मुख्य मजकुरावर जा

circa AD 48–96

Letters to the Churches

Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.

2,767 वचने · 21 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याकोब ३:१२सुमारे इ.स. ६०

    माझ्या बंधूंनो व भगिनींनो, अंजिराचे झाड जैतुनाची फळे आणि द्राक्षवेल अंजीर उत्पन्न करू शकेल काय? नाही, तसेच खार्‍या पाण्याचा झरा ताजे पाणी देणार नाही.

  2. याकोब ३:१३सुमारे इ.स. ६०

    तुम्हामध्ये ज्ञानी आणि समंजस कोण आहे? त्याने ज्ञानाच्या लीनतेने आपल्या चांगल्या वर्तणुकीद्वारे आपले ज्ञान दाखवावे.

  3. याकोब ३:१४सुमारे इ.स. ६०

    परंतु तुम्ही कटुता, मत्सर आणि स्वार्थी इच्छा आपल्या अंतःकरणात बाळगत असाल, तर पोकळ बढाई मारू नका किंवा सत्य नाकारू नका.

  4. याकोब ३:१५सुमारे इ.स. ६०

    अशा प्रकारचे ज्ञान हे स्वर्गातून उतरत नाही, परंतु ते पृथ्वीवरील अनीतिमान व सैतानाकडून आहे.

  5. याकोब ३:१६सुमारे इ.स. ६०

    कारण जिथे मत्सर अथवा स्वार्थी हेतू असेल, तिथे अव्यवस्था व सर्व दुराचारी व्यवहार असतो.

  6. याकोब ३:१७सुमारे इ.स. ६०

    परंतु स्वर्गातून येणारे ज्ञान हे सर्वप्रथम शुद्ध, नंतर शांतिप्रिय, विचारशील, विनयी, दयामयी व चांगली फळे यांनी भरलेले, अपक्षपाती आणि प्रामाणिक असते.

  7. याकोब ३:१८सुमारे इ.स. ६०

    शांती करणारे शांतीचे बीज पेरतात आणि ते नीतिमत्वाचे पीक काढतात.

  8. याकोब ४:१सुमारे इ.स. ६०

    तुम्हामध्ये लढाया आणि भांडणे कशामुळे उत्पन्न होतात? ज्या इच्छा तुम्हामध्ये लढाई करतात त्यातून नाही काय?

  9. याकोब ४:२सुमारे इ.स. ६०

    तुम्ही इच्छा करता परंतु तुम्हाला प्राप्त होत नाही, यामुळे तुम्ही वध करता. तुम्ही लोभ धरता, परंतु जे पाहिजे ते तुम्हाला प्राप्त होत नाही, यामुळे तुम्ही भांडता आणि लढता. तुमच्याकडे नाही कारण तुम्ही परमेश्वराकडे मागत नाही.

  10. याकोब ४:३सुमारे इ.स. ६०

    जेव्हा तुम्ही मागता, तरी तुम्हाला ते मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य हेतूने, विलासाच्या गोष्टींवर खर्च करावा म्हणून मागता.

  11. याकोब ४:४सुमारे इ.स. ६०

    व्यभिचारी लोकांनो, जगाशी मैत्री परमेश्वराबरोबर वैर आहे हे तुम्हाला समजत नाही काय? यास्तव, जो कोणी जगाचा मित्र होण्याचे पसंत करतो तो परमेश्वराचा शत्रू झाला आहे.

  12. याकोब ४:५सुमारे इ.स. ६०

    त्याने जो आत्मा आपल्या ठायी ठेवला आहे तो सौम्य ईर्षेने आपल्यावर नजर ठेवतो, हे शास्त्राचे म्हणणे व्यर्थ आहे असे तुम्हास वाटते का?

  13. याकोब ४:६सुमारे इ.स. ६०

    परंतु ते आपल्याला अधिक कृपा देतात, यामुळे शास्त्रवचन सांगते, “परमेश्वर गर्विष्ठांचा विरोध करतात परंतु नम्रजनावर कृपा करतात.”

  14. याकोब ४:७सुमारे इ.स. ६०

    तुम्ही स्वतः परमेश्वराच्या अधीन व्हा. सैतानाचा विरोध करा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल;

  15. याकोब ४:८सुमारे इ.स. ६०

    तुम्ही परमेश्वराजवळ या म्हणजे ते तुम्हाजवळ येतील. अहो पाप्यांनो, आपले हात धुवा आणि दुहेरी मनाचे जे आहेत त्यांनी आपली अंतःकरणे शुद्ध करावीत.

  16. याकोब ४:९सुमारे इ.स. ६०

    तुम्ही रडा, शोक आणि आकांत करा. तुमचे हसणे शोकात आणि तुमचा आनंद खिन्नतेमध्ये बदलू द्या.

  17. याकोब ४:१०सुमारे इ.स. ६०

    प्रभूसमोर तुम्ही स्वतःला नम्र करा आणि ते तुम्हाला उंच करतील.

  18. याकोब ४:११सुमारे इ.स. ६०

    प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, एकमेकांची चहाडी करू नका. जो कोणी आपल्या बंधू किंवा भगिनी विरुद्ध बोलतो अथवा त्यांचा न्याय करतो, तो नियमाविरुद्ध बोलतो व न्याय करतो, जेव्हा तुम्ही नियमांविरुद्ध न्याय करता आणि ते पाळीत नाही, तर न्याय करणारे व्हाल.

  19. याकोब ४:१२सुमारे इ.स. ६०

    नियमशास्त्र देणारे आणि न्यायाधीश एकच आहेत, तेच उद्धार आणि नाश करू शकतात. परंतु आपल्या शेजार्‍याचा न्याय करणारा तू कोण?

  20. याकोब ४:१३सुमारे इ.स. ६०

    आता ऐका, तुम्ही म्हणता, “आम्ही आज किंवा उद्या या किंवा त्या शहरात जाऊ, तिथे वर्षभर राहू, उद्योग सुरू करू आणि पैसे कमवू.”

  21. याकोब ४:१४सुमारे इ.स. ६०

    तुम्हाला उद्या काय आणि कसे होणार हे माहीत नाही. तुमचे जीवन ते काय आहे? तुम्ही त्या धुक्यासारखे आहात, जे थोड्या वेळासाठी दिसते आणि नाहीसे होते.

  22. याकोब ४:१५सुमारे इ.स. ६०

    याऐवजी, तुम्ही असे म्हणावयास हवे, “जर प्रभूची इच्छा असेल, तर आम्ही जगू व हे किंवा ते करू.”

  23. याकोब ४:१६सुमारे इ.स. ६०

    जसे आता तुम्ही घमेंड करता आणि अभिमान बाळगता. अशा सर्व प्रकारची बढाई वाईट आहे.

  24. याकोब ४:१७सुमारे इ.स. ६०

    जर कोणाला चांगले करणे कळत असूनही, ते करत नाही, तर ते त्यांना पाप गणले जाते.

  25. याकोब ५:१सुमारे इ.स. ६०

    श्रीमंत लोकांनो, ऐका, जी आपत्ती तुमच्यावर येणार आहे त्यामुळे रडा आणि विलाप करा.