- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1050–1010 BC
Samuel & King Saul
Israel demands a king; Samuel anoints Saul, whose disobedience leads to his rejection as God chooses a man after his own heart.
या कालखंडातील वचने
- 1 शमुवेल १६:१८सुमारे इ.स.पू. १०६३
त्यापैकी एका सेवकाने उत्तर दिले, “मी बेथलेहेमकर इशायाचा पुत्र पाहिला आहे, तो वीणा वादनात निपुण आहे. तो शूर व योद्धा आहे, तो उत्तम वक्ता व रूपवान आहे; व याहवेह त्याच्याबरोबर आहेत.”
- 1 शमुवेल १६:१९सुमारे इ.स.पू. १०६३
तेव्हा शौलाने इशायाकडे निरोप पाठवून म्हटले, “तुझा पुत्र दावीद जो मेंढरे राखीत आहे त्याला माझ्याकडे पाठव.”
- 1 शमुवेल १६:२०सुमारे इ.स.पू. १०६३
तेव्हा इशायाने आपला पुत्र दावीदाबरोबर भाकरी, द्राक्षारसाचा एक बुधला व एक करडू लादलेले एक गाढव शौलाकडे पाठविले.
- 1 शमुवेल १६:२१सुमारे इ.स.पू. १०६३
दावीद शौलाकडे आला व त्याच्या सेवेस हजर झाला. शौलाला तो अतिशय आवडला व दावीद त्याचा एक शस्त्रवाहक झाला.
- 1 शमुवेल १६:२२सुमारे इ.स.पू. १०६३
नंतर शौलाने इशायला संदेश पाठवून सांगितले, “दावीदाला माझ्या सेवेत असू दे. कारण मी त्याच्यावर प्रसन्न आहे.”
- 1 शमुवेल १६:२३सुमारे इ.स.पू. १०६३
ज्या ज्यावेळी परमेश्वराकडून पाठविलेला दुष्ट आत्मा शौलावर येई, त्यावेळी दावीद आपली वीणा घेऊन वाजवित असे, तेव्हा शौलाला बरे वाटत असे, आणि दुष्ट आत्मा शौलाला सोडून जात असे.
- 1 शमुवेल १७:१सुमारे इ.स.पू. १०६३
पलिष्ट्यांनी युद्धासाठी आपले सैन्य गोळा केले आणि ते यहूदीयातील सोकोह येथे जमले. त्यांनी सोकोह आणि अजेकाह यांच्यामध्ये एफेस-दम्मिम येथे छावणी दिली.
- 1 शमुवेल १७:२सुमारे इ.स.पू. १०६३
शौल आणि इस्राएली लोक जमले आणि त्यांनी एलाहच्या खोर्यात छावणी दिली आणि पलिष्ट्यांशी युद्ध करण्यासाठी सेनेचे नियोजन केले.
- 1 शमुवेल १७:३सुमारे इ.स.पू. १०६३
पलिष्टी लोक एका टेकडीवर सज्ज झाले आणि दुसर्यावर इस्राएली लोक सज्ज झाले; व त्यांच्यामध्ये खोरे होते.
- 1 शमुवेल १७:४सुमारे इ.स.पू. १०६३
तेव्हा गथ येथील, गल्याथ नामक एक महाशूरवीर, पलिष्ट्यांच्या छावणीतून बाहेर आला, त्याची उंची सहा हात आणि एक वीत.
- 1 शमुवेल १७:५सुमारे इ.स.पू. १०६३
त्याच्या डोक्यावर कास्याचा टोप होता, त्याने खवल्यासारखे कास्याचे चिलखत घातले होते; ज्याचे वजन पाच हजार शेकेल होते;
- 1 शमुवेल १७:६सुमारे इ.स.पू. १०६३
त्याच्या पायात त्याने कास्याचे संरक्षण कवच घातले होते व कंबरेला कास्याची बरची लटकलेली होती.
