मुख्य मजकुरावर जा

circa 1406–1380 BC

Conquest of Canaan

Joshua leads Israel across the Jordan into the promised land, defeating the Canaanite kingdoms one by one.

658 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. यहोशुआ १७:२सुमारे इ.स.पू. १४४३

    हा वाटा मनश्शेहच्या बाकीच्या लोकांसाठी; अबिएजेर, हेलेक अस्रिएल, शेखेम, हेफेर व शेमीदा यांच्या कुळांसाठी होता. योसेफाचा पुत्र मनश्शेहच्या कुळातील हे इतर पुरुष वंशज आहेत.

  2. यहोशुआ १७:३सुमारे इ.स.पू. १४४३

    मनश्शेहचा पुत्र माखीर, याचा पुत्र गिलआद, याचा पुत्र हेफेर, याचा पुत्र सलाफहाद याला पुत्र नव्हते, परंतु फक्त कन्याच होत्या, त्यांची नावे महलाह, नोआह, होगलाह, मिल्काह व तिरजाह ही होती.

  3. यहोशुआ १७:४सुमारे इ.स.पू. १४४३

    त्या एलअज़ार याजक, नूनाचा पुत्र यहोशुआ आणि पुढाऱ्यांकडे गेल्या आणि म्हणाल्या, “याहवेहने मोशेला आज्ञा दिली होती की आमच्या कुटुंबामध्ये आम्हाला वतन दिले जावे.” तेव्हा यहोशुआने याहवेहच्या आज्ञेप्रमाणे त्यांच्या वडिलांच्या भावांबरोबर त्यांना वतन दिले.

  4. यहोशुआ १७:५सुमारे इ.स.पू. १४४३

    यार्देनेच्या पूर्वेकडे गिलआद व बाशान याशिवाय मनश्शेहच्या वाट्याला भूमीचे दहा भाग आले,

  5. यहोशुआ १७:६सुमारे इ.स.पू. १४४३

    कारण मनश्शेहच्या गोत्रातील कन्यांना पुत्रांमध्ये वतन मिळाले. गिलआदाचा प्रदेश मनश्शेहच्या बाकीच्या वंशजाचा झाला होता.

  6. यहोशुआ १७:७सुमारे इ.स.पू. १४४३

    मनश्शेहच्या गोत्राची सीमा आशेरापासून शेखेमाच्या पूर्वेस मिकमथाथपर्यंत जाते. तिथून ही सीमा दक्षिणेला एन-तप्पूआहच्या लोकांच्या वस्तीपर्यंत जाऊन पोहोचते.

  7. यहोशुआ १७:८सुमारे इ.स.पू. १४४३

    (मनश्शेहकडे तप्पूआहचा प्रांत होता, परंतु मनश्शेहच्या प्रदेशाच्या सीमेवरील तप्पूआह एफ्राईमकडे होते.)

  8. यहोशुआ १७:९सुमारे इ.स.पू. १४४३

    ती सीमा पुढे दक्षिणेकडील कानाहा ओढ्याकडे जाते. एफ्राईमच्या मालकीची नगरे मनश्शेहच्या नगरांमध्ये होती, परंतु मनश्शेहच्या प्रदेशाची सीमा ओढ्याच्या उत्तरेकडे होती आणि भूमध्य समुद्राकडे संपते.

  9. यहोशुआ १७:१०सुमारे इ.स.पू. १४४३

    दक्षिणेकडील प्रदेश एफ्राईमच्या मालकीचा होता व उत्तरेकडे असलेली शहरे मनश्शेहची होती. मनश्शेहची सीमा भूमध्य समुद्रापर्यंत होती आणि त्याच्या उत्तरेकडे आशेर व पूर्वेकडे इस्साखार आहेत.

  10. यहोशुआ १७:११सुमारे इ.स.पू. १४४३

    इस्साखार आणि आशेरच्या प्रदेशात बेथ-शान, इब्लाम आणि दोर येथील लोक, एनदोर, तानख, आणि मगिद्दो त्यांच्या जवळच्या वसाहतीसह मनश्शेहचे होते (यादीतील तिसरे नगर नाफोथ होते).

  11. यहोशुआ १७:१२सुमारे इ.स.पू. १४४३

    तरीही मनश्शेहचे वंशज त्या नगरांमध्ये राहू शकत नव्हते, कारण कनानी लोकांनी त्यात राहण्याचा अट्टाहास केला होता.

  12. यहोशुआ १७:१३सुमारे इ.स.पू. १४४३

    परंतु जेव्हा इस्राएली लोक समर्थ झाले, तेव्हा त्यांनी कनानी लोकांना आपले गुलाम बनविले पण त्यांना देशातून पूर्णपणे बाहेर घालवून दिले नाही.

