मुख्य मजकुरावर जा

War बद्दल बायबलमधील वचने

639 वचने · 45 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तुझ्या लोकांच्या विरुद्ध युद्धाची गर्जना होईल, जेणेकरून तुझ्या सर्व गडांचा नाश होईल; जसे शलमनाने युद्धाच्या दिवशी बेथ-आर्बेलाचा नाश केला, जेव्हा मातेला तिच्या मुलांसहित आपटून ठार मारण्यात आले.

  2. शोमरोनच्या लोकांनी त्यांचा दोष वाहिलाच पाहिजे, कारण त्यांनी त्यांच्या परमेश्वराविरुद्ध बंड केले. ते तलवारीने पडतील; त्यांची बालके जमिनीवर आपटली जातील, आणि त्यांच्या गर्भवती स्त्रियांना चिरून टाकण्यात येईल.”

  3. तो दिवस अंधाराचा व औदासिन्याचा, मेघांचा व दाट काळोखाचा दिवस. जसे डोंगरावर विस्तारलेल्या पहाटेसारखा आहे तसे विशाल व बलवान सैन्य चालून येत आहे, यापूर्वी असे कधी झाले नव्हते, नंतरही अनेक पिढ्या पुन्हा कधीच होणार नाही.

  4. त्यांच्यापुढे अग्नी विनाश करीत आहे, त्यांच्यामागे ज्वाला पेटली आहे. त्यांच्यापुढील प्रदेश एदेन बागेसारखा आहे, त्यांच्यामागील प्रदेश ओसाड वाळवंट आहे— त्यांच्या तावडीतून काहीच वाचू शकत नाही.

  5. त्यांचे स्वरूप घोड्यांप्रमाणेच आहेत; आणि घोडेस्वारा प्रमाणे ते जोरात धावतात.

  6. रथांच्या आवाजाप्रमाणे, पर्वताच्या माथ्यांवर ते उड्या मारतात, भुसा भस्म करणार्‍या अग्नीप्रमाणे, युद्धासाठी सज्ज झालेल्या पराक्रमी सैन्याप्रमाणे आहे.

  7. त्यांच्यासमोर राष्ट्रे भयभीत होतात; हे प्रत्येक चेहरा फिका पडतो.

  8. वीरांप्रमाणे ते हल्ला करतात; सैनिकांप्रमाणे ते तटाच्या भिंती चढतात. आपल्या रांगा न मोडता ते सरळ आगेकूच करतात.

  9. ते एकमेकांना धक्काबुक्की करीत नाहीत; प्रत्येकजण सरळ पुढे जातो. समोर शस्त्रे असताना ते जखमी न होता रांग न मोडता त्यातून पार जातात.

  10. शहराकडे ते धाव घेतात; ते तटाच्या भिंतीवर धावतात; ते चढून घरात शिरतात, जणू काही खिडक्यांतून प्रवेश करणारे चोरच!

  11. पृथ्वी त्यांच्यापुढे कापते आणि आकाशे थरथरतात, सूर्य आणि चंद्र काळवंडतात, आणि तारे चमकणे सोडून देतात.

  12. राष्ट्रांमध्ये ही घोषणा करा: युद्धासाठी सुसज्ज व्हा! योद्ध्यांना आव्हान करा! तुमचे सर्व लढवय्ये जवळ या आणि हल्ला करा.

  13. याहवेह असे म्हणतात, “अम्मोनच्या तीन नाही तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मी अनुताप करणार नाही. कारण आपल्या सीमा वाढविण्यासाठी गिलआदाच्या गरोदर स्त्रियांना चिरले,

  14. मी मोआबावर अग्नी पाठवेन तो करीयोथच्या किल्ल्याला भस्म करेन. युद्धाच्या आक्रोशात आणि रणशिंगाच्या आवाजात मोआब प्रचंड नाशाने खाली जाईल.

  15. नगरात जेव्हा रणशिंगाचा आवाज येतो, तेव्हा लोक घाबरत नाही काय? शहरात विपत्ती आली तर, ती याहवेहने घडवून आणली नाही काय?

  16. “तुमच्यातील काहींचा नाश असा केला जसा मी, परमेश्वराने, सदोम आणि गमोराचा केला. तुम्ही अग्नीच्या भट्टीतून ओढून काढलेल्या जळत्या काठीप्रमाणे होता, तरीही तुम्ही माझ्याकडे वळला नाही,” असे याहवेह जाहीर करतात.

  17. ज्यांनी कृत्तिका नक्षत्रे व मृगशीर्ष नक्षत्रे निर्माण केले, जे मध्यरात्रीचे रूपांतर पहाटेत करतात, आणि जे दिवसाचे रूपांतर रात्रीत करतात, जे समुद्राच्या पाण्यास बोलवितात आणि ते जमिनीच्या पृष्ठभागावर ओततात— याहवेह, हे त्यांचे नाव आहे.

  18. अंधारी आणणाऱ्या क्षणिक प्रकाशाने ते किल्ला उद्ध्वस्त करतात आणि तटबंदी असलेल्या शहराचा नाश करतात.

  19. जर एका घरात फक्त दहाच लोक उरले असले तरीही ते सर्व मरतील.

  20. आणि मृतदेह जाळण्यासाठी घरातून बाहेर काढायला आलेल्या त्याच्या नातेवाईकांनी तिथे लपून बसलेल्या कोणाला विचारले तर तुझ्यासोबत आणखी कोणी आहे काय? आणि तो म्हणेल, “नाही,” तो त्याला पुढे म्हणेल, “गप्प राहा, याहवेहचे नाव घेऊ नको.”

  21. सार्वभौम याहवेह घोषित करतात, “त्या दिवशी, मंदिरातील त्यांचे गीत मी आकांतात बदलेन. सर्वत्र अनेक मृतदेह मौन धरून पडलेली असतील!”

  22. ते देशांमधील अनेक लोकांचा न्याय करतील, दूरदूरच्या बलाढ्य राष्ट्रांमधील वाद मिटवतील. ते आपल्या तलवारी ठोकून त्यांचे नांगराचे फाळ करतील, व भाल्यांचे आकडे बनवतील. एक देश दुसऱ्या देशाविरुद्ध तलवार उगारणार नाही, तसेच ते यापुढे लष्करी प्रशिक्षण देणार नाहीत.

  23. ती लुटल्या गेली, लुबाडल्या गेली व विवस्त्र करण्यात आली आहे! तिच्या लोकांची अंतःकरणे वितळून गेली आहेत व गुडघे निकामी झाले आहेत, त्यांची शरीरे थरथर कापत आहेत व त्यांचे चेहरे फिके पडले आहेत.

  24. आक्रमक घोडेस्वारांची पलटण लखलखणार्‍या तलवारी चमचमणारे भाले! पडलेली अनेक प्रेते, सर्वत्र मृतांचे ढीग, अगणित मृत शरीरे, प्रेतांना अडखळून पडणारे लोक—

  25. असे असूनही थीब्जचा पाडाव झाला आणि तिला बंदिवासात नेण्यात आले. तिची बालके रस्त्यांच्या प्रत्येक कोपऱ्यावर दगडांवर आपटून ठार मारण्यात आली. तिच्या अधिकार्‍यांसाठी चिठ्ठ्या टाकण्यात आल्या, तिच्या सर्व प्रतिष्ठित व्यक्तींना साखळदंडानी बांधण्यात आले.