मुख्य मजकुरावर जा

circa AD 48–96

Letters to the Churches

Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.

2,767 वचने · 21 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 1 पेत्र १:७सुमारे इ.स. ६०

    ही तुमच्या विश्वासाची सिद्ध निष्ठा सोन्यापेक्षा कितीतरी अधिक मौल्यवान आहे, जे अग्नीने शुद्ध केलेले असूनही नाश पावते. जेव्हा येशू ख्रिस्त प्रकट होतील तेव्हा त्या विश्वासाची स्तुती, गौरव आणि सन्मान होऊ शकेल.

  2. 1 पेत्र १:८सुमारे इ.स. ६०

    त्यांना पाहिले नसतानाही, तुम्ही त्यांच्यावर प्रीती करता; ते दिसत नसतानाही, तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवता आणि अवर्णनीय गौरवी आनंदाने उल्हासता,

  3. 1 पेत्र १:९सुमारे इ.स. ६०

    कारण त्यांच्यावर विश्वास ठेवल्यामुळे पुढे मिळणारे तुमच्या आत्म्याचे तारण हे तुमचे प्रतिफळ आहे.

  4. 1 पेत्र १:१०सुमारे इ.स. ६०

    तुमच्याकडे जी येणार होती, त्या कृपेबद्दल ज्या संदेष्ट्यांनी तुम्हाला सांगितले, त्यांनी या तारणासंबंधी लक्षपूर्वक शोध घेतला आणि मोठ्या काळजीने,

  5. 1 पेत्र १:११सुमारे इ.स. ६०

    त्यांच्यामध्ये असणार्‍या ख्रिस्ताच्या आत्म्याद्वारे त्यांनी ख्रिस्ताचे दुःखसहन आणि त्यानंतर येणार्‍या गौरवी गोष्टीबद्दल भविष्य केले, तेव्हा त्यांनी ती वेळ आणि परिस्थिती शोधण्याचा प्रयत्न केला.

  6. 1 पेत्र १:१२सुमारे इ.स. ६०

    ते त्यांना यासाठी प्रकट केले होते की, ते स्वतःची सेवा नव्हे तर तुमची करीत होते. ते ज्या गोष्टींविषयी बोलले होते, त्या गोष्टी तुम्हाला स्वर्गातून पाठविलेल्या पवित्र आत्म्याद्वारे, ज्यांनी शुभवार्तेची घोषणा केली त्यांच्याद्वारे तुम्हाला आता सांगितल्या आहेत. स्वर्गदूतांना सुद्धा या गोष्टी जाणून घेण्याची इच्छा होती.

  7. 1 पेत्र १:१३सुमारे इ.स. ६०

    म्हणून येशू ख्रिस्त प्रकट होतील तेव्हा तुम्हाला दिल्या जाणार्‍या कृपेवर सावध अंतःकरणाने आणि संपूर्ण विचारशीलतेने तुमची आशा ठेवा.

  8. 1 पेत्र १:१४सुमारे इ.स. ६०

    आज्ञांकित मुलांसारखे व्हा आणि अज्ञानपणातील वाईट इच्छेला अनुसरून जसे तुम्ही पूर्वी जगत होता तसे आता जगू नका.

  9. 1 पेत्र १:१५सुमारे इ.स. ६०

    परंतु ज्यांनी तुम्हाला पाचारण केले ते जसे पवित्र आहेत, तसेच तुम्हीही जे काही करता त्यांच्यामध्ये पवित्र असा.

  10. 1 पेत्र १:१६सुमारे इ.स. ६०

    कारण शास्त्रलेखात असे लिहिले आहे, “तुम्ही पवित्र असावे, कारण मी पवित्र आहे.”

  11. 1 पेत्र १:१७सुमारे इ.स. ६०

    तुम्ही ज्यांना पिता म्हणून हाक मारता, ते प्रत्येक व्यक्तीच्या कामाचा निःपक्षपातीपणाने न्याय करतात, म्हणून या जगात तुमचे जीवन परदेशीयांसारखे आदरयुक्त भीतीने व्यतीत करा.

