मुख्य मजकुरावर जा

circa 1050–1010 BC

Samuel & King Saul

Israel demands a king; Samuel anoints Saul, whose disobedience leads to his rejection as God chooses a man after his own heart.

810 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. 1 शमुवेल २०:३३सुमारे इ.स.पू. १०६२

    परंतु शौलाने योनाथानला मारण्यासाठी त्याच्यावर भाला फेकला. तेव्हा योनाथानला समजले की दावीदाला मारावे असा संकल्प त्याच्या पित्याने केला आहे.

  2. 1 शमुवेल २०:३४सुमारे इ.स.पू. १०६२

    योनाथान रागाने संतप्त होऊन मेजावरून उठला; चंद्रदर्शन सणाच्या दुसर्‍या दिवशी त्याने भोजन केले नाही; कारण दावीदाप्रित्यर्थ आपल्या पित्याची लज्जास्पद वागणूक पाहून त्याला फार वाईट वाटले.

  3. 1 शमुवेल २०:३५सुमारे इ.स.पू. १०६२

    सकाळी योनाथान एका लहान मुलाला घेऊन दावीदाची भेट घेण्यासाठी शेतात गेला.

  4. 1 शमुवेल २०:३६सुमारे इ.स.पू. १०६२

    आणि तो त्या मुलाला म्हणाला, “मी बाण मारतो, तू पळत जाऊन ते बाण शोध.” तो मुलगा पळू लागला, तेव्हा योनाथानने त्याच्या पलीकडे बाण मारला.

  5. 1 शमुवेल २०:३७सुमारे इ.स.पू. १०६२

    जेव्हा तो मुलगा योनाथानचा बाण ज्या ठिकाणी पडला होता तिथे आला, तेव्हा योनाथान त्याला ओरडून म्हणाला, “बाण तुझ्या पलीकडे नाही काय?”

  6. 1 शमुवेल २०:३८सुमारे इ.स.पू. १०६२

    तेव्हा योनाथान ओरडला, “घाई कर. लवकर जा! थांबू नकोस!” त्या मुलाने बाण उचलला आणि त्याच्या धन्याकडे परतला.

  7. 1 शमुवेल २०:३९सुमारे इ.स.पू. १०६२

    (त्या मुलाला या सर्व गोष्टीबद्दल काही माहीत नव्हते; फक्त योनाथान आणि दावीद यांनाच ते माहीत होते.)

  8. 1 शमुवेल २०:४०सुमारे इ.स.पू. १०६२

    नंतर योनाथानने आपली शस्त्रे त्या मुलाकडे देत म्हटले, “जा, हे घेऊन परत नगराकडे जा.”

  9. 1 शमुवेल २०:४१सुमारे इ.स.पू. १०६२

    तो मुलगा निघून गेल्यानंतर, दावीद त्या दगडाच्या दक्षिण बाजूने उठला आणि योनाथानसमोर भूमीवर उपडे पडून तीन वेळेस नमन केले. नंतर त्या दोघांनी एकमेकांचे चुंबन घेतले आणि एकत्र रडले—परंतु दावीद अधिक रडला.

  10. 1 शमुवेल २०:४२सुमारे इ.स.पू. १०६२

    योनाथान दावीदाला म्हणाला, “शांतीने जा, कारण याहवेहच्या नावाने आपण एकमेकांशी मैत्रीची शपथ घेतली आहे, आपण असे म्हटले आहे, ‘तुझ्या आणि माझ्यामध्ये आणि तुझे वंशज आणि माझे वंशज यामध्ये याहवेह साक्षी आहेत.’ ” तेव्हा दावीद तिथून निघाला आणि योनाथान नगराकडे परत गेला.

  11. 1 शमुवेल २१:१सुमारे इ.स.पू. १०६२

    दावीद नोब येथे अहीमेलेख याजकाकडे गेला. अहीमेलेख भीतीने कापत दावीदाला भेटला आणि विचारले, “तू एकटाच का आहेस? तुझ्याबरोबर कोणीच का नाही?”

  12. 1 शमुवेल २१:२सुमारे इ.स.पू. १०६२

    दावीदाने अहीमेलेख याजकाला उत्तर दिले, “राजाने मला एका कामगिरीवर पाठवले आहे आणि मला सांगितले, ‘ज्या कामगिरीवर मी तुला पाठवित आहे त्याबद्दल कोणालाही माहीत होऊ नये.’ आणि माझ्या माणसांनी मला मी एका ठराविक ठिकाणी भेटावे असे मी त्यांना सांगितले आहे.

