मुख्य मजकुरावर जा

circa 1050–1010 BC

Samuel & King Saul

Israel demands a king; Samuel anoints Saul, whose disobedience leads to his rejection as God chooses a man after his own heart.

810 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. 1 शमुवेल १७:२०सुमारे इ.स.पू. १०६३

    सकाळी लवकरच दावीदाने आपली मेंढरे एका राखणदार्‍याच्या हाती सोडली, इशायाने सांगितल्याप्रमाणे सर्वकाही घेऊन निघाला. तो छावणीजवळ पोहोचला, तेव्हा सैन्य युद्धाच्या घोषणा देत त्यांच्या लढाईचे स्थानग्रहण करत होते.

  2. 1 शमुवेल १७:२१सुमारे इ.स.पू. १०६३

    इस्राएली आणि पलिष्टी सेना समोरासमोर उभ्या राहिल्या.

  3. 1 शमुवेल १७:२२सुमारे इ.स.पू. १०६३

    दावीदाने आपल्या वस्तू सामान राखणार्‍याच्या स्वाधीन केल्या व युद्धभुमीकडे धावत जाऊन त्याच्या भावांना अभिवादन केले.

  4. 1 शमुवेल १७:२३सुमारे इ.स.पू. १०६३

    तो त्यांच्याबरोबर बोलत असता, गथ येथील पलिष्टी महाशूरवीर गल्याथ त्याच्या जागेतून बाहेर येऊन नेहमीप्रमाणे ओरडून बोलला, आणि दावीदाने ते ऐकले.

  5. 1 शमुवेल १७:२४सुमारे इ.स.पू. १०६३

    त्या मनुष्याला पाहताच इस्राएली लोक मोठ्या भयाने पळून जात असत.

  6. 1 शमुवेल १७:२५सुमारे इ.स.पू. १०६३

    इस्राएली लोक म्हणत होते, “तुम्ही हा मनुष्य बाहेर येताना पाहता ना? तो इस्राएली लोकांना चेतावणी देण्यासाठी बाहेर येतो. जो कोणी त्याला ठार मारेल त्याला राजा मोठी संपत्ती देईल, तो त्याला त्याची कन्या देईल व इस्राएलात त्याचे कुटुंब करमुक्त होईल.”

  7. 1 शमुवेल १७:२६सुमारे इ.स.पू. १०६३

    दावीदाने त्याच्या बाजूला उभे असलेल्या पुरुषांना विचारले, “जो या पलिष्टी मनुष्याला मारेल आणि इस्राएलची ही अप्रतिष्ठा काढून टाकेल, त्याला काय करण्यात येईल? हा बेसुंती पलिष्टी मनुष्य कोण आहे की त्याने जिवंत परमेश्वराच्या सैन्याला चेतावणी द्यावी?”

  8. 1 शमुवेल १७:२७सुमारे इ.स.पू. १०६३

    ते जे काही म्हणत आले होते ते त्यांनी त्याला पुन्हा सांगितले आणि म्हणाले, “जो मनुष्य त्याला ठार मारेल त्याचे असे करण्यात येईल.”

  9. 1 शमुवेल १७:२८सुमारे इ.स.पू. १०६३

    जेव्हा दावीदाचा थोरला भाऊ एलियाब याने दावीदाला या लोकांबरोबर बोलतांना पाहिले, तेव्हा तो त्याच्यावर रागाने भडकला आणि त्याला विचारले, “तू येथे का आलास? आणि ती थोडीशी मेंढरे रानात तू कोणाबरोबर सोडली आहेत? तू किती गर्विष्ठ आहेस आणि तुझे हृदय किती दुष्ट आहे हे मी जाणतो; तू येथे खाली केवळ युद्ध पाहायला आला आहेस.”

  10. 1 शमुवेल १७:२९सुमारे इ.स.पू. १०६३

    दावीद म्हणाला, “मी काय केले आहे? मी बोलूपण नये काय?”

  11. 1 शमुवेल १७:३०सुमारे इ.स.पू. १०६३

    नंतर तो दुसर्‍या कोणाकडे वळला आणि तोच विषय पुढे नेला आणि त्यांनीही आधीप्रमाणेच उत्तर दिले.

  12. 1 शमुवेल १७:३१सुमारे इ.स.पू. १०६३

    दावीद जे बोलला ते कोणी ऐकले व ते शौलाला कळविले, तेव्हा शौलाने त्याला बोलावून घेतले.

