मुख्य मजकुरावर जा

circa AD 48–96

Letters to the Churches

Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.

2,767 वचने · 21 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 1 पेत्र ३:७सुमारे इ.स. ६०

    पतींनो, त्याच प्रकारे तुम्ही आपल्या पत्नीबरोबर राहत असताना त्या नाजूक आहेत म्हणून सुज्ञतेने राहा, तुमच्याबरोबर त्यादेखील कृपेच्या जीवनाच्या देणग्यांच्या वतनदार आहेत, म्हणून त्यांना मान द्या म्हणजे तुमच्या प्रार्थनेत व्यत्यय येणार नाही.

  2. 1 पेत्र ३:८सुमारे इ.स. ६०

    सारांश, तुम्ही सर्व एकचित्ताने एकमेकांवर खर्‍या प्रीतीने व सहानुभूतीने बंधुप्रीती करणारे, दयाळू व नम्र असे व्हा.

  3. 1 पेत्र ३:९सुमारे इ.स. ६०

    वाईटाची फेड वाईटाने किंवा अपमानाची फेड अपमानाने करू नका. याउलट, वाईटाची फेड आशीर्वाद देऊन करा, कारण आशीर्वाद हे वतन मिळविण्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे.

  4. 1 पेत्र ३:१०सुमारे इ.स. ६०

    कारण, “जो जीवनावर प्रीती करतो आणि चांगले दिवस पाहण्याची अपेक्षा करतो, तर त्यांनी आपली जीभ वाईटापासून आणि आपले ओठ कपट बोलण्यापासून राखावे.

  5. 1 पेत्र ३:११सुमारे इ.स. ६०

    त्यांनी वाईटाचा त्याग करावा आणि चांगले ते करावे; त्यांनी शांतीचा यत्न करावा व तिच्यामागे लागावे.

  6. 1 पेत्र ३:१२सुमारे इ.स. ६०

    कारण प्रभूचे नेत्र नीतिमानांवर आहेत, आणि त्यांचे कान नीतिमानांच्या प्रार्थनेकडे लागलेले असतात. परंतु प्रभूचे मुख जे वाईट करतात त्यांच्याविरुद्ध आहे.”

  7. 1 पेत्र ३:१३सुमारे इ.स. ६०

    चांगले करण्याची आस्था असेल, तर सहसा कोणी तुम्हाला अपाय करणार नाही.

  8. 1 पेत्र ३:१४सुमारे इ.स. ६०

    जर तुम्ही चांगले केल्याबद्दल सहन करता, तर तुम्ही आशीर्वादित आहात. “त्यांच्या अफवांना भिऊ नका आणि घाबरू नका.”

  9. 1 पेत्र ३:१५सुमारे इ.स. ६०

    ख्रिस्ताला प्रभू म्हणून आपल्या अंतःकरणात आदरणीय माना. तुमच्यामध्ये जी आशा आहे व ती का आहे, याविषयी विचारपूस करणार्‍या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा आणि ते सौम्यतेने व आदरपूर्वक करा.

  10. 1 पेत्र ३:१६सुमारे इ.स. ६०

    आदरयुक्त, शुद्ध विवेकबुद्धीला अनुसरून राहा, म्हणजे ख्रिस्तामधील तुमच्या चांगल्या वागणुकीविरुद्ध जे लोक द्वेषभावाने बोलतात, त्यांना निंदानालस्तीची लाज वाटेल.

  11. 1 पेत्र ३:१७सुमारे इ.स. ६०

    तुम्ही दुःख सोसावे अशी परमेश्वराची इच्छा असेल, तर वाईट करून दुःख भोगण्यापेक्षा, चांगले करून दुःख सोसणे, अधिक चांगले आहे!

  12. 1 पेत्र ३:१८सुमारे इ.स. ६०

    नीतिमान असताना अनीतिमान लोकांना, तुम्हाला परमेश्वराकडे न्यावे म्हणून ख्रिस्तानेसुद्धा पापांसाठी एकदाच दुःख सोसले, शारीरिक दृष्टीने त्यांचा मृत्यू झाला होता, परंतु आत्म्यामध्ये त्यांना जिवंत केले होते.