  13. 1 शमुवेल २१:३सुमारे इ.स.पू. १०६२

    तर आता, तुझ्याजवळ काय आहे? मला पाच भाकरी दे किंवा तुझ्याजवळ जे काही असेल ते दे.”

  14. 1 शमुवेल २१:४सुमारे इ.स.पू. १०६२

    परंतु याजकाने दावीदाला उत्तर दिले, “माझ्याजवळ कोणती साधारण भाकर नाही, तरीही काही पवित्र भाकर येथे आहे, जी माणसे तुझ्याबरोबर आहेत ती मात्र स्त्रियांपासून दूर राहिली पाहिजेत.”

  15. 1 शमुवेल २१:५सुमारे इ.स.पू. १०६२

    दावीदाने याजकाला उत्तर दिले, “नक्कीच, नेहमीप्रमाणे मी जेव्हा बाहेर पडतो तेव्हा स्त्रियांना आमच्यापासून दूर ठेवतो. कामगिरी पवित्र नसताना सुद्धा माणसांची शरीरे पवित्र असतात. तर आज किती अधिक पवित्र असतील!”

  16. 1 शमुवेल २१:६सुमारे इ.स.पू. १०६२

    तेव्हा याजकाने त्याला समर्पित समक्षतेची भाकर दिली, कारण समर्पित भाकरीशिवाय दुसरी भाकर तिथे नव्हती. जेव्हा ताजी भाकरी याहवेहच्या समक्षतेत ठेवली जात असे तेव्हा शिळी भाकर काढून टाकली जात असे.

  17. 1 शमुवेल २१:७सुमारे इ.स.पू. १०६२

    त्या दिवशी शौलाचा एक सेवक तिथे होता, ज्याला याहवेहसमोर थांबवून ठेवले गेले होते; तो शौलाचा मुख्य मेंढपाळ दवेग, एदोमी प्रांतातील होता.

  18. 1 शमुवेल २१:८सुमारे इ.स.पू. १०६२

    दावीदाने अहीमेलेखास विचारले, “येथे तुझ्याकडे एखादा भाला किंवा तलवार आहे काय? कारण राजाची कामगिरी इतकी तातडीची होती, मी माझी तलवार किंवा दुसरे कोणतेही शस्त्र आणलेले नाही.”

  19. 1 शमुवेल २१:९सुमारे इ.स.पू. १०६२

    याजकाने उत्तर दिले, “ज्या पलिष्टी गल्याथाला तू एलाहच्या खोर्‍यात ठार मारलेस त्याची तलवार येथे आहे; ती कापडात गुंडाळून एफोदाच्या मागे ठेवलेली आहे. तुला पाहिजे तर ती तू घे; त्या शिवाय दुसरी तलवार येथे नाही.” दावीद म्हणाला, “तिच्यासारखी दुसरी तलवार नाही; ती मला दे.”

  20. 1 शमुवेल २१:१०सुमारे इ.स.पू. १०६२

    त्या दिवशी दावीद शौलापासून पळाला आणि गथचा राजा आखीशकडे गेला.

  21. 1 शमुवेल २१:११सुमारे इ.स.पू. १०६२

    परंतु आखीशाचे सेवक त्याला म्हणाले, “हा दावीद, या देशाचा राजा नाही काय? ज्याच्याविषयी त्यांनी असे म्हणून गाईले व नाचले तो हाच नाही काय: “शौलाने हजारांना वधले, आणि दावीदाने दहा हजार वधले?”

  22. 1 शमुवेल २१:१२सुमारे इ.स.पू. १०६२

    हे शब्द दावीदाच्या अंतःकरणाला लागले व त्याला गथचा राजा आखीशची भीती वाटली.

  23. 1 शमुवेल २१:१३सुमारे इ.स.पू. १०६२

    म्हणून त्याने त्यांच्यासमोर मनोविकृत असल्याचे सोंग घेतले; व तो त्यांच्याबरोबर होता तेव्हा तो वेड्यासारखे वागू लागला, फाटकाच्या दारांवर ओरडू लागला आणि आपल्या दाढीवरून लाळ गाळू लागला.

  24. 1 शमुवेल २१:१४सुमारे इ.स.पू. १०६२

    आखीश राजा त्याच्या सेवकांना म्हणाला, “पाहा तो मनुष्य वेडा आहे! त्याला माझ्याकडे का आणले?

  25. 1 शमुवेल २१:१५सुमारे इ.स.पू. १०६२

    माझ्याकडे वेडी माणसे कमी आहेत का की हे वेडेचाळे करावयाला या व्यक्तीला तुम्ही माझ्यासमोर आणले आहे? या मनुष्याने माझ्या घरात यावे काय?”