मुख्य मजकुरावर जा

circa AD 48–96

Letters to the Churches

Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.

2,767 वचने · 21 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 2 पेत्र १:२सुमारे इ.स. ६६

    परमेश्वर आणि आपले येशू प्रभू यांच्या ज्ञानाद्वारे कृपा व शांती तुम्हाला अधिकाधिक प्राप्त होवो.

  2. 2 पेत्र १:३सुमारे इ.स. ६६

    त्यांच्या दैवी सामर्थ्याने तुम्हाला त्यांच्या स्वतःच्या वैभवात व चांगुलपणात सहभागी होण्यास पाचारण केले, त्यांच्या ज्ञानाद्वारे जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्वगोष्टी आपल्याला दिल्या आहेत.

  3. 2 पेत्र १:४सुमारे इ.स. ६६

    याद्वारे त्यांनी आपल्याला त्यांची अतिमहान आणि मोलवान अभिवचने दिली आहेत, यासाठी की त्याद्वारे त्यांच्या दैवीस्वभावात आपण सहभागी व्हावे व जगाच्या भ्रष्टतेतून निर्माण होणार्‍या वाईट वासनेपासून आपली सुटका व्हावी.

  4. 2 पेत्र १:५सुमारे इ.स. ६६

    कारण याच कारणासाठी, तुमच्या विश्वासामध्ये चांगुलपणाची भर घालण्याचा प्रयत्न करा; चांगुलपणात ज्ञानाची;

  5. 2 पेत्र १:६सुमारे इ.स. ६६

    ज्ञानात आत्मसंयमाची; आत्मसंयमात धीराची; धीरात सुभक्तीची;

  6. 2 पेत्र १:७सुमारे इ.स. ६६

    सुभक्तीत बंधुप्रेमाची; बंधुप्रेमात प्रीतीची.

  7. 2 पेत्र १:८सुमारे इ.स. ६६

    कारण जर हे गुण तुमच्यामध्ये वाढत असले तर ते आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या ज्ञानात तुम्हाला निष्क्रिय व निष्फळ होण्यापासून राखतील.

  8. 2 पेत्र १:९सुमारे इ.स. ६६

    ज्याच्याजवळ हे गुण नाहीत तो दूरदृष्टी नसलेला आणि आंधळा आहे, त्याला आपल्या पूर्वीच्या पापापासून शुद्ध झाल्याचा विसर पडला आहे.

  9. 2 पेत्र १:१०सुमारे इ.स. ६६

    यास्तव, माझ्या बंधू आणि भगिनींनो तुमचे पाचारण आणि निवड दृढ करण्यासाठी होईल तितके प्रयत्न करा. असे केल्यास तुम्ही कधीही अडखळणार नाही किंवा तुमचे पतन होणार नाही,

  10. 2 पेत्र १:११सुमारे इ.स. ६६

    तर आपले प्रभू आणि तारणारे येशू ख्रिस्त यांच्या शाश्वत राज्यात तुमचे भव्य स्वागत होईल.

  11. 2 पेत्र १:१२सुमारे इ.स. ६६

    जरी तुम्हाला या गोष्टी माहीत आहेत आणि तुमच्याकडे असलेल्या सत्यात तुम्ही निश्चितपणे स्थिर झालेले आहात, तरी या गोष्टींची मी तुम्हाला नेहमीच आठवण करून देईन.

  12. 2 पेत्र १:१३सुमारे इ.स. ६६

    मला असे वाटते की, जोपर्यंत मी या शारीरिक तंबूमध्ये राहत आहे, तोपर्यंत तुमची स्मरणशक्ती ताजीतवानी करणे हे योग्य आहे;

  13. 2 पेत्र १:१४सुमारे इ.स. ६६

    कारण मला माहीत आहे की मी लवकरच हा शारीरिक मंडप सोडणार आहे, जसे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने मला स्पष्ट करून दिले आहे.

  14. 2 पेत्र १:१५सुमारे इ.स. ६६

    माझे निर्गमन झाल्यावर या गोष्टी तुम्हाला सतत लक्षात राहतील यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन.

  15. 2 पेत्र १:१६सुमारे इ.स. ६६

    चातुर्याने कल्पिलेल्या कथास अनुसरून आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे सामर्थ्य आणि आगमन यासंबंधाने कळविले होते असे नाही, परंतु आम्ही त्यांच्या वैभवाचे साक्षी आहोत.

  16. 2 पेत्र १:१७सुमारे इ.स. ६६

    त्यांना परमेश्वरपित्याकडून सन्मान आणि गौरव मिळाले, तेव्हा सर्वोच्च गौरवी परमेश्वराकडून अशी वाणी झाली, “हा माझा परमप्रिय पुत्र आहे आणि त्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.”

  17. 2 पेत्र १:१८सुमारे इ.स. ६६

    आम्ही त्यांच्याबरोबर पवित्र डोंगरावर असताना आकाशातून झालेली वाणी आम्ही स्वतः ऐकली आहे.

  18. 2 पेत्र १:१९सुमारे इ.स. ६६

    आमच्याकडे संदेष्ट्यांचा निश्चित संदेश आहे, तो अंधारात प्रकाशणार्‍या दिव्याप्रमाणे आहे. तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत व पहाटेचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्याल तर बरे होईल.

  19. 2 पेत्र १:२०सुमारे इ.स. ६६

    सर्वात महत्त्वाचे, प्रथम हे ध्यानात ठेवा की, धर्मशास्त्रातील कोणत्याही संदेशाचा उलगडा संदेष्ट्यांच्या स्वतःच्या कल्पनेने करता येत नाही.

  20. 2 पेत्र १:२१सुमारे इ.स. ६६

    कारण भविष्यकथन मनुष्यांच्या इच्छेने कधी झालेले नाही, तर संदेष्ट्यांनी, जरी ते मनुष्य होते तरी पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन परमेश्वराकडून आलेला संदेश सांगितला आहे.

  21. 2 पेत्र २:१सुमारे इ.स. ६६

    परंतु लोकांमध्ये सुद्धा खोटे संदेष्टे होते, तसेच तुमच्यामध्ये खोटे शिक्षक असतील, ते गुप्त रीतीने विध्वंसक पाखंडी मते प्रचारात आणतील, ज्याने त्यांना विकत घेतले अशा सार्वभौम प्रभूला नाकारतात आणि स्वतःवर आकस्मिक नाश ओढवून घेतील.

  22. 2 पेत्र २:२सुमारे इ.स. ६६

    पुष्कळजण त्यांच्या अनैतिक कृत्यांचे अनुकरण करतील व सत्याच्या मार्गाची त्यामुळे निंदा होईल.

  23. 2 पेत्र २:३सुमारे इ.स. ६६

    हे शिक्षक त्यांच्या लोभापायी बनावट गोष्टी सांगून तुमच्याकडून पैसे मिळवतील. त्यांच्यासाठी नेमलेला दंड दीर्घकाळापासून त्यांच्यावर लटकत आहे आणि त्यांचा नाश डुलक्या घेत नाही.

  24. 2 पेत्र २:४सुमारे इ.स. ६६

    कारण जर परमेश्वराने पाप करणार्‍या देवदूतांना राखले नाही, परंतु नरकात पाठविले, निबिड काळोखाच्या बंधनात न्यायासाठी अटकेत ठेवले.

  25. 2 पेत्र २:५सुमारे इ.स. ६६

    त्यांनी प्राचीन जगाचीही गय केली नाही, तर अभक्तांच्या जगावर जलप्रलय आणला आणि नीतिमत्त्वाचा संदेश देणारा नोआहचे सात जणांसह रक्षण केले.