- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa AD 48–96
Letters to the Churches
Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.
या कालखंडातील वचने
- 1 पेत्र ४:१०सुमारे इ.स. ६०
परमेश्वराच्या कृपेच्या वेगवेगळ्या रूपामध्ये परमेश्वराचे एकनिष्ठ कारभारी म्हणून तुमच्यातील प्रत्येकाने एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्हाला जे काही विशेष कर्तृत्वदान मिळाले आहे त्याचा उपयोग करा.
- 1 पेत्र ४:११सुमारे इ.स. ६०
जर कोणी संदेश देतो तर त्याने असा संदेश द्यावा की, तो परमेश्वराचेच शब्द बोलत आहे. जर कोणी सेवा करतात, तर परमेश्वर जशी शक्ती पुरवितात त्याप्रमाणे करावी, म्हणजे सर्व गोष्टीमध्ये येशू ख्रिस्ताद्वारे परमेश्वराचे गौरव होईल. त्यांना गौरव आणि सामर्थ्य सदासर्वकाळ असो. आमेन!
- 1 पेत्र ४:१२सुमारे इ.स. ६०
प्रिय मित्रांनो, तुमची परीक्षा घेण्यासाठी तुमच्यावर आलेल्या अग्नीसारख्या वाईट अनुभवांबद्दल आश्चर्यचकित होऊ नका, जसे की तुमच्यासाठी काहीतरी विचित्रच घडत आहे.
- 1 पेत्र ४:१३सुमारे इ.स. ६०
परंतु ख्रिस्ताच्या दुःखात जेवढे तुम्हाला सहभागी होता येईल तेवढे होऊन आनंद करा, म्हणजे ज्यावेळी त्यांचे गौरव प्रकट होईल त्यावेळी तुम्ही अतिआनंदीत व्हाल.
- 1 पेत्र ४:१४सुमारे इ.स. ६०
जर ख्रिस्ताच्या नावामुळे तुमचा अपमान झाला असेल तर तुम्ही धन्य, कारण गौरवाचा आत्मा म्हणजेच परमेश्वराचा आत्मा तुम्हावर येऊन स्थिरावला आहे.
- 1 पेत्र ४:१५सुमारे इ.स. ६०
जर तुम्ही दुःख भोगता तर खुनी किंवा चोर, किंवा कोणताही गुन्हेगार किंवा लुडबुड्या म्हणून सुद्धा दुःख भोगू नये.
- 1 पेत्र ४:१६सुमारे इ.स. ६०
तरीपण ख्रिस्ती या नात्याने तुम्ही दुःख सहन केले तर लाज मानू नका, तर परमेश्वराची स्तुती करा की तुम्ही ते नाव धारण केले आहे.
- 1 पेत्र ४:१७सुमारे इ.स. ६०
कारण ही वेळ न्यायनिवाडा करण्याची आहे आणि त्याची सुरुवात परमेश्वराच्या घराण्यातील लोकांपासून होत आहे; आणि जर त्याची सुरुवात आपल्यापासून झाली तर, जे परमेश्वराच्या शुभवार्तेप्रमाणे चालत नाहीत त्यांचे काय होईल?
- 1 पेत्र ४:१८सुमारे इ.स. ६०
आणि, “जर नीतिमान लोकांचे तारण कष्टाने होते, तर अनीतिमान व पापी लोकांचे काय होईल?”
- 1 पेत्र ४:१९सुमारे इ.स. ६०
म्हणून जे परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे दुःख सहन करतात त्यांनी स्वतःला त्यांच्या विश्वासू निर्माणकर्त्याकडे सोपवून द्यावे आणि नेहमी चांगली कामे करीत राहवे.