  12. 1 पेत्र १:१८सुमारे इ.स. ६०

    तुम्हाला माहीत आहे की, तुमच्या पूर्वजांपासून परंपरेने चालत आलेल्या निरर्थक वागणुकीपासून चांदी किंवा सोने अशा नाशवंत वस्तूंनी तुमची सुटका केली नाही,

  13. 1 पेत्र १:१९सुमारे इ.स. ६०

    परंतु निष्कलंक आणि निर्दोष कोकरा, जे ख्रिस्त त्यांच्या मौल्यवान रक्ताने झाली.

  14. 1 पेत्र १:२०सुमारे इ.स. ६०

    या जगाची निर्मिती होण्यापूर्वीच त्यांची निवड झाली होती, परंतु या शेवटच्या काळात ते तुमच्यासाठी प्रकट झाले.

  15. 1 पेत्र १:२१सुमारे इ.स. ६०

    त्यांच्याद्वारे तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवता, ज्यांना परमेश्वराने मरणातून उठविले आणि त्यांचे गौरव केले, म्हणून तुमचा विश्वास आणि तुमची आशा परमेश्वरामध्ये आहे.

  16. 1 पेत्र १:२२सुमारे इ.स. ६०

    आता सत्याचे आज्ञापालन करून तुम्ही स्वतःला शुद्ध केले आहे यासाठी की, तुमची एकमेकांवर खरी प्रीती असावी आणि एकमेकांवर खोल अंतःकरणापासून प्रीती करावी.

  17. 1 पेत्र १:२३सुमारे इ.स. ६०

    कारण नाशवंत बीजापासून नव्हे, तर अविनाशी बीजापासून, जिवंत आणि सर्वकाळ टिकणार्‍या परमेश्वराच्या वचनाद्वारे तुमचा नवीन जन्म झाला आहे.

  18. 1 पेत्र १:२४सुमारे इ.स. ६०

    कारण, “सर्व लोक गवतासारखे आहेत, आणि त्यांचे सौंदर्य वनातील फुलांसारखे आहे. गवत सुकते आणि फूल कोमेजते.

  19. 1 पेत्र १:२५सुमारे इ.स. ६०

    परंतु प्रभूचे वचन सर्वकाळ टिकते.” आणि हेच ते वचन आहे ज्याचा प्रचार तुम्हाला करण्यात आला होता.

  20. 1 पेत्र २:१सुमारे इ.स. ६०

    यास्तव, सर्व वैरभाव आणि सर्व खोटेपणा, ढोंग, मत्सर आणि प्रत्येक प्रकारच्या दुर्भाषणाचा त्याग करा.

  21. 1 पेत्र २:२सुमारे इ.स. ६०

    नवीन जन्मलेल्या बालकांसारखे शुद्ध, आध्यात्मिक दुधाची इच्छा धरा म्हणजे तुम्ही तुमच्या तारणाच्या अनुभवामध्ये वाढत जाल.

  22. 1 पेत्र २:३सुमारे इ.स. ६०

    कारण प्रभू चांगले आहेत याचा तुम्ही आता अनुभव घेतला आहे.

  23. 1 पेत्र २:४सुमारे इ.स. ६०

    जो जिवंत दगड बांधणार्‍यांनी नाकारला, परंतु परमेश्वराने निवडलेला आणि त्यांना मोलवान असलेल्या ख्रिस्ताकडे तुम्ही आला आहात.

  24. 1 पेत्र २:५सुमारे इ.स. ६०

    तुम्ही सुद्धा, जिवंत दगडांसारखे आत्मिक मंदिर म्हणून बांधले जात आहात, यासाठी की येशू ख्रिस्ताद्वारे परमेश्वराने स्वीकारण्यास योग्य असे आत्मिक यज्ञ अर्पिण्यासाठी तुम्ही पवित्र याजकगण व्हावे.

  25. 1 पेत्र २:६सुमारे इ.स. ६०

    कारण शास्त्रलेखात असे लिहिले आहे: “पाहा, सीयोनात मी एक दगड ठेवितो निवडलेला आणि मौल्यवान कोनशिला, त्यांच्यावर विश्वास ठेवणारा कधीही लज्जित होणार नाही.”