  13. 1 शमुवेल १७:३२सुमारे इ.स.पू. १०६३

    दावीद शौलाला म्हणाला, “या पलिष्ट्यामुळे कोणी मनुष्याने खचून जाऊ नये; तुमचा सेवक पुढे जाऊन त्याच्याशी लढेल.”

  14. 1 शमुवेल १७:३३सुमारे इ.स.पू. १०६३

    शौलाने दावीदाला उत्तर दिले, “या पलिष्ट्यांविरुद्ध लढण्यास तू सक्षम नाहीस; तू केवळ कोवळा तरुण आहेस आणि तो त्याच्या तारुण्यापासून योद्धा आहे.”

  15. 1 शमुवेल १७:३४सुमारे इ.स.पू. १०६३

    परंतु दावीद शौलाला म्हणाला, “तुमचा सेवक त्याच्या वडिलांची मेंढरे राखीत असताना, एकदा एक सिंह व एकदा एक अस्वल येऊन त्याने कळपातील मेंढरू उचलून घेतले,

  16. 1 शमुवेल १७:३५सुमारे इ.स.पू. १०६३

    मी त्याच्यामागे गेलो, त्याला मारले व त्याच्या जबड्यातून मेंढरू बाहेर काढले. जेव्हा त्याने माझ्यावर झडप घातली, मी त्याचे केस धरून त्याला ठार मारले.

  17. 1 शमुवेल १७:३६सुमारे इ.स.पू. १०६३

    आपल्या दासाने सिंह व अस्वल हे दोन्ही मारले; हा बेसुंती पलिष्टीही त्यापैकी एकासारखा असेल, कारण त्याने जिवंत परमेश्वराच्या सेनेचा उपहास केला आहे.

  18. 1 शमुवेल १७:३७सुमारे इ.स.पू. १०६३

    ज्या याहवेहने मला सिंहाच्या व अस्वलाच्या पंजांतून सोडविले, तेच याहवेह मला या पलिष्ट्यांपासूनही सोडवेल.” शौल दावीदाला म्हणाला, “जा, याहवेह तुझ्याबरोबर असो.”

  19. 1 शमुवेल १७:३८सुमारे इ.स.पू. १०६३

    शौलाने आपली वस्त्रे दावीदाच्या अंगावर चढविली, त्याच्यावर चिलखत चढविले आणि त्याच्या डोक्यावर कास्य टोप घातला.

  20. 1 शमुवेल १७:३९सुमारे इ.स.पू. १०६३

    दावीदाने त्याच्या चिलखतावर तलवार बांधली, त्याला याचा आधी सराव नसल्यामुळे, त्याने चालण्याचा प्रयत्न केला. तो शौलाला म्हणाला, “मी यामध्ये चालू शकत नाही, मला याचा सराव नाही.” म्हणून दावीदाने तो पोशाख उतरविला.

  21. 1 शमुवेल १७:४०सुमारे इ.स.पू. १०६३

    नंतर त्याने आपली काठी हातात घेतली, ओहोळातून पाच गुळगुळीत गोटे घेतले व ते आपल्या धनगरी बटव्यात ठेवले व आपली गोफण हाती घेऊन त्या पलिष्ट्याकडे गेला.

  22. 1 शमुवेल १७:४१सुमारे इ.स.पू. १०६३

    त्या दरम्यान पलिष्टी गल्याथही दावीदाच्या जवळ येऊ लागला; त्याचा शस्त्रवाहक त्याच्यापुढे चालत होता.

  23. 1 शमुवेल १७:४२सुमारे इ.स.पू. १०६३

    पलिष्ट्याने दावीदाकडे नजर टाकून पाहिले की तो केवळ एक तरुण, तांबूस रंगाचा, सुंदर डोळ्यांचा, दिसायला रूपवान होता, आणि त्याने दावीदाला तुच्छ मानले.

  24. 1 शमुवेल १७:४३सुमारे इ.स.पू. १०६३

    तो दावीदाला म्हणाला, “माझ्यावर काठी घेऊन चालून येण्यास, मी कुत्रा आहे काय?” आणि त्या पलिष्ट्याने आपल्या दैवतांची नावे घेऊन दावीदाला शाप दिला.

  25. 1 शमुवेल १७:४४सुमारे इ.स.पू. १०६३

    तो पलिष्टी दावीदाला म्हणाला, “इकडे ये, म्हणजे मी तुझे मांस पक्ष्यांना व जंगली जनावरांना देईल.”