मुख्य मजकुरावर जा

Absalom

92 वचने · 23 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Abishalom

Absalom चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तेव्हा योआबाला राजाकडे पाठवावे म्हणून अबशालोमाने योआबाला बोलाविणे पाठवले, परंतु योआबाने त्याच्याकडे येण्यास नकार दिला. त्याने दुसर्‍यांदा बोलाविणे पाठवले, परंतु पुन्हा योआबाने येण्यास नकार दिला.

  2. तेव्हा अबशालोम आपल्या सेवकांस म्हणाला, “पाहा, योआबाचे शेत माझ्या शेताला लागून आहे, त्यात त्याने जव लावले आहे. जा आणि त्याला आग लावा.” त्याप्रमाणे अबशालोमच्या सेवकांनी शेताला आग लावली.

  3. नंतर योआब अबशालोमच्या घरी गेला, आणि त्याला म्हणाला, “तुझ्या सेवकांनी माझ्या शेताला का आग लावली?”

  4. अबशालोम योआबाला म्हणाला, “पाहा, मी तुला बोलाविणे पाठवित म्हटले, ‘येथे ये म्हणजे मी तुला राजाकडे हे विचारण्यास पाठवेन, “गशूरहून मी का आलो? मी अजूनही तिथेच असतो तर ते माझ्यासाठी बरे झाले असते!” ’ तर आता मला राजाला भेटावयाचे आहे, जर माझ्याठायी काही दोष असेल, तर त्यांनी मला जिवे मारावे.”

  5. तेव्हा योआबाने राजाकडे जाऊन हे सर्व सांगितले. मग राजाने अबशालोमला बोलावून घेतले आणि तो आला व राजापुढे भूमीकडे लवून दंडवत घातले आणि राजाने अबशालोमचे चुंबन घेतले.

  6. त्यानंतरच्या काळात, अबशालोमने स्वतःसाठी एक रथ आणि घोडे आणि त्याच्यापुढे धावण्यासाठी पन्नास माणसे ठेवली.

  7. तो सकाळी लवकर उठत असे आणि शहराच्या वेशीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला थांबत असे. जेव्हा कोणी राजाकडे तक्रार आणत असे तेव्हा अबशालोम त्याला बोलावून विचारत असे, “तू कोणत्या नगराचा आहेस?” तो उत्तर देत असे, “आपला सेवक इस्राएलातील गोत्रांपैकी एका गोत्राचा आहे.”

  8. तेव्हा अबशालोम त्याला म्हणत असे, “पाहा, तुझे दावे कायदेशीर आणि यथायोग्य आहेत, परंतु तुझे ऐकण्यासाठी राजाचा कोणीही प्रतिनिधी तिथे नाही.”

  9. अबशालोम आणखी असेही म्हणे, “जर या देशात न्यायाधीश म्हणून माझी नेमणूक झाली! तर प्रत्येकजण ज्याची काही तक्रार किंवा खटला आहे तो माझ्याकडे आला असता व मी त्यांना न्याय मिळवून दिला असता.”

  10. जे कोणी राजाकडे न्याय मागण्यासाठी येत असत त्या सर्वांशी अबशालोम असा वागत असे, अशा प्रकारे त्याने इस्राएली लोकांची मने जिंकून घेतली.

  11. चार वर्षे पूर्ण झाल्यावर, अबशालोम राजाला म्हणाला, “मला हेब्रोन येथे जाऊ द्यावे म्हणजे मी याहवेहला केलेला आपला नवस फेडीन.

  12. नंतर अबशालोमने इस्राएलच्या सर्व गोत्रांकडे गुप्त संदेशवाहक असे सांगत पाठवले, “रणशिंगांचा आवाज ऐकताच तुम्ही म्हणा, ‘हेब्रोनमध्ये अबशालोम राजा आहे.’ ”

  13. यरुशलेममधून दोनशे लोक अबशालोमबरोबर आले होते. त्यांना पाहुणे म्हणून आमंत्रित केले गेले होते आणि ते अगदी निरागसपणे गेले, त्यांना याबाबतीत काहीही माहीत नव्हते.

  14. अबशालोम यज्ञार्पण करीत असताना, त्याने दावीदाचा सल्लागार गिलोनी अहीथोफेल याला सुद्धा त्याचे नगर गिलोह येथून बोलाविले. त्यामुळे कटकारस्थानाला अधिक बळ मिळत गेले व अबशालोमच्या मागे जाणाऱ्यांची संख्या वाढत गेली.

  15. तेव्हा एका संदेशवाहकाने येऊन दावीदाला सांगितले, “इस्राएलच्या लोकांची मने अबशालोमशी जडली आहेत.”

  16. तेव्हा दावीद त्याच्याबरोबर यरुशलेमात असलेल्या आपल्या सर्व अधिकार्‍यांना म्हणाला, “चला! आपण पळून जाऊ या, नाहीतर आपल्यातील कोणीही अबशालोमच्या हातून वाचणार नाही. आपण लवकर निघाले पाहिजे, नाहीतर तो त्वरेने आपल्याला गाठून आपल्यावर अरिष्ट आणेल व तलवारीने शहराचा नाश करेल.”

  17. “अहीथोफेल अबशालोमबरोबर कट रचणाऱ्यांपैकी एक आहे” असे कोणी दावीदाला सांगितले, तेव्हा दावीदाने प्रार्थना केली, “हे याहवेह, अहीथोफेलचा सल्ला मूर्खपणा असे होऊ द्या.”

  18. तर तू परत शहराकडे जा आणि अबशालोमास म्हण, ‘महाराज, मी आपला सेवक होईन; आधी मी तुमच्या पित्याचा सेवक होतो, परंतु आता मी तुमचा सेवक होईन,’ असे केल्यास अहीथोफेलचा सल्ला निष्फळ करून तू मला मदत करशील.

  19. तेव्हा अबशालोम शहरात प्रवेश करीत असताना, दावीदाचा मित्र हूशाई यरुशलेमात पोहोचला.

  20. ज्याच्या जागी तू राज्य केलेस त्या शौलाच्या घराण्याचा जो रक्तपात तू केला त्याचा मोबदला याहवेह तुला देत आहेत. आता याहवेहने ते राज्य तुझा पुत्र अबशालोम याच्या हाती दिले आहे. तू खुनी आहेस म्हणून तू नाशास येऊन ठेपला आहेस!”

  21. त्या दरम्यान अबशालोम व इस्राएलचे सर्व लोक यरुशलेमास आले आणि अहीथोफेल त्याच्याबरोबर होता.

  22. तेव्हा दावीदाचा मित्र हूशाई अर्की अबशालोमकडे गेला व त्याला म्हणाला, “राजा चिरायू होवो! राजा चिरायू होवो!”

  23. अबशालोमने हूशाईला विचारले, “तुझ्या मित्रावर तू अशीच प्रीती दाखवितोस काय? तो जर तुझा मित्र आहे, तर तू त्याच्याबरोबर का गेला नाहीस?”

  24. हूशाई अबशालोमला म्हणाला, “नाही, याहवेहने आणि या लोकांनी, आणि सर्व इस्राएलच्या लोकांनी ज्याला निवडले आहे; मी त्याचा आहे आणि मी त्याच्याबरोबर राहणार.

  25. अबशालोम अहीथोफेलला म्हणाला, “आम्हाला तुझा सल्ला दे, आम्ही काय करावे?”