशी म्हणाला, “मी दावीदावर हात टाकणार नाही, पलिष्ट्यांनी ते करावे.”

  7. 1 शमुवेल १८:१८सुमारे इ.स.पू. १०६३

    परंतु दावीद शौलाला म्हणाला, “राजाचा जावई व्हावे असा मी कोण आहे, माझे कुटुंब काय आहे किंवा इस्राएलातील माझे कूळ काय आहे?”

  8. 1 शमुवेल १८:१९सुमारे इ.स.पू. १०६३

    तरीही जेव्हा शौलाची कन्या मेरबचा विवाह दावीदाशी होण्याची प्रत्यक्ष वेळ आली, तेव्हा तिचा विवाह महोलाथी अद्रीएल याच्याबरोबर झाला.

  9. 1 शमुवेल १८:२०सुमारे इ.स.पू. १०६३

    या दरम्यान शौलाची कन्या मीखल हिचे दावीदावर प्रेम जडले, हे ऐकून शौलाला आनंद झाला.

  10. 1 शमुवेल १८:२१सुमारे इ.स.पू. १०६३

    त्याने विचार केला, “मी तिला दावीदाला देईन, अशासाठी की ती त्याला पाश अशी होईल व पलिष्ट्यांचा हात त्याच्याविरुद्ध येईल.” तेव्हा शौल दावीदाला म्हणाला, “माझा जावई होण्यासाठी तुला अजून एक संधी आहे.”

  11. 1 शमुवेल १८:२२सुमारे इ.स.पू. १०६३

    तेव्हा शौलाने आपल्या सेवकांना आज्ञा दिली: “दावीदाशी गुप्तपणे बोलून सांगा की राजाला तू आवडतोस आणि त्याच्या सर्व सेवकांची तुझ्यावर प्रीती आहे; म्हणून राजाचा जावई हो.”

  12. 1 शमुवेल १८:२३सुमारे इ.स.पू. १०६३

    हे शब्द शौलाच्या सेवकांनी दावीदाला सांगितले. परंतु दावीद म्हणाला, “मी केवळ एक गरीब व अप्रसिद्ध मनुष्य आहे, राजाचा जावई होणे तुम्हाला फार हलकी गोष्ट वाटते काय?”

  13. 1 शमुवेल १८:२४सुमारे इ.स.पू. १०६३

    दावीद जे काही म्हणाला ते शौलाच्या सेवकांनी जेव्हा शौलाला कळविले,

  14. 1 शमुवेल १८:२५सुमारे इ.स.पू. १०६३

    शौलाने उत्तर दिले, “दावीदाला सांगा राजाला हुंडा म्हणून काही नको, मात्र राजाच्या शत्रूंचा सूड घ्यावा म्हणून शंभर पलिष्ट्यांची अग्रत्वचा पाहिजे.” दावीद पलिष्ट्यांच्या हाती मरून जावा यासाठी ही शौलाची योजना होती.

  15. 1 शमुवेल १८:२६सुमारे इ.स.पू. १०६३

    सेवकांनी ज्यावेळी या गोष्टी दावीदाला सांगितल्या, तो राजाचा जावई होण्यास आनंदाने तयार झाला, ठरविलेल्या वेळे आधी

  16. 1 शमुवेल १८:२७सुमारे इ.स.पू. १०६३

    दावीदाने आपली माणसे आपल्याबरोबर घेतली व जाऊन दोनशे पलिष्ट्यांना मारले आणि त्यांच्या अग्रत्वचा आणल्या, दावीद राजाचा जावई व्हावा म्हणून त्यांनी त्या मोजल्या. मग शौलाने आपली कन्या मीखल दावीदाला त्याची पत्नी म्हणून दिली.

  17. 1 शमुवेल १८:२८सुमारे इ.स.पू. १०६३

    जेव्हा शौलाला लक्षात आले की याहवेह दावीदाबरोबर होते आणि त्याची कन्या मीखल हिची दावीदावर प्रीती होती,

  18. 1 शमुवेल १८:२९सुमारे इ.स.पू. १०६३

    तेव्हा शौलाला दावीदाचे अधिकच भय वाटू लागले व तो त्याच्या आयुष्यभर दावीदाचा वैरी म्हणून राहिला.

  19. 1 शमुवेल १८:३०सुमारे इ.स.पू. १०६३

    पलिष्ट्यांच्या सरदारांनी बाहेर जाऊन युद्ध सुरूच ठेवले आणि जेव्हा ते असे करीत, त्या त्यावेळी शौलाच्या बाकीच्या सैन्यापेक्षा दावीदाला अधिक यश मिळे, आणि तो प्रसिद्ध होत गेला.

  20. 1 शमुवेल १९:१सुमारे इ.स.पू. १०६२

    शौलाने त्याचा पुत्र योनाथान आणि सर्व सेवकांना सांगितले की त्यांनी दावीदाला मारून टाकावे. परंतु योनाथानला दावीद फार आवडत असे

  21. 1 शमुवेल १९:२सुमारे इ.स.पू. १०६२

    म्हणून त्याने दावीदाला सावध केले, “माझा पिता शौल तुला मारण्याची संधी शोधत आहे. तर उद्या सकाळपर्यंत तू सावध राहा; गुप्त ठिकाणी जा व तिथेच लपून राहा.

  22. 1 शमुवेल १९:३सुमारे इ.स.पू. १०६२

    तू जिथे आहेस तिथे बाहेर मैदानात माझ्या पित्याबरोबर मी उभा राहीन; त्याच्याशी मी तुझ्याविषयी बोलेन आणि जे मला समजेल ते मी तुला कळवेन.”

  23. 1 शमुवेल १९:४सुमारे इ.स.पू. १०६२

    योनाथान त्याचा पिता शौल याच्याशी दावीदाबद्दल चांगले बोलत म्हणाला, “राजाने त्यांचा सेवक दावीद याचे काही वाईट करू नये; त्याने तुमचे काही वाईट केले नाही आणि त्याने जे काही केले त्यामुळे तुम्हाला मोठा फायदा झाला आहे.

  24. 1 शमुवेल १९:५सुमारे इ.स.पू. १०६२

    त्याने त्याचा प्राण पणाला लावून त्या पलिष्ट्याला मारले. याहवेहने सर्व इस्राएलसाठी मोठा विजय मिळवून दिला आणि तुम्हाला ते पाहून आनंद झाला होता. तर मग दावीदासारख्या निर्दोष व्यक्तीला विनाकारण मारून तुम्ही पाप का करावे?”

  25. 1 शमुवेल १९:६सुमारे इ.स.पू. १०६२

    शौलाने योनाथानचे बोलणे ऐकले आणि शपथ घेतली: “खचितच जिवंत याहवेहची शपथ, दावीदाला जिवे मारले जाणार नाही.”