मुख्य मजकुरावर जा

circa AD 48–96

Letters to the Churches

Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.

2,767 वचने · 21 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 2 पेत्र २:६सुमारे इ.स. ६६

    पुढे येणार्‍या अनीतिमानास उदाहरण देण्यासाठी सदोम व गमोरा ही नगरे भस्म करून त्यांची राख केली व त्यांनी त्यांना विध्वंसाची शिक्षा केली.

  2. 2 पेत्र २:७सुमारे इ.स. ६६

    त्यांनी अनीतिमान लोकांच्या कामातुर वर्तनास दुःखी झालेल्या नीतिमान लोटाची सुटका केली,

  3. 2 पेत्र २:८सुमारे इ.स. ६६

    (कारण तो नीतिमान मनुष्य त्यांच्यामध्ये दिवसेंदिवस राहून त्यांची अधर्मी कृत्ये पाहून व ऐकून त्याचा नीतिमान जीव तीव्र दुःखी झाला होता.)

  4. 2 पेत्र २:९सुमारे इ.स. ६६

    नीतिमान लोकांना परीक्षेतून कसे सोडवावे व अनीतिमान लोकांना शिक्षा भोगीत न्यायाच्या दिवसासाठी कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते.

  5. 2 पेत्र २:१०सुमारे इ.स. ६६

    विशेषकरून अशा लोकांसाठी हे खरे आहे जे देहाच्या भ्रष्ट अभिलाषांच्या मागे लागतात आणि अधिकारास तुच्छ मानतात. धाडसी आणि उद्धट असून ते स्वर्गीय प्राण्यांची निंदा करण्यास घाबरत नाहीत;

  6. 2 पेत्र २:११सुमारे इ.स. ६६

    स्वर्गातील देवदूत अधिक समर्थ आणि बलवान आहेत तरीसुद्धा प्रभूकडून अशा प्राण्यांचा न्याय होत असताना ते त्यांची निंदा करीत नाहीत.

  7. 2 पेत्र २:१२सुमारे इ.स. ६६

    परंतु हे लोक जे काही त्यांना समजत नाही त्या गोष्टींविषयी निंदा करीत असतात. ते उपजत निर्बुद्ध प्राणी पकडले जाऊन त्यांचा नाश व्हावा एवढ्यासाठी जन्मलेल्या पशूंसारखे स्वतःचा सुद्धा नाश करून घेतील.

  8. 2 पेत्र २:१३सुमारे इ.स. ६६

    त्यांनी केलेल्या हानीचे प्रतिफळ त्यांच्या पदरी पडेल. दिवसाच्या प्रकाशात चैनबाजी करण्यात ते आनंद मानतात, ते डाग व कलंक आहेत. तुमच्याबरोबर मेजवान्या करताना ते फसवेगिरीने वागतात व त्यात त्यांना मौज वाटते.

  9. 2 पेत्र २:१४सुमारे इ.स. ६६

    त्यांच्या नजरेत व्यभिचार भरला असून पाप केल्यावाचून त्यांना राहवत नाही. ते अस्थिर मनाच्या लोकांना मोह घालतात. त्यांची हृदये लोभात निर्ढावलेली असतात; ते शापग्रस्त लोक आहेत!

  10. 2 पेत्र २:१५सुमारे इ.स. ६६

    ते सरळ मार्ग सोडून बहकले आहेत आणि दुष्टपणाचे वेतन प्रिय मानणारा बौराचा पुत्र बलामच्या मार्गाने गेले आहेत.

  11. 2 पेत्र २:१६सुमारे इ.स. ६६

    परंतु त्याच्या अयोग्य कृत्याबद्दल गाढवाद्वारे त्याचा निषेध करण्यात आला. मुक्या गाढवाने मनुष्यवाणीने बोलून संदेष्ट्याच्या वेडेपणाला आळा घातला.

  12. 2 पेत्र २:१७सुमारे इ.स. ६६

    हे लोक कोरड्या झर्‍यांसारखे, वादळाने उडविलेल्या ढगांसारखे आहेत. त्यांच्यासाठी काळाकुट्ट अंधार राखलेला आहे.