- 1 शमुवेल १७:७सुमारे इ.स.पू. १०६३
विणकर्याच्या काठीसारखा त्याचा भाला होता आणि त्याच्या लोखंडी पात्याचे वजन सहाशे शेकेल होते. त्याचा ढाल वाहक त्याच्यापुढे चालत गेला.
- 1 शमुवेल १७:८सुमारे इ.स.पू. १०६३
गल्याथ उभा राहिला आणि इस्राएली सैन्याला ओरडून म्हणाला, “तुम्ही युद्ध रचण्यासाठी बाहेर येऊन का उभे आहात? मी पलिष्टी नाही काय आणि तुम्ही शौलाचे चाकर नाहीत काय? तुमच्यातील एक मनुष्य निवडा आणि त्याने माझ्याकडे यावे.
- 1 शमुवेल १७:९सुमारे इ.स.पू. १०६३
जर तो माझ्याशी लढून मला मारू शकेल तर आम्ही तुमची प्रजा होऊ; परंतु जर मी त्याच्यावर मात केली आणि त्याला मारले, तर तुम्ही आमची प्रजा होऊन आमची सेवा कराल.”
- 1 शमुवेल १७:१०सुमारे इ.स.पू. १०६३
तो पलिष्टी म्हणाला, “आज मी इस्राएली सैन्याला चेतावणी देतो! माझ्याकडे एक मनुष्य पाठवा म्हणजे आम्ही एकमेकांशी लढू.”
- 1 शमुवेल १७:११सुमारे इ.स.पू. १०६३
पलिष्ट्याचे हे शब्द ऐकून शौल आणि सर्व इस्राएली लोक घाबरून गेले.
- 1 शमुवेल १७:१२सुमारे इ.स.पू. १०६३
दावीद यहूदीयातील बेथलेहेम येथील एफ्राथी गोत्रातील इशायाचा पुत्र होता. इशायला आठ पुत्र होते आणि शौल राजाच्या कारकिर्दीत तो खूप वृद्ध झाला होता.
- 1 शमुवेल १७:१३सुमारे इ.स.पू. १०६३
इशायाचे तीन थोरले पुत्र; प्रथमपुत्र एलियाब, दुसरा अबीनादाब आणि तिसरा शम्माह हे युद्धासाठी शौलाच्या सेवेत गेले होते.
- 1 शमुवेल १७:१४सुमारे इ.स.पू. १०६३
दावीद सर्वांहून धाकटा होता. थोरले तीन शौलाबरोबर गेले,
- 1 शमुवेल १७:१५सुमारे इ.स.पू. १०६३
परंतु दावीद बेथलेहेमात आपल्या वडिलांची मेंढरे चारण्यासाठी शौलाकडून जात येत असे.
- 1 शमुवेल १७:१६सुमारे इ.स.पू. १०६३
तो पलिष्टी मनुष्य चाळीस दिवस दररोज सकाळी व संध्याकाळी समोर येऊन उभा राहत असे.
- 1 शमुवेल १७:१७सुमारे इ.स.पू. १०६३
एके दिवशी इशाय त्याचा पुत्र दावीदाला म्हणाला, “एक एफाभर भाजलेले हे धान्य आणि या दहा भाकरी तुझ्या भावांसाठी लवकर छावणीत घेऊन जा.
- 1 शमुवेल १७:१८सुमारे इ.स.पू. १०६३
त्याचबरोबर खव्याचे हे दहा लाडू त्यांच्या तुकडीच्या सेनापतीसाठी घे, तुझे भाऊ कसे आहेत ते पाहा आणि परत येताना त्यांच्याकडून काही शांतीची बातमी घेऊन ये.
- 1 शमुवेल १७:१९सुमारे इ.स.पू. १०६३
ते शौल आणि सर्व इस्राएली लोकांबरोबर एलाहच्या खोर्यामध्ये पलिष्ट्यांविरुद्ध युद्ध करीत आहेत.”