मुख्य मजकुरावर जा

circa AD 48–96

Letters to the Churches

Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.

2,767 वचने · 21 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याकोब ५:२सुमारे इ.स. ६०

    तुमची संपत्ती सडली आहे व तुमच्या वस्त्रांना गंज लागला आहे.

  2. याकोब ५:३सुमारे इ.स. ६०

    तुमचे सोने आणि चांदी याला गंज चढला आहे. त्यांचे गंजणे तुम्हाविरुद्ध साक्ष देईल आणि अग्नीप्रमाणे तुमचे मांस खाऊन टाकेल. शेवटच्या दिवसासाठी तुम्ही धनाचा साठा करून ठेवला आहे.

  3. याकोब ५:४सुमारे इ.स. ६०

    पाहा! ज्या कामकर्‍यांनी तुमची शेते कापली, त्यांचे वेतन तुम्ही दिले नाही ते तुमच्याविरुद्ध आक्रोश करीत आहेत. कापणी करणार्‍यांचा आक्रोश सेनाधीश प्रभूच्या कानावर गेला आहे.

  4. याकोब ५:५सुमारे इ.स. ६०

    पृथ्वीवर तुम्ही विलासात आणि भोगासक्तीत राहिला. तुम्ही स्वतःला वधासाठी धष्टपुष्ट केले आहे.

  5. याकोब ५:६सुमारे इ.स. ६०

    जो तुमचा विरोध करत नव्हता, त्या निष्पाप मनुष्याला तुम्ही दोषी ठरवून त्याचा वध केला.

  6. याकोब ५:७सुमारे इ.स. ६०

    प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, प्रभूचे आगमन होईपर्यंत धीर धरा. पाहा शेतकरी कसा जमिनीतून निघणार्‍या मोलवान पिकांची वाट पाहतो. शरद आणि वसंतामध्ये येणार्‍या पावसाची धीराने वाट पाहतो.

  7. याकोब ५:८सुमारे इ.स. ६०

    तसेच तुम्ही पण, धीर धरा आणि खंबीरपणे उभे राहा, कारण प्रभूचे येणे जवळ आले आहे.

  8. याकोब ५:९सुमारे इ.स. ६०

    बंधूंनो आणि भगिनींनो, तुमचा न्याय होऊ नये म्हणून एकमेकांविरुद्ध कुरकुर करू नका. न्यायाधीश दारात उभा आहे.

  9. याकोब ५:१०सुमारे इ.स. ६०

    बंधूंनो आणि भगिनींनो, संदेष्टे प्रभूच्या नावाने बोलत असताना त्यांनी सहन केलेले दुःख आणि धीर याचे उदाहरण लक्षात घ्या.

  10. याकोब ५:११सुमारे इ.स. ६०

    तुम्हाला माहीत आहे, ज्यांनी धीर धरला त्यांना आपण आशीर्वादित म्हणतो. तुम्ही इय्योबाच्या धीराविषयी ऐकले आणि शेवटी प्रभूने त्याला कसे आशीर्वादित केले हे तुम्ही पाहिले. प्रभू करुणा आणि दया यांनी भरलेले आहेत.

  11. याकोब ५:१२सुमारे इ.स. ६०

    या सर्वांपेक्षा, माझ्या बंधू आणि भगिनींनो, ना स्वर्गाची, ना पृथ्वीची किंवा दुसर्‍या कोणत्याच गोष्टींची शपथ वाहू नका. जे काही तुम्हाला म्हणावयाचे ते साधे “होय” किंवा “नाही” असावे. नाही तर तुम्ही दोषी ठरविले जाल.

  12. याकोब ५:१३सुमारे इ.स. ६०

    तुम्हापैकी कोणी त्रासात आहे काय? त्यांनी प्रार्थना करावी. कोणी आनंदी आहे काय? त्यांनी स्तुतिस्तोत्रे गावीत.

  13. याकोब ५:१४सुमारे इ.स. ६०

    तुम्हामध्ये कोणी आजारी आहे काय? त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तैलाभ्यंग करावा आणि प्रार्थना करावी.

  14. याकोब ५:१५सुमारे इ.स. ६०

    विश्वासाने केलेली प्रार्थना त्या रोग्याला बरे करेल; प्रभू त्याला उठवेल. जर त्यांनी पाप केले असेल, तर त्यांची क्षमा होईल.

  15. याकोब ५:१६सुमारे इ.स. ६०

    यास्तव एकमेकांजवळ आपली पापे कबूल करा व एकमेकांसाठी प्रार्थना करा, म्हणजे तुम्ही निरोगी व्हाल. नीतिमान माणसाची प्रार्थना प्रबळ व परिणामकारक असते.

  16. याकोब ५:१७सुमारे इ.स. ६०

    एलीयाह अगदी आपल्यासारख्या स्वभावाचा मनुष्य होता. त्याने पाऊस पडू नये अशी कळकळीने प्रार्थना केली आणि साडेतीन वर्षे भूमीवर पाऊस पडला नाही.

  17. याकोब ५:१८सुमारे इ.स. ६०

    मग त्याने पुन्हा प्रार्थना केली, तेव्हा आकाशातून पाऊस पडला आणि पृथ्वीने आपला उपज दिला.

  18. याकोब ५:१९सुमारे इ.स. ६०

    प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, जर तुम्हातील कोणी एक सत्यापासून बहकला असेल आणि अशा व्यक्तीला कोणी परत आणेल तर मग

  19. याकोब ५:२०सुमारे इ.स. ६०

    हे लक्षात ठेवा, जो कोणी अशा पापी व्यक्तीला त्याच्या अयोग्य मार्गापासून फिरवितो, तो त्याला मरणापासून वाचवेल आणि त्याच्या अनेक पापांवर पांघरूण घालेल.

  20. 1 पेत्र १:१सुमारे इ.स. ६०

    पेत्र, येशू ख्रिस्ताच्या प्रेषिताकडून,

  21. 1 पेत्र १:२सुमारे इ.स. ६०

    जे परमेश्वर पित्याच्या पूर्वज्ञानानुसार निवडलेले, आत्म्याच्या पवित्रीकरणाच्या कार्याद्वारे, येशू ख्रिस्ताचे आज्ञापालन करणारे, त्यांच्या रक्ताने सिंचन झालेले:

  22. 1 पेत्र १:३सुमारे इ.स. ६०

    परमेश्वर आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे पिता यांची स्तुती असो! त्यांनी आपल्या महान दयेने आणि येशू ख्रिस्ताच्या मृत्यूमधून झालेल्या पुनरुत्थानाद्वारे जिवंत आशेमध्ये आपल्याला नवीन जन्म दिला आहे.

  23. 1 पेत्र १:४सुमारे इ.स. ६०

    हे वतन अविनाशी असून कधीही नाश होत नाही किंवा कुजत नाही; आणि हे वतन तुमच्यासाठी स्वर्गात राखून ठेवले आहे.

  24. 1 पेत्र १:५सुमारे इ.स. ६०

    जे तारण शेवटच्या काळी प्रकट होण्यास सिद्ध आहे, ते तुम्हाला पूर्णपणे प्राप्त व्हावे याकरिता विश्वासाद्वारे परमेश्वराच्या शक्तीने तुम्ही सुरक्षित ठेवलेले आहात.

  25. 1 पेत्र १:६सुमारे इ.स. ६०

    त्याविषयी तुम्ही खूप उल्लास करता, तरी आता थोडा वेळ वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांमुळे दुःख सोसणे तुम्हाला भाग पडत आहे.