  13. 2 पेत्र २:१८सुमारे इ.स. ६६

    कारण जेव्हा चुकीने वागणार्‍या लोकांमधून कोणी बाहेर पडले असतील, त्यांना हे लोक मूर्खपणाच्या, मोठ्या फुगीर गोष्टी बोलून आणि देहाच्या वासनांद्वारे कामातुरपणाने भुरळ घालतात.

  14. 2 पेत्र २:१९सुमारे इ.स. ६६

    हे त्यांना स्वतंत्रतेचे वचन देतात जेव्हा ते स्वतःच दुष्टतेचे दास आहेत, कारण “लोक ज्याच्या अधिकारात आहेत, ते त्याचे दास आहेत.”

  15. 2 पेत्र २:२०सुमारे इ.स. ६६

    प्रभू व तारणारा येशू ख्रिस्तांच्या ज्ञानाद्वारे जगाच्या भ्रष्टतेतून बाहेर पडल्यावर जर पुन्हा तिच्यात गुंतून तिच्या कह्यात गेले तर त्यांची शेवटची अवस्था पहिल्यापेक्षा वाईट होते.

  16. 2 पेत्र २:२१सुमारे इ.स. ६६

    नीतिमत्त्वाचा मार्ग समजून आल्यानंतर आपणास दिलेल्या पवित्र आज्ञेकडे पाठ फिरवणे यापेक्षा तो मार्ग त्यांना माहीत झालाच नसता, तर ते त्यांच्यासाठी बरे झाले असते.

  17. 2 पेत्र २:२२सुमारे इ.स. ६६

    अशा लोकांसाठी या म्हणी खर्‍या आहेत: “कुत्रा त्याच्या ओकारीकडे परत जातो,” आणि “धुतलेली डुकरीण तिच्या चिखलात लोळण्यास परत जाते,” अशा म्हणींप्रमाणे त्यांची गत झालेली असते.

  18. 2 पेत्र ३:१सुमारे इ.स. ६६

    प्रिय मित्रांनो, आता माझे हे तुम्हाला दुसरे पत्र आहे. या दोन्ही पत्राद्वारे मी तुम्हाला आठवण देऊन तुमच्या विचारांना हितकारक होतील अशा गोष्टींना चालना देत आहे.

  19. 2 पेत्र ३:२सुमारे इ.स. ६६

    माझी इच्छा आहे की, पवित्र संदेष्ट्यांनी पूर्वी सांगितलेल्या वचनांची आणि आमचे प्रभू आणि तारणाऱ्याने तुमच्या प्रेषितांद्वारे दिलेल्या आज्ञेची तुम्ही आठवण ठेवावी.

  20. 2 पेत्र ३:३सुमारे इ.स. ६६

    सर्वात प्रथम तुम्ही हे समजून घ्या की, शेवटच्या दिवसात थट्टा करणारे येतील, थट्टा करतील आणि स्वतःच्या वाईट वासनांच्या मागे लागतील.

  21. 2 पेत्र ३:४सुमारे इ.स. ६६

    ते म्हणतील, “त्यांच्या येण्याचे दिलेले ‘येत आहे’ हे वचन आता कुठे आहे? आमचे पूर्वज मरण पावले, तरी सर्वकाही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे.”

  22. 2 पेत्र ३:५सुमारे इ.स. ६६

    परंतु ते बुद्धिपुरस्सर हे विसरतात की, फार पूर्वी परमेश्वराच्या शब्दाने आकाशमंडळ अस्तित्वात आले आणि पृथ्वी पाण्यातून व पाण्याद्वारे घडविली गेली.

  23. 2 पेत्र ३:६सुमारे इ.स. ६६

    याच पाण्यामुळे त्यावेळेच्या जगाचा महाप्रलयाने नाश झाला होता.

  24. 2 पेत्र ३:७सुमारे इ.स. ६६

    आता अस्तित्वात असलेले आकाश व पृथ्वी ही त्याच परमेश्वराच्या शब्दाने अग्नीत नष्ट करण्यासाठी राखलेली आहेत, अनीतिमान लोकांच्या न्यायाच्या दिवसासाठी आणि नाशासाठी ती राखून ठेवलेली आहेत.

  25. 2 पेत्र ३:८सुमारे इ.स. ६६

    प्रिय मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही विसरू नका: प्रभूसाठी एक दिवस हजार वर्षांसारखा आहे आणि हजार वर्षे एका दिवसासारखी आहेत.