Skip to content

War बद्दल बायबलमधील वचने

639 वचने · 45 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. सार्वभौम याहवेहपुढे स्तब्ध राहा. कारण त्यांच्या न्यायाचा दिवस जवळ आला आहे; याहवेहने अर्पण सिद्ध केले आहे; ज्यांना त्यांनी आमंत्रित केले, त्यांचे पवित्रीकरण केले आहे.

  2. याहवेहच्या अर्पणाच्या दिवशी मी अधिपतींना आणि राजपुत्रांना आणि परकीय वस्त्रे परिधान करणार्‍या सर्वांना शिक्षा करेन.

  3. त्या दिवशी या सर्वांना शिक्षा करेन जे उंबरठ्यावर पाऊल ठेवण्याचे टाळतात जे त्यांच्या दैवतांची मंदिरे हिंसाचार व लबाडीने भरतात.

  4. याहवेह जाहीर करतात, “त्या दिवशी मत्स्य वेशीपासून एक मोठी आरोळी ऐकू जाईल, नगरातील नव्या विभागातून विलापाचा ध्वनी, आणि डोंगरातून मोठ्या स्फोटाचा आवाज ऐकू येईल;

  5. विलाप करा, तुम्ही जे मक्तेशातील व्यापारी भागात राहता, तुमचे सर्व व्यापारी, सोन्याचांदीचा व्यवहार करणारे सर्वजण नष्ट होतील.

  6. त्या समयी मी दिवा घेऊन यरुशलेममध्ये शोधेन आणि जे बेफिकीर असतात, जे पखालीत सोडलेल्या द्राक्षारसाच्या गाळासारखे आहेत, जे विचार करतात की याहवेह आपले बरे किंवा वाईट असे काहीही करणार नाहीत, अशांना शिक्षा करेन.

  7. या लोकांची मालमत्ता लुटली जाईल, यांचीच घरे ढासाळून टाकली जातील, जरी त्यांनी घरे बांधली असतील, त्या घरात ते राहू शकणार नाहीत; जरी त्यांनी द्राक्षमळा लावला असेल, द्राक्षांचा रस ते पिणार नाहीत.”

  8. याहवेहचा तो भयावह दिवस जवळ— तो वेगाने अगदी जवळ येत आहे. याहवेहच्या दिवसाची गर्जना मर्मभेदक आहे; सामर्थ्यशाली योद्धे त्याची रणगर्जना करतील.

  9. तो दिवस क्रोधाग्नीचा दिवस असेल— तो दिवस दुःखाचा व क्लेशाचा, तो दिवस अरिष्ट व उजाडतेचा, तो दिवस अंधकाराचा व उदासीनतेचा, तो दिवस अभ्रांचा व निबिड काळोखाचा—

  10. तो दिवस तटबंदीच्या नगरांविरुद्ध आणि कोपऱ्यातील बुरुजा विरुद्ध रणशिंगाचा व रणगर्जनांच्या निनादांचा असेल.

  11. “मी सर्व लोकांवर अशा विपत्ती आणेन, ते मार्ग शोधणार्‍या एखाद्या आंधळ्या माणसाप्रमाणे चाचपडतील, कारण त्यांनी याहवेहविरुद्ध पाप केले आहे. त्यांचे रक्त धुळीसारखे ओतले जाईल व त्यांच्या आतड्या शेणासारख्या विखुरतील.

  12. त्यांचे सोने किंवा त्यांची चांदी त्यांना याहवेहच्या क्रोधापासून वाचवू शकणार नाही.” त्यांच्या ईर्षेच्या अग्नीने संपूर्ण पृथ्वी भस्म होईल, कारण जे सर्व पृथ्वीवर रहिवास करतात त्यांचा ते अकस्मातपणे अंत करतील.

  13. त्या वेळेपर्यंत लोकांना कामासाठी मजुरी नव्हती किंवा जनावरे भाड्याने मिळत नव्हती. शत्रूच्या भयापायी कामधंदे करण्यास इतरत्र जाणे सुरक्षित नव्हते, कारण मी तुम्हा प्रत्येकाला त्यांच्या शेजाऱ्याविरुद्ध केले होते.

  14. एकत्र ते योद्ध्यांसारखे होतील ते आपले शत्रू रस्त्यातील चिखलात तुडवतील. ते लढतील कारण याहवेह त्यांच्याबरोबर आहेत, आणि ते त्यांच्या शत्रूंच्या घोडेस्वारांना लज्जित करतील.

  15. मी यरुशलेमविरुद्ध युद्ध करण्यास सर्व राष्ट्रांना एकत्र करेन; नगर हस्तगत केले जाईल आणि घरे लुटली जातील, स्त्रियांवर बलात्कार करण्यात येईल. नगरीतील अर्धे लोक बंदिवासात जातील, परंतु उरलेले लोक नगरीतच राहतील.

  16. तुम्ही लढायासंबंधी ऐकाल आणि लढायांच्या अफवा ऐकाल, पण त्यामुळे घाबरू नका. कारण या गोष्टी घडल्याच पाहिजेत, पण शेवट अजूनही यावयाचा आहे.

  17. जेव्हा तुम्ही लढायांसंबंधी ऐकाल आणि लढायांच्या अफवा ऐकाल, तेव्हा तुम्ही घाबरू नका. या गोष्टी घडल्याच पाहिजेत. पण शेवट अजूनही यावयाचा आहे.

  18. “किंवा असा कोण राजा आहे, जो दुसर्‍या राजाच्या विरुद्ध युद्धास जाणार आहे. तो बसून विचार करणार नाही का, जो वीस हजार सैनिक घेऊन येत आहे त्याच्याविरुद्ध लढण्यासाठी त्याला दहा हजारांना घेऊन जाणे शक्य होईल का?

  19. जर त्याला हे शक्य नसेल, तर शत्रू दूर आहे तेव्हाच शांतीच्या प्रस्तावाचे बोलणे करण्यासाठी प्रतिनिधीमंडळ पाठवेल.

  20. तुम्ही लढायासंबंधी ऐकाल व दंगे याविषयी ऐकाल, तेव्हा भयभीत होऊ नका. प्रथम या गोष्टी घडल्याच पाहिजेत, पण शेवट एवढ्यात होणार नाही.”

  21. “तुम्ही यरुशलेम शहर शत्रुसैन्यांनी वेढलेले पाहाल, तेव्हा त्याचा विनाशकाळ जवळ आला आहे, हे तुमच्या लक्षात येईल.

  22. त्यावेळी जे यहूदीयात आहेत त्यांनी डोंगरांकडे पळून जावे, जे शहरात आहेत त्यांनी ते सोडावे आणि जे बाहेर रानात आहेत, त्यांनी शहरात येण्याचा प्रयत्न करू नये.

  23. कारण आता जे सर्व लिहिलेले आहे ते पूर्ण होण्यासाठी हे शिक्षेचे दिवस आहेत.

  24. गर्भवती आणि दूध पाजणार्‍या स्त्रियांसाठी तर तो काळ क्लेशाचा असेल! कारण पृथ्वीवर महान संकटे कोसळतील आणि लोकांवर क्रोधाचा वर्षाव होईल.

  25. काही तलवारीमुळे पडतील आणि काहींना सर्व राष्ट्रांमध्ये कैद करून नेण्यात येईल आणि गैरयहूदीयांचा काळ पूर्ण होईपर्यंत यरुशलेम शहरास गैरयहूदी पायाखाली तुडवतील.