  13. यहोशुआ १७:१४सुमारे इ.स.पू. १४४३

    योसेफाचे लोक यहोशुआला म्हणाले, “वतन म्हणून तू आम्हाला एकच वाटा आणि एकच भाग का दिला आहेस? आम्ही संख्येने पुष्कळ लोक आहोत आणि याहवेहने आम्हाला पुष्कळ आशीर्वादित केले आहे.”

  14. यहोशुआ १७:१५सुमारे इ.स.पू. १४४३

    तेव्हा यहोशुआने उत्तर दिले, “जर तुम्ही संख्येने पुष्कळ आहात आणि एफ्राईमचा डोंगराळ प्रदेश तुमच्यासाठी खूप लहान आहे, तर परिज्जी व रेफाईम लोक राहतात तो रानाचा प्रदेश तुमच्यासाठी मोकळा करून घ्या.”

  15. यहोशुआ १७:१६सुमारे इ.स.पू. १४४३

    योसेफाच्या लोकांनी म्हटले, “डोंगराळ प्रदेश आम्हाला पुरेसा नाही आणि बेथ-शान व सभोवतालच्या वस्तीत राहणारे व येज्रील खोर्‍यात राहणार्‍या कनानी लोकांजवळ लोखंडी रथ आहेत.”

  16. यहोशुआ १७:१७सुमारे इ.स.पू. १४४३

    परंतु यहोशुआ योसेफाच्या गोत्राचे एफ्राईम आणि मनश्शेहला म्हणाला; “तुम्ही संख्येने पुष्कळ आणि बलवान आहात. तुम्हाला केवळ एकच भाग नसावा

  17. यहोशुआ १७:१८सुमारे इ.स.पू. १४४३

    परंतु अरण्यातील डोंगराळ भाग व त्याच्या टोकापर्यंतच्या हद्दी तुमच्या होतील; जरी कनानी लोकांजवळ लोखंडी रथ आहेत आणि ते फार शक्तिशाली आहेत, तरीही तुम्ही त्यांना घालवून देऊ शकाल.”

  18. यहोशुआ १८:१सुमारे इ.स.पू. १४४३

    संपूर्ण इस्राएली लोकांचा समुदाय शिलोह येथे एकत्र जमला आणि तिथे त्यांनी सभामंडप उभारला. देश त्यांच्या ताब्यात आला होता.

  19. यहोशुआ १८:२सुमारे इ.स.पू. १४४३

    परंतु अजूनही सात इस्राएली गोत्र होते ज्यांना त्यांचे वतन मिळाले नव्हते.

  20. यहोशुआ १८:३सुमारे इ.स.पू. १४४३

    तेव्हा यहोशुआ इस्राएली लोकांना म्हणाला, “याहवेह तुमच्या पूर्वजांच्या परमेश्वरांनी तुम्हाला दिलेला प्रदेश ताब्यात घेण्यास तुम्ही किती वेळ वाट पाहणार आहात?

  21. यहोशुआ १८:४सुमारे इ.स.पू. १४४३

    प्रत्येक गोत्रातून तीन पुरुषांची नेमणूक करा. आपआपल्या वतनानुसार देशाचे सर्वेक्षण करावे व त्याचे वर्णन लिहावे म्हणून मी त्यांना पाठवेन. मग त्यांनी माझ्याकडे परत यावे.

  22. यहोशुआ १८:५सुमारे इ.स.पू. १४४३

    तुम्ही ती भूमी त्यांना सात विभागांमध्ये विभागून द्यावी, यहूदाहच्या गोत्राने त्यांच्या दक्षिणेकडील सीमेत आणि योसेफाच्या गोत्राने त्यांच्या उत्तरेकडील सीमेतच राहावे.

  23. यहोशुआ १८:६सुमारे इ.स.पू. १४४३

    त्या सात प्रदेशांचे वर्णन लिहिल्यावर ते तुम्ही माझ्याकडे आणावे, मग याहवेह आपल्या परमेश्वरासमोर मी तुमच्यासाठी चिठ्ठ्या टाकीन.

  24. यहोशुआ १८:७सुमारे इ.स.पू. १४४३

    तथापि लेवी वंशास तुमच्यामध्ये भाग मिळणार नाही, कारण याहवेहची याजकीय सेवा हेच त्यांचे वतन आहे. गाद, रऊबेन आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राला आधी त्यांचे वतन यार्देनेच्या पूर्वेकडे मिळाले आहे. याहवेहचे सेवक मोशेने ते त्यांना दिले आहे.”

  25. यहोशुआ १८:८सुमारे इ.स.पू. १४४३

    जेव्हा ते पुरुष प्रदेशाची मोजणी करण्यासाठी निघाले, तेव्हा यहोशुआने त्यांना सूचना दिली, “जा आणि त्या प्रदेशाचे सर्वेक्षण करा आणि त्याचे वर्णन लिहा आणि परत माझ्याकडे या, मग मी येथे शिलोहमध्ये याहवेहसमोर तुमच्यासाठी चिठ्ठ्या टाकेन.”