- 1 पेत्र ५:१सुमारे इ.स. ६०
तुमच्यामध्ये जे वडील आहेत त्यांना मी एक सहवडील आणि ख्रिस्ताच्या दुःखांचा साक्षी, तो मी सुद्धा पुढे प्रकट होणार्या गौरवाचा वाटेकरी असेन, हा बोध करतो:
- 1 पेत्र ५:२सुमारे इ.स. ६०
तुमच्या देखरेखीखाली असलेल्या परमेश्वराच्या कळपाचे पालनपोषण करा, त्यांच्यावर लक्ष ठेवा, तुम्हाला हे काम करावेच लागते अशा दृष्टीने नाही तर तुम्ही स्वखुशीने हे काम करा, ही परमेश्वराची तुमच्याकडून अपेक्षा आहे; अप्रामाणिक लाभ मिळविण्यासाठी नाही परंतु सेवा करण्यास उत्सुक असा;
- 1 पेत्र ५:३सुमारे इ.स. ६०
जो कळप तुमच्या हाती सोपविला आहे त्यांच्यावर प्रभुत्व दाखवू नका, परंतु लोकांसमोर उदाहरण म्हणून राहा.
- 1 पेत्र ५:४सुमारे इ.स. ६०
जेव्हा मुख्य मेंढपाळ येतील, तेव्हा गौरवाचा मुकुट तुम्हाला मिळेल, तो कधीच झिजणार नाही.
- 1 पेत्र ५:५सुमारे इ.स. ६०
त्याच प्रकारे तुम्ही जे तरुण आहात, तुमच्या वडीलधार्यांच्या अधीन राहा. तुम्ही सर्वजण एकमेकांबरोबर नम्रता परिधान करून राहा, कारण, “परमेश्वर गर्विष्ठांचा विरोध करतात परंतु नम्रजनावर कृपा करतात.”
- 1 पेत्र ५:६सुमारे इ.स. ६०
परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली स्वतःला नम्र करा, म्हणजे ते तुम्हाला योग्य वेळी उंच करतील.
- 1 पेत्र ५:७सुमारे इ.स. ६०
तुमच्या सर्व चिंता त्याच्यावर टाका, कारण ते तुमची काळजी घेतात.
- 1 पेत्र ५:८सुमारे इ.स. ६०
सावध असा, दक्ष राहा! तुमचा शत्रू सैतान हा गर्जणार्या सिंहासारखा कोणाचा नाश करावा म्हणून शोधीत फिरतो.
- 1 पेत्र ५:९सुमारे इ.स. ६०
विश्वासामध्ये दृढ उभे राहून त्याचा विरोध करा, कारण तुम्हाला माहीत आहे की, जगभरातील विश्वासणाऱ्या लोकांच्या कुटुंबांना अशाच प्रकारची दुःखे भोगावी लागत आहेत.
- 1 पेत्र ५:१०सुमारे इ.स. ६०
तुम्ही थोडा वेळ दुःख सहन केल्यावर, सर्व कृपेचे परमेश्वर ज्यांनी तुम्हाला त्यांच्या सार्वकालिक गौरवामध्ये येण्यासाठी ख्रिस्तामध्ये आमंत्रित केले आहे, ते स्वतः तुमची पुनर्स्थापना करतील आणि तुम्हाला सशक्त, दृढ आणि स्थिर करतील.
- 1 पेत्र ५:११सुमारे इ.स. ६०
त्यांना सदासर्वकाळ अधिकार असो. आमेन.
- 1 पेत्र ५:१२सुमारे इ.स. ६०
ज्याला मी एकनिष्ठ भाऊ मानतो, त्या सीलासच्या मदतीने मी तुम्हाला थोडक्यात लिहिले आहे, तुम्हाला उत्तेजित करतो आणि अशी साक्ष देतो की, हीच परमेश्वराची खरी कृपा आहे. यामध्येच स्थिर राहा.
- 1 पेत्र ५:१३सुमारे इ.स. ६०
जी बाबेलमध्ये आहे ती, तुमच्याबरोबर एकत्र निवडलेली, तुम्हाला तिच्या शुभेच्छा पाठविते आणि माझा पुत्र मार्क तुम्हाला शुभेच्छा पाठवितो.
- 1 पेत्र ५:१४सुमारे इ.स. ६०
एकमेकांना प्रीतीच्या चुंबनाने अभिवादन करा. तुम्ही जे ख्रिस्तामध्ये आहात त्या तुम्हा सर्वांना शांती असो.
- 2 पेत्र १:१सुमारे इ.स. ६६
येशू ख्रिस्ताचा सेवक आणि प्रेषित शिमोन पेत्र, याजकडून,