  13. 1 पेत्र ३:१९सुमारे इ.स. ६०

    जिवंत झाल्यानंतर येशू गेले आणि बंदीशाळेतील आत्म्यांना संदेश दिला

  14. 1 पेत्र ३:२०सुमारे इ.स. ६०

    ज्यांनी परमेश्वराच्या आज्ञेचे पालन केले नव्हते; पूर्वी नोआहच्या काळामध्ये जहाज बांधले जात असताना परमेश्वराने धीराने त्यांची वाट पाहिली. त्यामध्ये असलेले फक्त थोडे लोक, सर्व मिळून आठजण पाण्यामधून वाचले होते.

  15. 1 पेत्र ३:२१सुमारे इ.स. ६०

    ते पाणी आपल्यासाठी बाप्तिस्म्याचे चित्र आहे, ते शरीराची घाण काढून नाही तर परमेश्वराकडे सदसद्विवेकबुद्धीची प्रतिज्ञा केल्याने आता तुम्हालासुद्धा वाचविते. ते तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे वाचविते.

  16. 1 पेत्र ३:२२सुमारे इ.स. ६०

    ते येशू आता स्वर्गात गेले आहेत आणि परमेश्वराच्या उजवीकडे असून सर्व स्वर्गदूत, अधिकार आणि सत्ता त्यांच्या अधीन आहेत.

  17. 1 पेत्र ४:१सुमारे इ.स. ६०

    म्हणून, ज्याअर्थी ख्रिस्ताने त्यांच्या शरीरामध्ये दुःख सहन केले, त्याअर्थी तुम्ही सुद्धा तीच मनोवृत्ती धारण केली पाहिजे, कारण जो कोणी शरीरामध्ये दुःख सहन करतो तो पापाचा त्याग करतो.

  18. 1 पेत्र ४:२सुमारे इ.स. ६०

    याचा परिणाम असा होतो की, त्यांचे उरलेले ऐहिक जीवन ते मानवाच्या वाईट इच्छेप्रमाणे नव्हे तर परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जगतात.

  19. 1 पेत्र ४:३सुमारे इ.स. ६०

    कारण गैरयहूदी लोकांप्रमाणे व्यभिचार, कामातुरपणा, मद्यासक्ती, रंगेलपणा, बदफैली आणि घृणित मूर्तिपूजा करण्यात तुम्ही बराच वेळ घालविला.

  20. 1 पेत्र ४:४सुमारे इ.स. ६०

    त्यांना आश्चर्य वाटते की तुम्ही आता त्यांच्या बेपर्वा, वाईट जीवनात सामील होत नाही आणि ते तुमची निंदा करतात.

  21. 1 पेत्र ४:५सुमारे इ.स. ६०

    पण एवढे लक्षात ठेवा की, त्यांना त्यांचा हिशोब त्या परमेश्वराला द्यावा लागेल जे जिवंतांचा आणि मेलेल्यांचा न्याय करण्यास सिद्ध आहेत.

  22. 1 पेत्र ४:६सुमारे इ.स. ६०

    याच कारणासाठी शुभवार्तेचा प्रचार जे आता मृत झाले आहेत त्यांना करण्यात आला होता, यासाठी की देहामध्ये त्यांचा न्यायनिवाडा मनुष्याच्या प्रमाणानुसार व्हावा परंतु आत्म्यामध्ये त्यांनी परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जिवंत राहवे.

  23. 1 पेत्र ४:७सुमारे इ.स. ६०

    सर्व गोष्टींचा अंतकाळ जवळ आला आहे म्हणून सावध आणि विचारशील असा, म्हणजे तुम्हाला प्रार्थना करता येईल.

  24. 1 पेत्र ४:८सुमारे इ.स. ६०

    सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकमेकांवर निष्ठेने प्रीती करा, कारण प्रीती पुष्कळ पापांची रास झाकून टाकते.

  25. 1 पेत्र ४:९सुमारे इ.स. ६०

    कुरकुर न करता एकमेकांचे आदरातिथ्य करा.